मुक्तपीठ टीम
बाळासाहेब ठाकरे यांच्या राष्ट्रीय स्मारकाचे भूमिपूजन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या शुभहस्ते ३१ मार्च २०२१ रोजी सायंकाळी ५.३० वाजता होणार असून या कार्यक्रमाचे विविध माध्यमांद्वारे थेट प्रसारण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीचे अध्यक्ष तथा पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, उद्योग मंत्री सुभाष देसाई आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
हे स्मारक महापौर निवास, शिवतीर्थ, वीर सावरकर मार्ग, दादर येथे उभारले जाणार आहे. या कार्यक्रमाचे थेट प्रसारण https://twitter.com/MMRDAOfficial अथवा www.parthlive.com यावर तसेच माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या https://twitter.com/MahaDGIPR,https://www.facebook.com/MahaDGIPR तसेच सर्व जिल्हा माहिती कार्यालयांच्या ट्विटर आणि फेसबुकवरुन करण्यात येणार आहे.








Subscribe