Thursday, June 5, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारिप व भाजपाच्या अनेक नेत्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश

December 2, 2021
in घडलं-बिघडलं
0
राष्ट्रवादीत प्रवेश

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत वाशिम, मावळ आणि ठाणे ग्रामीण भागातील भारिप, भाजपाच्या अनेक नेत्यांनी व नगरसेवकांनी आज प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश केला.

राष्ट्रवादीत प्रवेश

यावेळी गृहमंत्री दिलीप वळसेपाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, आमदार सुनील शेळके, आमदार डॉ. किरण लहामटे, युवक कार्याध्यक्ष सूरज चव्हाण, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, प्रदेश सरचिटणीस नसिम सिद्दीकी तसेच पक्षाचे इतर स्थानिक पदाधिकारी व कायकर्ते उपस्थित होते.

 

यावेळी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हे आदरणीय पवारसाहेबांचे कुटुंब आहे. या‌‌ कुटुंबात आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपले प्रश्न इथे नक्कीच‌ सुटतील. कार्यकर्त्यांची गुज राखणारा हा पक्ष आहे. काही दिवसांनी राष्ट्रवादीची सदस्य नोंदणी सुरु होणार आहे. ऑफलाईन आणि ऑनलाईन दोन्ही माध्यमातून पक्षनोंदणीचा कार्यक्रम जोरात राबवा असे आवाहन केले.

 

 

अजितदादा पवार यांनी कार्यक्रमाला संबोधित करताना नवीन सदस्यांचे पक्षात स्वागत केले व पक्ष बळकटीसाठी सर्वांना एकजुटीने प्रयत्न करण्याचे आवाहन केले. आदरणीय पवारसाहेबांनी स्वाभिमानातून स्थापन केलेल्या पक्षाची विचारधारा सामान्य जनतेपुढे पोहोचविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करावे तसेच आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नजरेसमोर ठेवून पक्ष संघटना बळकट करण्यासाठी आजचा पक्षप्रवेश प्रभावी ठरेल, असा विश्वासही अजितदादा पवार यांनी व्यक्त केला.

राष्ट्रवादीत प्रवेश

प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव व नगरसेवक व ठाणे महानगरपालिकेचे गटनेते नजीब मुल्ला यांच्या प्रयत्नाने ठाणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद सदस्य सुरेश म्हात्रे, गुंदवळी उपसरपंच विलास पाटील, भिवंडी शिवसेना विभाग अध्यक्ष भालचंद्र भोईर, राहनाळ उपसरपंच किरण नाईक यांनी पक्षात प्रवेश केला.

 

यासोबतच मावळ विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनिल शेळके यांच्या पुढाकाराने लोणावळ्याचे विद्यमान नगरसेवक भरत हरपुडे, आरोही तळेगावकर, तळेगाव माजी उपनगराध्यक्ष चंद्रभान खळदे, उपसरपंच स्वप्निल काळोखे, उद्योजक भरतशेठ काळोखे यांनीही हाती घड्याळ बांधले.

 

वाशिम जिल्हाध्यक्ष चंद्रकांत ठाकरे यांच्या पुढाकाराने हाजी मोहम्मद युसुफ पुंजानी यांच्यासह हेमेंद्र ठाकरे, जुम्मा पप्पुवाले, फिरोज शेकुवाले, चांदशा कासमशा, अ.एजाज अ. मन्नान, जावेदोद्दीन शेख, इरफानखान इनायतुल्लाखान, जाकीर शेख मोहम्मद इसहाक, सलीम प्यारेवाले, राजू इंगोले, सलीम शेख लालू गारवे, अहमद रशीद अ. कादीर, जाकीर अली अब्बासअली, अ.आरीफ अ.वारिस मौलाना, सै. मुजाहीद सै. अजीज, निसारखान नजीरखान डॉ. धनंजय राठोड, मो. फैजल नागानी, संतोष भोयर, गोपाल खोडके, मो. सोहेल अंसारी, अ. बशीर रहीम, शेषराव राठोड या भारिपमधील २३ नगरसेवक व कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश झाला.


Tags: Ajitdada PawarB J Pjayant patilअजितदादा पवारजंयत पाटीलभाजपाभारिप
Previous Post

कोरोनाच्या प्रादूर्भावामुळे पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांचे दहावी आणि बारावीचे परीक्षा शुल्क माफ

Next Post

राज्यात ७९६ नवे रुग्ण, ९५२ रुग्ण बरे होऊन घरी!

Next Post
corona

राज्यात ७९६ नवे रुग्ण, ९५२ रुग्ण बरे होऊन घरी!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!