मुक्तपीठ टीम
भाजपने पुढच्या वर्षी असलेल्या मुंबई मनपाच्या निवडणुकीसाठी आतापासूनच जोरदार मोर्चेबांधणी सुरु केल्याचे दिसत आहे. मनपातील भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांच्यामागोमाग आता भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनीही मुंबई मनपाच्या आर्थिक स्थितीच्या मुद्द्यावर शिवसेनेला लक्ष्य केले आहे. भाजपने २०१७मध्ये राहिलेली कसर २०२२मध्ये भरून काढण्यासाठी वर्षभर आधीच शिवसेनाला लक्ष्य करत मिशन मुंबई सुरु केले आहे. मनपातील कारभारावर आरोप करत शिवसेनेला संशयाच्या जाळ्यात ओढण्याची भाजपची रणनीती असल्याचे मानले जाते. त्यासाठी भाजपचे नेते आक्रमकतेने सक्रिय झाले आहेत.
आमदार आशिष शेलार यांनी आज केलेले ट्वीट चर्चेचा विषय झाले आहेत. त्यांचे ट्वीट्स पुढीलप्रमाणे आहेत:
ट्वीट -१
मुंबई महापालिकेच्या 2020-21च्या अर्थसंकल्पाची सद्यस्थिती अत्यंत गंभीर.. 1 एप्रिल 2020 ते 31 डिसेंबर 2020 पर्यंत अंदाजित उत्पन्नाच्या केवळ 25% उत्पन्न जमा!
वा, रे वा सत्ताधारी..
श्रीमंत पालिकेला दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आणली
हीच का ती तुमची, करुन दाखवलेली कामगिरी!!

1/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 30, 2021
ट्वीट -२
बिल्डरांना प्रीमियममध्ये 50% सूट, कंत्राटदारांना सुरक्षा/ अनामत रक्कम, कामगिरी हमीत सूट, जाहिरातदारांना अनुज्ञापन शुल्कात 50% सूट, हॉटेल मालकांना मालमत्ता करात तिमाहीसाठी 100% सूट…ताजला सूट..
सत्ताधीशांचा धनदांडग्यांवर सवलतीचा पाऊस
अन् महापालिकेच्या तिजोरीची लूट! 2/2
बिल्डरांना प्रीमियममध्ये 50% सूट, कंत्राटदारांना सुरक्षा/ अनामत रक्कम, कामगिरी हमीत सूट, जाहिरातदारांना अनुज्ञापन शुल्कात 50% सूट, हॉटेल मालकांना मालमत्ता करात तिमाहीसाठी 100% सूट…ताजला सूट..
सत्ताधीशांचा धनदांडग्यांवर सवलतीचा पाऊस
अन् महापालिकेच्या तिजोरीची लूट!
2/2— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 30, 2021
ट्वीट -३
सामान्य मुंबईकरांना 2015 ते 2020 पर्यंत मालमत्ता करातून वगळण्यात आले. मात्र आता सर्व 500 चौ. फु.पेक्षा कमी क्षेत्रफळाच्या घर मालकांना मालमत्ता कराच्या दहापैकी नऊ कर हे थकबाकीसह भरावे लागणार!
मदत म्हणून काही दिले तर नाहीच,
उलट
सामान्य मुंबईकरांच्या पाकीटमारीचा कार्यक्रम सुरु
3/3

3/3— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) January 30, 2021
भाजपचे मनपातील गटनेते प्रभाकर शिंदे यांनीही मनपात शिवसेनेविरोधात आघाडी उघडली आहे. सभागृहात आणि सभागृहात शिवसेनेच्या कारभाराला लक्ष्य करीत संशयाच्या भोवऱ्यात आणण्याच्या रणनीतीवर भाजप काम करीत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे. भाजपच्या रणनीतीविरोधात शिवसेना नेमकी काय रणनीती ठरवते, यावर आता मनपा वर्तुळात चर्चा रंगली आहे.
क्लिक करा आणि वाचा: भाजप गटनेते प्रभाकर शिंदे यांनी कसे केले शिवसेनेला लक्ष्य
“मुंबई मनपा अर्थसंकल्पाची दिवाळखोरीकडे वाटचाल,” पहारेकरी भाजप आक्रमक! – मुक्तपीठ (muktpeeth.com)