मुक्तपीठ टीम
बिस्लेरी हा भारतातील सर्वाधिक विश्वासाच्या मिनरल वॉटर ब्रॅण्ड म्हणून ओळखला जातो. देशात सध्या पसरलेल्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत बिस्लेरी आपल्या टीमसाठीही विश्वासाचं नात वाढवत आहे. बिस्लेरीने आपले कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय यांचे कोरोनापासून संरक्षण करण्यासाठी अनेकविध उपक्रम सुरू केले आहेत. कंपनीने कर्मचाऱ्यांना ओझोन थेरपी उपचार पुरवले आहेत तसेच ३ लाख रुपयांपर्यंतचे कोरोना विमा संरक्षणही दिले आहे.
कंपनीने कोरोना इन्शुरन्स पॉलिसी आणि कोरोना डेथ इन्शुरन्स पॉलिसी अशा दोन पॉलिसींची घोषणा केली आहे. सर्व कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांना कोरोना झाल्यास वैद्यकीय खर्चासाठी प्रत्येकी ३ लाख रुपयांपर्यंत विमा संरक्षण दिले जाणार आहे आणि हे संरक्षण कोरोना इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत दिले जाणार आहे. कंपनीमध्ये कंत्राटी स्वरूपाची नोकरी करत असलेल्या कर्मचाऱ्यांनाही हीच पॉलिसी लागू आहे.
बिस्लेरीतील पे-रोलवरील कर्मचाऱ्याचा कोरोनाने मृत्यू झाल्यास त्यांच्या कुटुंबियांना कर्मचाऱ्याचे तीन वर्षांचे वेतन किंवा ३५ लाख रुपये यापैकी जी रक्कम कमी असेल ती, कोविड डेथ इन्शुरन्स पॉलिसी अंतर्गत दिली जाईल. कंपनीने ही पॉलिसीदेखील कंत्राटी कर्मचाऱ्यांना लागू केली आहे. कोरोना साथीच्या पहिल्या लाटेत व्यवसाय सुरू राहावा तसेच उत्पादन कारखान्यांतील कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची काळजीही घेतली जावी या उद्देशाने कंपनीने नजीकच्या काही मालमत्तांच्या मालकांशी सहयोग करून कर्मचाऱ्यांच्या निवासाची सोय केली होती. या जागा सुरक्षिततेच्या सर्वोच्च मानकांचे पालन करून नियमितपणे निर्जंतुक केल्या जात आहेत.
मिनरल वॉटर हे अत्यावश्यक वस्तू व सेवा प्रवर्गामध्ये येत असल्याने कंपनीला लॉकडाउनच्या काळात काम सुरू ठेवण्याची परवानगी आहे. म्हणूनच कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेसाठी व कल्याणासाठी जास्तीचे काही केले पाहिजे असे कंपनी व्यवस्थापनाला वाटत होते.
काय आहे ओझोन थेरपी?
• कर्मचाऱ्यांच्या कल्याणाच्या दिशेने टाकलेले पहिले पाऊल म्हणजे त्यांची रोगप्रतिकारक्षमता वाढवण्यासाठी ओझोन थेरपी देणे हे होय.
• कंपनीच्या ३२० कर्मचाऱ्यांना ओझोन शॉट्स देण्यात आले.
• ओझोन थेरपी ही एक सहाय्यकारी उपचारपद्धती आहे.
• शरीराची प्रतिकारक्षमता व आजाराशी लढण्याची क्षमता सुधारण्यात ही थेरपी मदत करते.
• ओझोन थेरपी अविश्वसनीयरित्या शरीराचा कायापालट करते, शरीर सामान्य स्थिती आणते, विषमुक्त करते, पुनरुज्जीवन करते आणि शारीरिक व मानसिक ऊर्जा वाढवण्याचे कामही करते. या कर्मचाऱ्यांचा पुढील ६ महिने फॉलोअप ठेवण्यात आला आणि असे लक्षात आले की या ३२० जणांपैकी केवळ २ टक्के जणांना कोरोनाची लागण झाली.
• कोरोना झालेल्यांमध्ये अत्यंत सौम्य लक्षणे होती किंवा लक्षणेच आढळली नाहीत.
• एकंदर या थेरपीची परिणामकारकता ९८ टक्के दिसून आली.
• या उपक्रमाच्या माध्यमातून कंपनीला आपल्या कर्मचाऱ्यांना कोरोना साथीशी लढण्यासाठी प्रतिबंधात्मक आरोग्यसेवा द्यायची आहे.
कर्मचाऱ्यासोबत बिस्लेरी!
• कर्मचाऱ्यांना सर्वोच्च प्राधान्य देणारी कंपनी म्हणून बिस्लेरीला आपल्या टीम सदस्यांच्या पाठीशी खंबीर उभे राहणे आवश्यक वाटते.
• कर्मचारी किंवा त्यांच्या कुटुंबियांपैकी कोणी कोविड पॉझिटिव्ह आल्यास त्याला/तिला ‘कोणताही प्रश्न न विचारता’ रजा देण्याचे धोरण हे कर्मचाऱ्यांना मानसिक व नैतिक बळ देण्याच्या दिशेने टाकलेले एक पाऊल आहे.
• एखाद्या कर्मचाऱ्याची निवासी इमारत कोरोना रुग्ण आढळल्याने सील करण्यात आली असेल, तरीही रजेचे हेच धोरण लागू केले जाते.
कर्मचाऱ्यांच्या कल्याणासाठी बिस्लेरीचा पुढाकार
• आपल्या कर्मचारी कल्याण कार्यक्रमात प्राधान्य दिल्या जाणाऱ्या घटकांमध्ये बिस्लेरीने मानसिक आरोग्य या घटकाचा समावेश केला आहे आणि लाइफ मेंटॉर्सची नियुक्ती केली आहे.
• कोणताही कर्मचारी त्याला गरज भासल्यास या लाइफ मेंटॉरकडे मदत मागू शकतो.
• कर्मचाऱ्यांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी कंपनी वर्क फ्रॉम होम आणि रोटेशनवर आधारित शिफ्ट्स व्यवस्थेला उत्तेजन देत आहे, जेणेकरून कर्मचाऱ्यांचा प्रत्यक्ष संपर्क मर्यादित राहील. यामुळे कर्मचाऱ्यांच्या उत्पादनक्षमतेत समतोल साधला जातो आणि त्यांच्या स्वास्थ्याच्या दृष्टीनेही हे चांगले ठरत आहे.
• याशिवाय कंपनी स्वास्थ्य व मानसिक आरोग्य या विषयांवर नियमितपणे चर्चासत्रांचे आयोजन करत आहे.
• आपत्कालीन वैद्यकीय समस्या हाताळण्यासाठी कंपनीच्या इन-हाउस डॉक्टर डॉ. मिली शहा यांच्या नेतृत्वाखाली २४x७ कन्सल्टेशन सुविधा सुरू करण्यात आली आहे.
• कोरोनाविषयक विविध नियमांबाबत कर्मचाऱ्यांना माहिती सहज उपलब्ध व्हावी म्हणून एक अंतर्गत पोर्टलही तयार करण्यात आले आहे.
सर्व कर्मचाऱ्यांना संरक्षण
• अगदी शेवटच्या कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांना सुरक्षितता व संरक्षण पुरवण्यासाठी बिस्लेरीतील डिलिव्हरी कर्मचाऱ्यांनाही ग्लोव्ह्ज, शील्ड्स, मास्क आणि पीपीई किट्स देऊन सुसज्ज करण्यात आले आहे.
• बिस्लेरीने आपल्या आस्थापनांमध्ये व कार्यालयांमध्ये कर्मचारी व अभ्यागतांचे निर्जंतुकीकरण करण्याच्या उद्देशाने ओझोन टनेल्स बसवली आहेत.
• जेणेकरून त्यांच्या कार्यस्थळांचे या प्राणघातक विषाणूपासून संरक्षण होऊ शकेल.
बिस्लेरीचं कर्मचाऱ्यांशीही विश्वासाचं नातं
बिस्लेरी इंटरनॅशनल प्रायव्हेट लिमिटेडमधील इनेबलमेंट विभागाचे संचालक पराग बेंगाली या उपक्रमांबद्दल म्हणाले, “बिस्लेरीमध्ये आमच्यासाठी कर्मचारी सर्वांत महत्त्वाचे आहे. संपूर्ण देश आजही कोरोना साथीविरोधातील लढाई लढत असताना, आमच्या कर्मचाऱ्यांचे शारीरिक व मानसिक आरोग्य जपणे आमच्यासाठी सर्वाधिक महत्त्वाचे झाले आहे. आमच्या कर्मचाऱ्यांना या कठीण परिस्थितीतून एकत्रितपणे वाट काढण्यात मदत करणे आणि बिस्लेरीला त्यांची काळजी आहे हे दाखवून देणे हाच या सर्व उपक्रमांमागील उद्देश आहे. या संकटकाळात आपण सगळे एकत्र आहोत, कसोटीच्या काळात त्यांची कंपनी त्यांच्या पाठीशी आहे हाच संदेश आम्हाला आमच्या कर्मचाऱ्यांना द्यायचा होता.”
पाहा व्हिडीओ: