Thursday, June 5, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठी भाषा उपकेंद्राचे लवकरच होणार भूमीपूजन- उद्योगमंत्री उदय सामंत

November 25, 2022
in घडलं-बिघडलं
0
uday samant

मुक्तपीठ टीम

चर्नी रोड येथे महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या सहकार्याने उभारण्यात येणाऱ्या मराठी भाषा भवनाचे काम तातडीने सुरु करण्याचे निर्देश विभागाला दिले असून मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची वेळ घेऊन ऐरोली येथील उपकेंद्राचे भूमीपूजनही लवकरच करण्यात येणार असल्याची माहिती उद्योगमंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. मराठी भाषा भवन उभारणीसंदर्भात माहिती देण्यासाठी मंत्रालयात आज पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती त्यावेळी ते बोलत होते.

सामंत पुढे म्हणाले की, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्यासोबत चर्चा करुन या मराठी भाषा भवनाच्या उभारणीत उद्योग विभागाने तत्परता दाखवावी. तसेच उपकेंद्राच्या भूमीपूजनासाठी राज्यातील मान्यवर आणि मराठीतील जेष्ठ साहित्यिकांना आमंत्रित करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

नवी मुंबईत उभारण्यात येत असलेल्या एरोली येथील उपकेंद्रासाठी मराठी भाषा विभागाने आवश्यक निधी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे सुपूर्द केला आहे, तर मराठी भाषाभवन साठी लागणाऱ्या निधीची तरतूद झालेली आहे तसेच आवश्यक त्या सर्व परवानग्या प्राप्त झाल्या आहेत. त्यामुळे या ठिकाणी तत्काळ बांधकाम सुरू करण्याच्या सूचना दिल्या असल्याचे श्री. सामंत यांनी सांगितले.

दरम्यान, आज उद्योगमंत्री सामंत यांनी ऐरोली येथील मराठी भाषा भवन उपकेंद्राच्या जागेची पाहणी केली. तसेच पुढील 15 दिवसांत काम सुरू करण्याची सूचना केली. मराठी भाषा भवन मुख्य केंद्र गिरगाव, जवाहर बाल भवन, चर्नीरोड, मुंबई येथील भूखंडावरील शालेय शिक्षण विभागाचे बांधकाम वगळता रिक्त भूखंडावर उभे राहणार आहे. तर, उपकेंद्र एरोली नवी मुंबई येथे बांधण्यात येणार आहे. मराठी भाषा भवन व मराठी भाषा उपकेंद्रांचे बांधकाम महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून होणार आहे, या दोन्ही ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी केली असून लवकरच कामाला सुरुवात होईल, अशी माहिती श्री. सामंत यांनी दिली.


Tags: Bhumi PujanHappened-BighdalIndustries Minister Uday SamantMaharashtra Industrial Development CorporationMarathi Language Sub-Centremuktpeethउद्योगमंत्री उदय सामंतघडलं-बिघडलंभूमीपूजनमराठी भाषा उपकेंद्रमहाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळमुक्तपीठ
Previous Post

कृषी योजनांच्या केंद्राकडील निधीसाठी भरीव पाठपुरावा करावा- कृषी मंत्री अब्दुल सत्तार

Next Post

चालती गाडी, नांदतं घर, चालू कारखाना…कधीही, कुठेही लागणाऱ्या आगीवर IoT तंत्राचा उपाय!

Next Post
IoT Technology

चालती गाडी, नांदतं घर, चालू कारखाना...कधीही, कुठेही लागणाऱ्या आगीवर IoT तंत्राचा उपाय!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!