मुक्तपीठ टीम
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत ईडी कोठडी सुनावण्यात आल्यानंतर त्याचे राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. एकीकडे मलिकांच्या समर्थनात महाविकास आघाडीकडून मंत्रालयाबाहेर आंदोलन सुरु आहे तर दुसरीकडे मलिकांच्या राजीमान्यावरून भाजपा आक्रमक झाली आहे. मलिक यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी भाजपाने गुरुवारी राज्यभर आंदोलन केले. नागपूर, औरंगाबाद, पुणे, हिंगोली आणि अमरावतीमध्ये भाजपाने आंदोलन केले.
बुधवारी, ईडीने नवाब मलिक यांच्यावर कारवाई केल्यानंतर राजकीय प्रतिक्रिया उमटण्यास सुरुवात झाली होती. आठ तासाच्या चौकशीनंतर ईडीने नवाब मलिक यांना अटक केली. त्यांच्या अटकेनंतर राजीनामा द्यावा यासाठी भाजपाकडून मागणी करण्यात आली होती, मात्र मलिकांचा राजीनामा न स्वीकारण्यात आलेला नाही आहे. नवाब मलिक यांनी राजीनामा द्यावा यासाठी भाजपकडून आजपासून राज्यभरात आंदोलन करण्यात येणार आहे. मलिकांना अटक करण्यात प्रकरण हे राष्ट्रीय सुरक्षेशी संबंधित आहे. त्यामुळे मलिक राजीनामा देईपर्यंत आंदोलन सुरू राहणार असल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले.
नागपुरात भाजपा आक्रमक
- नवाब मलिक यांनी मंत्रीपदाचा राजीनामा द्यावा, या मागणीसाठी नागपुरातील संविधान चौकात भाजपने आंदोलन केले.
- या आंदोलनाचे नेतृत्व भाजपचे शहराध्यक्ष प्रवीण दटके यांनी केले.
- या आंदोलनात महिलांसह युवा मोर्च्याच्या शिवाणी दाणी,आमदार कृष्णा खोपडे आणि भाजपाचे प्रवक्ते गिरीश व्यास यांनीही सहभाग घेतला.
- मलिक यांच्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली.
- नवाब मलिक यांनी देशद्रोह केला.
- त्यामुळं त्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा, अन्यथा हे आंदोलन तीव्र होणार असल्याचा इशारा दाणी यांनी दिलाय.
मलिकांविरुद्ध पुण्यात आंदोलन
- अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर भाजप आक्रमक झाले आहे.
- दहशतवादी दाऊद इब्राहिम यांच्याशी संबध असलेल्या देशद्रोही नवाब मलिक यांचा धिक्कार असो असे फलक घेत, पुणे भाजपाच्या नेत्यांनी आज आंदोलन केल.
- यावेळी अल्पसंख्याक मंत्री पदावरून मालिका यांची हकालपट्टी करावी अशी मागणी केली आहे.
- पुणे भाजपाचे शहर अध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली पुणे मनपाबाहेर हे आंदोलन करण्यात आले.
- नवाब मलिक यांना ईडीने अटक केल्यानंतर त्यांना केबिनेट मंत्री राहण्याचा अधिकार नाही.
- महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी तातडीने त्यांचा राजीनामा घ्यावा.
- अन्यथा आम्हाला आंदोलन करावे लागतील असा इशारा भाजपाचे आमदार चंद्रकांत पाटील यांनी दिला होता.
अमरावतीत मलिकांविरुद्ध आंदोलन
- मलिक यांचा राजीनामा घ्यावा, या मागणीसाठी भाजपाने आज अमरावतीच्या राजकमल चौकात आंदोलन केले.
- दरम्यान यावेळी भाजप कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला.
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी तात्काळ नवाब मलिक यांची हकालपट्टी करावी, ही मागणी करण्यात आली.
- यावेळी भाजपाने महाविकास आघाडी सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केल्यात.
- त्यावेळी भाजप नेते अनिल बोंडे आणि महिला पोलीस अधिकारी निलिमा आरज यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली.
- यावेळी शाब्दिक बाचाबाची करत असताना मात्र अनिल बोंडे यांची महिला अधिकाऱ्याशी बोलताना जीभ घसरली.