Tuesday, May 13, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

भिवंडीत खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगच्या अॅल्युमिनियम फॉइल कंपनीवर धाड! ISI चिन्हाचा गैरवापर!! अशी करा तक्रार…

July 11, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
BIS Raid on Aluminum Foil Company for Misuse of ISI symbol

मुक्तपीठ टीम 

भारतीय मानक ब्युरोच्या मुंबई विभागाने भिवंडीतील एखा खाद्यपदार्थांच्या पॅकेजिंगसाठी वापरण्यात येणाऱ्या अॅल्युमिनियम फॉइलच्या कंपनीवर धाड धाड घातली. तेथून माल जप्त करण्यात आला आहे. त्या कंपनीद्वारे गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे उल्लंघन करत ISI चिन्हाचा गैरवापर केल्याचा आरोप आहे.

ठाण्यातील भिवंडी येथे मुंबईच्या पथकाने छापे टाकत जप्तीची कारवाई केली. कंपनीच्या ठिकाणी छापे टाकल्यानंतर, भिवंडीच्या वाल गावातील प्रितेश कॉम्प्लेक्समधील अलका लाईफस्टाईल प्रायव्हेट लिमिटेडने १३ फेब्रुवारी २०२०रोजी जारी करण्यात आलेल्या गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे उल्लंघन केलेले आढळले. यावेळी आयएस १५३९२ नुसार १२ इंच आकाराचे २७००पेक्षा जास्त अॅल्युमिनियम फॉइल जप्त करण्यात आले.

गैरवापरास कडक शिक्षा

भारतीय मानक ब्युरोच्या मानक चिन्हाचा गैरवापर केल्यास भारतीय मानक ब्युरो कायदा २०१६ नुसार दोन वर्षांपर्यंत तुरुंगवास किंवा किमान २ लाख रुपये दंडाची किंवा दोन्ही प्रकारच्या शिक्षा होऊ शकतात.या कायद्याचे उल्लंघन केल्याप्रकरणी न्यायालयात खटला दाखल करण्याची कार्यवाही सुरू आहे.ही छापे आणि जप्तीची कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यांच्या पथकामध्ये सायंटीस्ट – C पदावरच्या निशिकांत सिंह आणि आशिष वाकळे यांचा समावेश होता.भारतीय मानके १५३९२नुसार “ खाद्यपदार्थ पॅकेजिंगसाठी अ‍ॅल्युमिनियम आणि अॅल्युमिनियम मिश्र धातु बेअर फॉइल” वरील गुणवत्ता नियंत्रण आदेशाचे उल्लंघन तपासण्यासाठी ही मोहीम हाती घेण्यात आली होती.

बनावट आयएसआय चिन्हांकित उत्पादने तयार करून ग्राहकांना मोठ्या नफ्यासाठी विकली जात असल्याचे अनेक वेळा निदर्शनास आले आहे. खरेदी करण्यापूर्वी http://www.bis.gov.in या भारतीय मानक ब्युरोच्या संकेतस्थळाला भेट देऊन उत्पादनावर आयएसआय चिन्हाची सत्यता तपासावी अशी विनंती सर्वाना करण्यात येत आहे.

नागरिकांना विनंती करण्यात येते की, त्यांना कोणत्याही उत्पादनावर आयएसआय चिन्हाचा गैरवापर केल्याचे आढळल्यास,ही माहिती प्रमुख ,एमयुबीओ -II, पश्चिम क्षेत्रीय कार्यालय, भारतीय मानक ब्युरो, दुसरा मजला, एनटीएच (WR), प्लॉट क्रमांक एफ -१०, एमआयडीसी, अंधेरी (पूर्व ), मुंबई – ४०००३९.येथे कळवावी. hmubo2@bis.gov.in या पत्त्यावर ई-मेलद्वारेही अशा तक्रारी करता येतील. अशा माहितीचा स्रोत गोपनीय ठेवला जाईल


Tags: Aluminium Foil CompanyBhiwandiBureau of indian StandardsISIMumbai Departmentअॅल्युमिनियम फॉइल कंपनीभारतीय मानक ब्युरोभिवंडीमुंबई विभाग
Previous Post

शिंदे मंत्रिमंडळ विस्ताराआधीच वाद: भाजपाला जयस्वाल नको, आरपीआयला मनसे!

Next Post

महाराष्ट्रात ED, गोव्यात UD! गोव्यात ‘महाराष्ट्र’ होता होता पुढे गेला?

Next Post
महाराष्ट्रात ED, गोव्यात UD! गोव्यात ‘महाराष्ट्र’ होता होता पुढे गेला?

महाराष्ट्रात ED, गोव्यात UD! गोव्यात 'महाराष्ट्र' होता होता पुढे गेला?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!