मुक्तपीठ टीम
नगरपंचायती आणि जिल्हा परिषद निवडणुकांचे निकाल बुधवारी जाहीर झाले. या निकालांमध्ये राज्यातील नंबर १चे पद म्हणजे मुख्यमंत्रीपद हाती असलेला शिवसेना पक्ष चौथ्या क्रमांकावर गेल्याचे दिसले. तर विरोधातील भाजपा आणि सत्तेतील नंबर २च्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नंबर १ कोण यावरून वाद रंगला. काँग्रेसने तिसरा क्रमांक मिळवला आहे. एकीकडे ही निकालानंतरही धुळवड सुरु असतानाच दुसरीकडे मतदारांनी शांतपणे काही मोठ्या नेत्यांना मोठेच धक्के दिल्याचे दिसत आहे. एकनाथ खडसे, प्रुफुल्ल पटेल, नाना पटोले, नारायण राणे, छगन भुजबळ यांना त्यांच्याच प्रभावक्षेत्रातील नगरपंचायती, जिल्हा परिषदा राखता आलेल्या नाहीत. त्यामुळे नेते मोठे पण मतांचे तोटेच असल्याचे दिसून आले आहे.
प्रफुल्ल पटेल – नाना पटोले
गोंदियात भाजपाला एकूण ५३ जागांपैकी २६ जागांवर विजय मिळाला आहे. गोंदियात राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आणि काँग्रेस नेते नाना पाटोले यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.गोंदिया जिल्ह्यात जिल्हा परिषदेच्या एकूण ५३ जागा आहेत. भाजपाला या ठिकाणी २६ जागांवर विजय मिळाला. काँग्रेसला १४ जागा, तर राष्ट्रवादी काँग्रेसला फक्त ८ जागांवर समाधान मानावे लागले. अपक्ष ५ जागांवर निवडूण आलेत.त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस तसेच काँग्रेसला मोठा धक्का लागला आहे.
गोपीचंद पडळकर
माध्यमांवर असा एकही दिवस नसतो जेव्हा भाजपा नेते पडळकरांच्या बातम्या दाखवल्या जात नाही ,मात्र असताना पडकरांना स्वत:च्याच नगरपंचायतीत एकही जागा मिळाली नाही आहे. गोपीचंद पडळकर यांच्या खानापूर नगर पंचायतीत भाजपाला एकही खातं उघता आले नाही. खानापूर नगर पंचायत निवडणुकीत शिवसेना-काँग्रेसला ९ तर विरोधातील राष्ट्रवादी काँग्रेस प्रणित जनता आघाडीला ७ जागा मिळाल्या आहेत. तर एक अपक्ष उमेदवार निवडून आलाय. मात्र, भाजपला याठिकाणी एकही जागा जिंकता आली नाही.
छगन भुजबळ – भारती पवार
निफाडमध्ये शिवसेनेचे माजी आमदार अनिल कदम हे आपली प्रतिष्ठा टिकवण्यात यशस्वी ठरले आहेत. येथे शिवसेने सर्वाधिक सात जागांवर विजय मिळवला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान आमदार दिलीप बनकरांनाही धक्का मिळाला असून भाजपाला साधा भोपळाही फोडता आला नाही.
नारायण राणे
सिंधुदुर्गात भाजपला मोठा धक्का बसला आहे. सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकांमध्ये भाजपाच्या सिद्धिविनायक पॅनलनं म्हणजेच नारायण राणेंना मोठा विजय मिळाला असला तरी नागरपंचायत निवडणुकांमध्ये नारायण राणेंना पराभव स्विकारावा लागला आहे. याठिकाणी चारपैकी दोन नगरपंचायतींमध्ये शिवसेना आणि काँग्रेसला यश आले आहे. राष्ट्रवादी काँग्रेसने एका जागेवर विजय मिळवला आहे. भाजपानेही आठ जागांवर विजय मिळवला असला तरी शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र आल्यामुळे देवगड नगरपंचायतीवर त्यांची सत्ता येईल.
कुडाळमध्येही अवघ्या एका जागेने ही नगरपंचायत शिवसेना-काँग्रेसच्या ताब्यात गेली आहे. कुडाळ नगरपंचायतीमध्ये भाजपने ८ जागांवर विजय मिळवला. तर शिवसेनेला ७ आणि काँग्रेसला दोन जागा मिळाल्या.
एकनाथ खडसे
जळगावच्या मुक्ताईनगर तालुक्यातील बोदवड नगरपंचायत निवडणुकीच्या माध्यमातून राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे, भाजपचे गिरीश महाजन, शिवसेनेचे पालकमंत्री गुलाबराव पाटील या दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकीचे निकाल समोर आले असून एकनाथ खडसे यांना मोठा धक्का बसला आहे. शिवसेनेनं नगरपंचायतीवर भगवा फडकावला आहे.या निवडणुकीत शिवसेनेने १७ पैकी नऊ जागांवर विजय मिळवला आहे, एक जागा भाजपकडे गेली. राष्ट्रवादीचा केवळ ७ जागांवर विजय मिळवता आला.
अनिल परब
यातही अनिल परब पालकमंत्री असलेल्या रत्नागिरीत शिवसेनेला दापोली आणि मंडणगडमध्ये फटका बसला. एकेकाळी शिवसेनेचा बालेकिल्ला असणाऱ्या रत्नागिरीत यावेळी दापोलीत राष्ट्रवादी सर्वाधिक जागा मिळवत नंबर १ पक्ष झाला तर मंडणगडमध्ये शिवसेनेच्या अधिकृत उमेदवारांचा सपशेल पराभव करत रामदास कदम समर्थित शिवसेना बंडखोर निवडून आले.जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल परब विरुद्ध माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांची या निवडणुकीत ठिकाणी प्रतिष्ठा पणाला लागली होती