मुक्तपीठ टीम
तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी या तीन दिवसीय मुंबई दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी महाविकास आघाडी सरकारमधील वरिष्ठ नेत्यांच्या भेटी घेतल्या. ममतांची ही भेट चांगलीच चर्चेत आली आहे.ममता बॅनर्जींमुळे भाजपा अस्वस्थ झाल्याचे आक्रमक टीका आणि कारवाईच्या मागणीमुळे दिसत आहे. तर त्याचवेळी त्यांच्या यूपीएबद्दलच्या आणि काँग्रेस नेतृत्वाविषयीच्या अप्रत्यक्ष विधानामुळे काँग्रेस नेत्यांनीही हल्लाबोल केला आहे.
ममता बॅनर्जींच्या भेटीवर आशिष शेलारांचे सवाल
- आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन ममता बॅनर्जींच्या दौऱ्यावर काही प्रश्न उपस्थित केले.
- ममता बॅनर्जी यांची आदित्य ठाकरे यांनी काल भेट घेतली.
- मुख्यमंत्र्यांच्यावतीने ही भेट आपण घेतल्याचे आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले आहे.
- या गुप्त बैठकीमध्ये कटकारस्थान तर नाही ना शिजलं?
- ममतादीदींचे महाराष्ट्रात सरकारी पक्षांनी स्वागत केले.
- ते प्रथेप्रमाणे अपेक्षितच आहे.
- पण त्यानंतर मंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतलेली भेट व त्यांची झालेली बैठक कशासाठी होती?
- महाराष्ट्रात कोणीही आले की आमचा कौटुंबिक स्नेह असल्याचे सांगून या भेटी घेतल्या जातात.
- तुमचा कौटुंबिक स्नेह असेलही.
- आम्हाला त्याबद्दल काय करायचे आहे?
- पण महाराष्ट्राचा त्याच्याशी काय सबंध?
- बांग्लादेशीयांना संरक्षण देणाऱ्या ममतादिदी यांच्याशी कुठले आले कौटुंबिक संबध?
महाराष्ट्रातील तरुणांना केवळ वडापाव विकायला सांगणार काय?
- ममतादिदी महाराष्ट्रातील उद्योगांना आपल्या राज्यात यायचे आमंत्रण देण्यासाठी आल्या आहेत.
- देशभर सर्वत्र उद्योग धंदे असले पाहिजे हीच भाजपाची भूमिका आहे.
- मात्र आपल्या राज्यातील उद्योग तुम्ही घेऊन जा, असे महाराष्ट्रातील सत्ताधारी शिवसेना दिदींना सांगते आहे काय? हा प्रश्न आहे.
- महाराष्ट्रातील रोजगार, व्यवसाय, इंडस्ट्रीज इथून घेऊन जाण्यास सत्ताधारी शिवसेना ममतादिदींना मदत करते आहे काय?
- महाराष्ट्रात कँग्रेसला ना स्थान, ना इज्जत, ना किंमत, ना स्थिती त्यामुळे काँग्रेसला काय ते त्यांचे त्यांनी ठरवावे.
- आमचा सवाल महाराष्ट्राचा आहे.
- महाराष्ट्रातील उद्योग पश्चिम बंगालला पाठवून महाराष्ट्रातील तरुणांना केवळ वडापाव विकायला सांगणार आहात काय?
ममता बॅनर्जींविरोधात गुन्हा दाखल करा- प्रवीण दरेकर
- मुंबईतील वायबी सेंटर येथे कार्यक्रम संपल्यावर राष्ट्रगीत सुरू झाल तेव्हा ममता बॅनर्जी यांनी बसूनच राष्ट्रगीताला सुरुवात केली.
त्यावेळी त्या खाली बसलेल्या होत्या. - त्यानंतर त्या बोलता बोलता जागेवरुन उठल्या.
- यावेळी त्या राष्ट्रगीच्या उर्वरित ओळी बोलू लागल्या. त्यानंतर त्यांनी ‘जय महाराष्ट्र, जय बंगाल, जय भारत’, अशी घोषणा केली.
- ममता बॅनर्जींच्या या वागण्यावर सध्या विरोधकांकडून टीका होत आहे.
- ममता बॅनर्जी यांनी ज्या पद्धतीने राष्ट्रगीताचा अपमान केलेला आहे ते पाहता त्यांच्यावर गुन्हा दाखल करायला हवा, अशी मागणी भाजपाचे विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केली आहे.
- राजकारण करत असताना देशाचा विसर पडणे हे फार घातक आहे.
- त्याचबरोबर देशापेक्षा राजकारण मोठे नाही.
- ममता बॅनर्जी या राजकारणासाठीच मुंबईमध्ये आल्या होत्या, परंतु त्यांना राष्ट्रगीताचा विसर पडला ही खेदाची बाब आहे.
काँग्रेसचा हल्लाबोल
राहुल गांधीवर अप्रत्यक्षपणे टीका करून भाजपलाच मदत – बाळासाहेब थोरात
- काँग्रेस नेते आणि महसूलमंत्री बाळासाहेब थोरात म्हणाले की, भाजप आणि केंद्र सरकारच्या दडपशाहीविरोधात काँग्रेसच लढत आहे.
हे देशाला माहित आहे. - आपल्या राजकीय फायद्यासाठी व वैयक्तिक महत्वाकांक्षेसाठी सोयीप्रमाणे भूमिका घेऊन कोणत्याही पक्षाला भाजपाविरोधात लढता येणार नाही.
- काँग्रेस हाच देशासाठी आणि लोकशाहीसाठी सक्षम पर्याय आहे.
केंद्र सरकार विरोधकांवर ‘फोडा आणि झोडा’चा प्रयोग करते – अशोक चव्हाण
- लोकशाही व संविधानाप्रती कटिबद्धता आणि विद्यमान केंद्र सरकार विरोधातील संघर्षाबाबत काँग्रेसला आणि काँग्रेस नेतृत्वाला कोणाच्याही प्रशस्तीपत्राची आवश्यकता नाही.
- स्वातंत्र्यपूर्व काळापासून आजपर्यंत नेहमीच काँग्रेसने सर्वसामान्यांसाठी प्रामाणिकतेने लढा दिला.
- भाजपच्या केंद्र सरकारचा लोकविरोधी भूसंपादन कायदा व तीन काळे कृषी कायदे रद्द करण्याबाबत आणि इतर अनेक प्रश्नांवर काँग्रेसची आक्रमक व सक्रिय भूमिका संपूर्ण देशाने पाहिली आहे.
- काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या सक्षम, खंबीर नेतृत्वाखाली हा लढा भविष्यात अधिक नेटाने लढला जाईल.
- मागील ७ वर्ष केंद्र सरकार विरोधकांवर ‘फोडा आणि झोडा’चा प्रयोग करते आहे.
- देशभरातील गैरभाजप पक्षांनी केंद्राच्या त्या प्रयोगाला बळ देणारे राजकारण करू नये, अशी अपेक्षा आहे.
- देशाच्या व्यापक हिताला ते पोषक नाही, असा सल्ला सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी दिलाय.
भाजपाविरोधातील लढाई एकजुटीने लढण्याची आवश्यकता- नाना पटोले
- भाजपा हा देशाचे संविधान आणि लोकशाहीसाठी धोका आहे.
- भाजपच्या हुकुमशाही वृत्तीविरोधात काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस पक्ष सातत्याने लढत आहेत.
- देशातील जनता हे पहात आहे.
- वैयक्तिक महात्वाकांक्षेपेक्षा देश महत्त्वाचा असून भाजपाविरोधातील लढाई अंहकाराने नाही तर एकजुटीने लढण्याची आवश्यकता आहे.