मुक्तपीठ टीम
आज लग्नाच्या हंगामाआधी सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल झाला आहे. आज गुरुवारी २४ कॅरेट सोन्याचे दर १० ग्रॅममागे ७२७ रुपयांनी वाढले आहेत, तर चांदीच्या किंमतीत ७७२ रुपये प्रति किलो वाढ झाली आहे. इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार, सराफा बाजारात आज २३ कॅरेट सोन्याचे दर १० ग्रॅम ४४,७२७ रुपयांवर गेले, तर २२ कॅरेटची किंमत ४१,१४४ रुपयांवर पोहोचली आहे. तर १८ कॅरेट सोन्याचा दर प्रति १० ग्रॅम ३३,६८८ रुपये आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या वेबसाइटनुसार १ एप्रिल २०२१ रोजी देशभरात सराफा बाजारातील सोन्या-चांदीच्या किंमती खालीप्रमाणे:
धातू |
१ एप्रिल दर (रुपये/१० ग्रॅम) |
३१ मार्च पर्यंत दर (रुपये/१० ग्रॅम) |
दर बदल (रुपये/१०ग्रॅम) |
सोनं ९९९ (२४कॅरेट) | ४४९१७ | ४४१९० | ७२७ |
सोनं ९९९ (२३कॅरेट) | ४४७३७ | ४४०१३ | ७२४ |
सोनं ९९९ (२२कॅरेट) | ४११४४ | ४०४७८ | ६६६ |
सोनं ९९९ (१८कॅरेट) | ३३६८८ | ३३१४३ | ५४५ |
सोनं ९९९ (१४कॅरेट) | २६२७६ | २५८५१ | ४२५ |
चांदी ९९९ | ६३६३४ रुपये/ किलो | सोनं ९९९ (कॅरेट) | सोनं ९९९ (कॅरेट) |
आयबीजेएचे दर देशभरात सर्वसामान्य
आयबीजेएने जारी केलेला दर देशभरात सर्वत्र स्वीकारला जातो. मात्र, या संकेतस्थळावर देण्यात आलेल्या दरामध्ये जीएसटीचा समावेश करण्यात आलेला नाही. सोन्याची खरेदी व विक्री करताना आपण आयबीजेएच्या दराचा संदर्भ घेऊ शकता. बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनच्या मते, इब्जा सध्याचे दर घेऊन देशभरातील १४ केंद्रांकडून सोन्या-चांदीची सरासरी किंमत दर्शविते. सोने-चांदीचा सध्याचा दर किंवा असं म्हणा, त्याचे भाव वेगवेगळ्या ठिकाणी वेगळी असू शकते, परंतु त्यांच्या किंमतींमध्ये थोडा फरक आहे.
इंडिया बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशनने जारी केलेला दर आणि तुमच्या शहराची किंमत ५०० ते १००० रुपयांदरम्यान असू शकते.