Wednesday, March 11, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

लातूरमधील भाजप आणि कॉंग्रेसच्या अनेक पदाधिकार्‍यांनी राष्ट्रवादीत केला जाहीर प्रवेश

प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पक्षात केले स्वागत

July 9, 2021
in घडलं-बिघडलं
0
congress

मुक्तपीठ टीम

लोकांमधील कार्यकर्ते जेव्हा आपल्या पक्षात प्रवेश करतात तेव्हा आम्हाला मनापासून आनंद होतो. लातूर जिल्ह्याकडून राजकीय संस्कृती कशी सांभाळावी हे आम्ही शिकलो आहोत. त्यामुळे या जिल्ह्याकडे आमचा विशेष ओढा आहे. निलंगा मतदारसंघात राष्ट्रवादीची ताकद थोडी कमी पडत होती. ही ताकद वाढविण्यासाठी आता सगळ्यांनी एकत्र येणं गरजेचे आहे. धुमाळ यांच्या येण्याने या ताकदीत भर पडली आहे असे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी यावेळी मांडले.

NCP

दरम्यान आदरणीय पवारसाहेबांच्या विचाराने प्रेरित होऊन अनेक लोक पक्षात येण्यासाठी इच्छुक आहेत. यासोबतच जनमानसाचा ओढा राष्ट्रवादीकडे आहे. पक्ष वाढविणे सोपे असते पण पक्षात आलेल्यांना योग्य सन्मान देणं ही मोठी जबाबदारी असते. पक्षात आलेल्यांना हा सन्मान नक्कीच दिला जाईल, असा विश्वासही जयंत पाटील यांनी दिला.

NCP

संजय बनसोडे यांनीही पक्षप्रवेश केलेल्या सर्व मान्यवरांचे पक्षात स्वागत केले. निलंगा मतदारसंघात पक्ष संघटना बळकट करण्याची व येणाऱ्या जिल्हा परिषद निवडणुकीत पक्षाला मोठे यश मिळवून देण्याची जबाबदारी आता धुमाळ यांच्यावर आहे. यासाठी बूथ कमिटी रचनेवर लक्ष दिले तर हे यश नक्कीच आपले आहे, असे संजय बनसोडे यांनी सांगितले.

NCP

लातूर जिल्हयातील भाजप आणि कॉंग्रेसच्या पदाधिकार्‍यांनी आज राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर प्रवेश केला.

लातूर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष पंडीतराव धुमाळ, माजी सदस्य प्रविण सुरवसे, भाजपाचे माजी तालुकाध्यक्ष अतुल पाटील, निलंगा येथील रहेमानिया तालीम संस्थेचे अध्यक्ष फारुख देशमुख, शिरुर अनंतपाळ नगरपंचायतीचे सदस्य अनिलकुमार देवंग्रे, देवणीतील राष्ट्रीय समाज पक्षाचे युवक तालुकाध्यक्ष वैभव म्हेत्रे, वंचितचे बालाजी लवे, सचिन दोडके, युसुफ सय्यद, गुणवंतराव जाधव, संजय सावकार, बालाजीराव पाटील, सुधीर धुमाळ, विशाल धुमाळ आदींनी जाहीर प्रवेश केला.

NCP

यावेळी राज्यमंत्री संजय बनसोडे, जिल्हाध्यक्ष व आमदार बाबासाहेब पाटील, अल्पसंख्याक सेलचे राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर विद्रोही, प्रदेश सरचिटणीस बसवराज नागराळकर, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष सुरज चव्हाण, माजी जिल्हाध्यक्ष डी. एन शेळके आदी उपस्थित होते.


Tags: BJPCongressjayant patillaturNCPलातूरसंजय बनसोडे
Previous Post

“पोलीस ठाणी व कर्मचारी वसाहतींचे बांधकाम दर्जेदार आणि वेळेत पूर्ण करा”

Next Post

चंद्रपूर दारु बंदी उठवण्याच्या विरोधात आझाद मैदानावर निदर्शने

Next Post
Chandrapur

चंद्रपूर दारु बंदी उठवण्याच्या विरोधात आझाद मैदानावर निदर्शने

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!