Saturday, May 17, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

मुंबईत १ लाख २५ हजार चौरस फुटाच्या भूखंडाचं १ हजार कोटींचं श्रीखंड!

वांद्रे पश्चिम येथील कोट्यावधीच्या मोकळ्या जागेचे आरक्षण बदलून भूखंड बिल्डरांच्या घशात

August 7, 2021
in घडलं-बिघडलं
0
bjp

मुक्तपीठ टीम

एकिकडे निसर्गाच्या प्रकोपाला मुंबईकरांना दरवर्षी पावसाळ्यात सामोरे जावे लागत असताना मुंबईतील उरलेल्या सुरल्या मोकळ्या जागा आरक्षणे बदलून बिल्डरांच्या घशात घातल्या जात आहेत. वांद्रे पश्चिम येथील अशाच २२ भूखंडाचे आरक्षण बदलल्याचा निषेध करीत महापालिका आणि राज्य सरकारच्या विरोधात भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांच्या नेतृत्वात भाजपा कार्यकर्त्यांनी आज वांद्रे येथे निदर्शने केली.

 

मुंबईच्या २०३४ पर्यंतचा विकास आराखडा मंजूर करण्यात आला असून या आरखड्यासाठी नियुक्त करण्यात आलेल्या नियोजन समितीने अनेक आरक्षणे बदलून मुंबईकरांच्या हक्काच्या मोकळ्या जागा बिल्डरांना आंदणच दिल्या आहेत.

 

वांद्रे पश्चिम विभागातील कार्टररोड जवळील शेर्ली राजन रोडवरील उच्चभ्रू वसाहती परिसरातील येथील बाई अवाबाई पेट्रीट ट्रस्टच्या मोकळ्या २२ भूखंडाची आरक्षणे बदलून हे भूखंड बिल्डरच्या घशात घालण्यात आला आहे. याच भूखंडाजवळ आज निदर्शने करुन आमदार अँड आशिष शेलार यांनी मुंबईतील आरक्षणे बदललेल्या मोकळ्या जागांचा विषय ऐरणीवर आणला आहे.

 

वांद्रे पश्चिम येथील बाई आवाबाई पेट्रीट ट्रस्टच्या भूखंडावरील मैदाने, शाळा, महापालिका बाजार, वृध्दाश्रम,डिपी रोड, अशी आरक्षणे बदलण्यात व रद्द करण्यात आले असून सुमारे १ हजार कोटींचे ही सार्वजनिक हिताची मोकळी जागा बिल्डरच्या घश्यात घालण्यात आली आहे. याबाबत नियोजन समितीने ज्यावेळी हरकती मागवल्या त्यावेळी आमदार अँड आशिष शेलार यांनी लेखी हरकत ही नोंदवली होती. त्यानंतर ही या हरकतींकडे दुर्लक्ष करून त्याबाबत सुनावणी न घेता ही आरक्षणे रद्द करण्यात आली आहेत.

वांद्रे पश्चिम हा विभाग मुंबईतील उच्चभ्रु म्हणून ओळखला जातो या परिसरात वाढती वाहतूक कोंडी, मोकळ्या जागांची अत्यअल्प असल्याने उरल्या मोकळ्या जागा वाचाव्यात तसेच आरोग्य, शाळा, बाजार, मैदाने, स्मशानभूमी, गार्डन अशा सार्वजनिक हिताची आरक्षणे विकसित व्हावीत व नागरिकांना चांगल्या सुविधा मिळाव्या म्हणून आमदार अँड आशिष शेलार आग्रही आहेत. अशात ही मोक्याची जागा आरक्षण बदलून बिल्डरच्या घशात घालण्यात आली आहे. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या आंदोलनात भाजपा नगरसेविका स्वप्ना म्हात्रे, हेतल गाला, विधानसभा अध्यक्ष किशोर पुनवत आणि भाजपाचे स्थानिक पदाधिकारी सहभागी झाले होते.

 

याबाबत आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की, राज्य सरकारचे पर्यावरण मंत्री पर्यावरण वाचवण्याच्या गप्पा मारत आहेत आणि दुसरीकडे मुंबई महापालिकेला हाताशी धरुन मुंबईतील भूखंडांची जागांची आरक्षणे बदलून मोकळ्या जागांचा गळा घोटला जात आहे. वांद्रे पश्चिम येथील पेट्रीट ट्रस्टच्या १ लाख २५ हजार चौरस फूटांच्या २२ भुखंडाचे आरक्षण बदलून आणि रद्द करुन १ हजार कोटींचा घोटाळा करण्यात आला आहे. खेळाचे मैदान, वृध्दाश्रम, बगीचा, शाळा आणि महापालिका मंडई यासाठी आरक्षीत ही जागा बिल्डरच्या घशात घालण्यात आली आहे. आम्ही आज पासून मुंबई वाचवा आंदोलन करुन मुंबईतील् अशा आरक्षणे बदललेल्या जागा जनतेसमोर आणणार आहोत. मुंबईत मोकळ्या जागा वाचणे आवश्यक असताना नगरविकास खात्याने मुंबई महापालिकेला हाताशी धरुन असे भूखंड बिर्डरच्या घशात घातले आहेत. असा आरोप भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी केला आहे.

रद्द व बदलण्यात आलेल्या आरक्षणांची माहिती…

1) Reservation of Municipal Market with Vending zone + Old Age Home + student Hostel as per draft DP 2034 on CTS nos. 1101 B/26, 1584, 1585, 1586, 1587, 1588, 1591 admeasuring 4113.86 sqmts. Is entirely deleted.

2) 9.15 mt wide DP Road as per draft DP 2034 on CTS nos. 1609, 1610 is entirely deleted.

3) Reservation of Primary / Secondary school as per draft DP 2034 on CTS nos. 1604, 1593, 1594, 1595, 1576, 1575 admeasuring 963.03 sqmts is deleted and relocated elsewhere.

4) Reservation of Playground as per draft DP 2034 on CTS nos. 1592, 1593, 1604, 1606, 1607, 1608, 1609, 1610, 1611 admeasuring 2195.36 sqmts is deleted and relocated elsewhere.

5) Reservation of Garden / Park as per draft DP 2034 on CTS nos. 1478, 1480 admeasuring 1767.98 sqmts is deleted and relocated elsewhere.


Tags: Aaditya Thackerayadv. ashish shelarBJPmumbaiMy BMCअॅड आशिष शेलारभाजपाराज्य सरकारवांद्रे पश्चिम
Previous Post

स्टोरीटेलवर डॉ. सदानंद मोरेंचा स्वातंत्र्याचा महाइतिहास!

Next Post

प्रत्येक जात आरक्षण लाभार्थी झालेल्या देशात आरक्षणाविरोधात कुणी बोलू नये!

Next Post
mandal day

प्रत्येक जात आरक्षण लाभार्थी झालेल्या देशात आरक्षणाविरोधात कुणी बोलू नये!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!