मुक्तपीठ टीम
बिहारचे माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांनी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो म्हणजेच एनसीबीचे मुंबईतील प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांच्या प्रकरणात उडी घेतली आहे. त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे कौशल्य विकास मंत्री नवाब मलिक यांनी आरोप केलेल्या वानखेडेंच्या जातीबद्दलच्या मुद्द्यावर ट्वीट केले आहे. मांझी यांनी समीर वानखेडे यांची तुलना काँग्रेसचे पंजाबमधील खासदार मोहम्मद यांच्याशी केली. जितन मांझी यांनी खासदार सादिक अली यांच्याप्रमाणेच समीर वानखेडेंनीही दलिताचा हक्क हडपला का, असा प्रश्न विचारला आहे.
जितन मांझी यांनी ट्विट केले की, “लग्नाच्या वेळी समीर वानखेडे मुस्लिम होता तर आता ते दलित कसा झाला? पंजाबच्या फरीदकोट अनुसुचित जातींसाठी राखीव मतदारसंघातून निवडून आलेले काँग्रेस खासदार मो. सादिक अली बनावट प्रमाणपत्र असलेले दलित आहेत का? असे लोक आरक्षणाचा डल्ला मारून SC/ST/OBC वर्गातील लोकांचे हक्क हिरावून घेत आहेत.”
यदि समीर वानखेडे अपने शादी के समय मुस्लिम थें तो अब दलित कैसे बन गएं?
कही ये पंजाब के आरक्षित सीट फरीदकोट(SC) के.@INCIndia सांसद मो.सादिक अली टाईप फर्जी सर्टिफिकेट वाले दलित तो नहीं?
ऐसे ही लोग आरक्षण की डकैती कर SC/ST/OBC वर्ग के लोगों का अधिकार छिन रहें हैं।@nawabmalikncp pic.twitter.com/aGA2rQSFog— Jitan Ram Manjhi (@jitanrmanjhi) October 27, 2021
समीर वानखेडे यांची दुहेरी चौकशी
- नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (NCB) मुंबईचे प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांची एनसीबीच्या दक्षता विभागाचे पाच सदस्यीय पथक चौकशी करत आहे.
- त्याचवेळी राज्य सरकारच्या आदेशानुसार मुंबई पोलिसांचे सहाय्यक आयुक्त मिलिंद खेतले यांच्या नेतृत्वाखालील टीमही चौकशी करत आहे.
- वानखेडे यांनी क्रुझवरील पार्टीतून बॉलीवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसह अन्य काही आरोपींना अटक केली होती.
- त्यानंतर त्यांनी निवडलेल्या साक्षीदारांपैकी एक प्रभाकर साईल यांनी वानखेडेंसह इतर काही पंचांवर २५ कोटीच्या खंडणी वसुलीचे आरोप केले.
नवाब मलिक यांचे समीर वानखेडेंवर गंभीर आरोप
- राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री नवाब मलिक सातत्यानं एनसीबी अधिकारी समीर वानखेडेंवर गंभीर आरोप करत आहेत.
- त्यांनी बुधवारी नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (NCB) प्रादेशिक संचालक समीर वानखेडे यांचा कथित ‘निकाहनामा’ (मुस्लिम विवाह प्रमाणपत्र) सादर करून मुसलमान असूनही अनुसुचित जातीचे फायदे उकळल्याचे नवीन आरोप केलेत.
- वानखेडेंच्या पत्नी आणि बहिणीने सर्व आरोप फेटाळले.
- मलिक यांनी समीर दाऊद वानखेडे यांच्या डॉक्टर शबाना कुरेशी यांच्यासोबतच्या पहिल्या लग्नाचा ‘निकहनामा’ आणि ‘स्वीट कपल’ लग्नाचा फोटो पोस्ट केला.
- त्यांचा निकाह अंधेरी पश्चिम येथील लोखंडवाला कॉम्प्लेक्समध्ये ७ डिसेंबर २००६ रोजी रात्री ८ वाजता झाला होता.
- त्यामुळे सातत्यानं पुराव्यांसह होणाऱ्या आरोपांबद्दल समाधानकारक स्पष्टीकरण देणं वानखेडे कुटुंबियांना जड जाताना दिसत आहे.
- त्यातच एनसीबीची अंतर्गत आणि मुंबई पोलिसांचीही, अशा दोन चौकशांना तोंड द्यावे लागत आहे.