मुक्तपीठ टीम
प्लास्टिक म्हणजे असून अडचण नसून खोळंबा! प्लास्टिकशिवाय अनेक कामे होत नाहीत. अनेक कामांमध्ये ते खूपच उपयोगी ठरते. मात्र, त्याचवेळी त्याचे अतिदीर्घकाळापर्यंत विघटन होत नसल्याने प्रदूषणकारी म्हणून भलतीच अडचण करणारेही ठरते. त्यामुळेच भारतात लागलेला नव्या बायोडिग्रेडेबल प्लास्टिकचा शोध दिलासा देणारा आहे. हे प्लास्टिक तांदळाच्या स्टार्चपासून तयार केले जाईल. तसेच ते बायोडिग्रेडेबल असल्याने त्याचे सहज विघटन होईल. म्हणजे प्लास्टिकचा फायदा आणि प्रदूषणाचा धोका नाही! शेतकऱ्यांचा फायदा वेगळाच!!
प्लास्टिकचा फायदा, निसर्गाला धोका नाही!
- रायपूरच्या इंदिरा गांधी कृषी विद्यापीठाने तांदळाच्या स्टार्चपासून बायोडिग्रेडेबल (नैसर्गिक) पॉलिथीन किंवा प्लास्टिक तयार करण्याचा शोध लावला आहे. याची सुरुवातीची चाचणी विद्यापीठाच्या जैवतंत्रज्ञान विभागात संशोधनादरम्यान यशस्वी झाली आहे.
- कृषी विद्यापीठ आणि भाभा अणुसंशोधन केंद्र, मुंबई, म्हणजेच बीएआरसी यांच्यात तीन वर्षांचा संयुक्त संशोधन करार करण्यात आला आहे.
- यामुळे वापरात असलेल्या उत्पादनाचे अपग्रेडेशन होईल आणि ते बाजारात येईल.
- जेव्हा हे बायोडिग्रेडेबल प्लास्टिक जमिनीत पुरले जाते, तेव्हा ते आपोआप कंपोस्टमध्ये विघटित होईल. ज्याचा बागांमध्ये किंवा पिकांमध्ये फायदा होईल. यामुळे पर्यावरणाचे रक्षण होईल.
- यापासून बनवलेल्या प्लास्टिक पिशवीमध्ये फळे आणि भाज्या, इतर घरगुती वस्तू आणण्याबरोबरच गरम अन्नही पॅक करता येते.
पर्यावरणस्नेही प्लास्टिकची उत्पादन तयार करण्याचे बीएआरसीद्वारे संशोधन
- संशोधनाशी संबंधित शास्त्रज्ञांच्या मते, कृषी विद्यापीठात वापरल्यानंतर बनवलेल्या पॉलिमर फिल्मवर कंपोस्टेबल बायोडिग्रेडेबल पॉलीबॅग तयार करण्यासाठी बीएआरसीमध्ये संशोधन केले जाईल.
- विद्यापीठाकडे सध्या कंपोस्टेबल बायोडिग्रेडेबल कॅरीबॅग तयार करण्यासाठी मशीन नाही, त्यामुळे त्याचे संशोधन तसेच उत्पादन बीएआरसीच्या मदतीने केले जाईल.
- बीएआरसीकडे अत्याधुनिक मशीन्स आहेत जी कृषी विद्यापीठाच्या प्राथमिक प्रयोगानंतर तयार केलेल्या पॉलिमर फिल्मची जाडी आणखी कमी करेल. ज्यामुळे ती सार्वजनिक वापरासाठी बायोडिग्रेडेबल कॅरीबॅग बनवेल.
- या कॅरीबॅगचे उत्पादन सहा महिन्यात किंवा वर्षभरात केले जाईल असा दावा केला जात आहे.
- त्यानंतर कंपन्यांशी बोलून त्याच्या व्यावसायिक उत्पादनाची तयारी केली जाईल.
यापूर्वी विद्यापीठात मक्यातून काढलेल्या स्टार्चपासून पॉलिथीन बनवण्याचा यशस्वी प्रयोग करण्यात आला आहे. मात्र, छत्तीसगडमध्ये पॉलिमरची जाडी जास्त आणि मक्याच्या तुलनेने कमी उत्पादन यामुळे या पिशव्यांची किंमत कमी करण्यात यश मिळू शकले नाही. या कारणास्तव, आता ते तांदळावर वापरले गेले कारण त्याचे उत्पादन राज्यात जास्त आहे. राज्य सरकारच्या हेतूनुसार, तांदळापासून इथेनॉल आणि प्रोटीन पावडर बनवण्याचे काम छत्तीसगडमध्ये आधीच सुरू आहे.
बायोडिग्रेडेबल प्लास्टिक म्हणजे काय?
- बायोडिग्रेडेबल प्लास्टिक नैसर्गिक साहित्य किंवा पेट्रोकेमिकल संसाधनांपासून बनवलेले पर्यावरणस्नेही उत्पादन.
- यामध्ये सामान्य प्लास्टिकप्रमाणे रसायने नसतात.
- तसेच, बायोडिग्रेडेबल प्लास्टिक सामान्य प्लास्टिकपेक्षा महाग आहे.
- कृषी विद्यापीठ त्याची किंमत कमी ठेवण्यावरही काम करत आहे.
- तांदळाच्या स्टार्चपासून बायोडिग्रेडेबल पॉलिथीन किंवा प्लास्टिक बनवण्यासाठी संशोधन केले जात आहे.
- यासाठी बीएआरसीसोबत तीन वर्षांचा करार करण्यात आला आहे.
पहिल्यांदा तांदळातून स्टार्च काढले जाते. त्यात अनेक प्रकारचे अम्ल टाकले जातात. त्यानंतर त्याचे योग्य तापमान आणि दाबाने मशीनमध्ये पॉलिमर बनवले जाते. मग ते फिल्मच्या स्वरूपात पसरवले. यानंतर फिल्मला प्लास्टिक म्हणून बनवले जाते.