मुक्तपीठ टीम
कोरोना संकटाच्या दुसरी लाट महालाट ठरतेय. अतिवेगाने वाढणाऱ्या संसर्गाची साखळी तोडण्यासाठी कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. मात्र, अनेक प्रभावशाली मंडळी त्यांचा भंग करतानाही दिसत आहेत. त्यासाठी पुन्हा ते आधार घेत आहेत, ते निवडणुकांसाठी कोरोना सुरक्षा नियमांचा भंग करणाऱ्या राजकारण्यांचीच. तरीही त्यांना न जुमानता अनेक अधिकारी आणि कर्मचारी सिंघमगिरी करून व्हीआयपी असो की सेलिब्रिटी सर्वांनाच वठणीवर आणण्याचा प्रयत्न करताना दिसत आहेत. त्यात त्रिपुरासारख्या घटनेत तर कडक कारवाई करणाऱ्या अधिकाऱ्यालाच लक्ष्य केले गेले. क्षमाही मागावी लागली. त्यामुळेच त्यांची कामगिरी लोकांसमोर मांडणे आवश्यक आहे.
पहिले उदाहरण त्रिपुरामधील आहे. तेथे निर्बंधांदरम्यान मोठे विवाहसोहळे सुरूच आहे. अशा विवाह सोहळ्याचे दोन व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले आहेत. पश्चिम त्रिपुराच्या जिल्हाधिकाऱ्यांनी दोन वेगळ्या विवाह सोहळ्यांवर छापा टाकला, तेथे कोरोना नियमांचे उल्लंघन होत होते. यावेळी त्यांनी रागाच्या भरात लग्नाचा हॉल सील केलाच तर, कोरोना नियमांचे उल्लंघन केल्याबद्दल त्यांच्यावर कारवाईही केली.
एवढेच नव्हे तर, लग्नाच्या कार्यक्रमात सामील असलेले वधू आणि वरसह त्यांचे नातेवाईक यांच्यावर महामारीचा कायदा, आपत्ती व्यवस्थापन कायदा आणि नाईट कर्फ्यूचे उल्लंघन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे निर्देश यादव यांनी एकला चपराकही लगावली. वधूलाही मंचावरुन बाहेर काढण्यास सांगितले. खरंतर बेकायदा कार्यक्रम करणाऱ्यांवर कारवाई करणे गैर नाही. पण तेच लक्ष्य झाले. ते जरा जास्तच कडक वागल्यामुळे.
दुसऱ्या घटनेत अभिनेता जिमी शेरगिलला पंजाबच्या लुधियाना येथे कोरोनाचा कायदा असलेल्या तत्वाच्या उल्लंघनाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. यापूर्वी त्यांच्यावर चित्रपटाच्या शूटिंगसाठी दंड करण्यात आला होता. अभिनेता जिमी शेरगुलने चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सोशल डिस्टन्सिंग तसेच इतर नियमांचे उल्लंघन केल्याने त्याच्यावर ही कारवाई केली गेली आहे.
व्हीआयपी, धनाढ्य असो की सेलिब्रिटी कोरोना नियम पाळत नसतील तर पोलिसांनी, प्रशासनाने कारवाई केलीच पाहिजे. थोडं भान राखावं. पण थोडं चुकलं तर त्यांना लक्ष्य केलं जाऊ नये.
पाहा व्हिडीओ: