Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

महापारेषणची नवीन प्रशासकीय इमारत पर्यावरणाचा समतोल राखणारी असावी – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत

March 3, 2022
in सरकारी बातम्या
0
Mahatrasnport new building

मुक्तपीठ टीम

विद्युतक्षेत्र महत्त्वाचे असून विजेची मागणी दिवसेंदिवस वाढत आहे. त्याचे योग्य वितरण करण्यासाठी पारेषण यंत्रणाही सक्षम आहे. महापारेषणच्या नियोजित इमारतीमध्ये वाशी परिमंडळातील सर्व विभागीय कार्यालये एकाच छताखाली येणार असल्यामुळे महापारेषणचे व्यवस्थापन व समन्वय चांगला होईल. त्याचबरोबर पर्यावरण समतोल राखण्यासाठी या इमारतीच्या छतावर रेन वॉटर हार्वेस्टिंग व सौरऊर्जेची यंत्रणा उभारावी, असे प्रतिपादन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी केले.

            

ऐरोली संकुलातील महापारेषणच्या नियोजित प्रशासकीय इमारतीचे भूमीपूजन ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ऊर्जामंत्री डॉ. राऊत बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर महाराष्ट्र राज्य विद्युत सूत्रधारी कंपनीचे मुख्य सल्लागार  उत्तमराव झाल्टे, संचालक (संचलन) अनिल कोलप, संचालक (प्रकल्प) नसीर कादरी, वाशी परिमंडळाचे मुख्य अभियंता  महेंद्र वाळके, मुख्य अभियंता (स्थापत्य) भूषण बल्लाळ, अधीक्षक अभियंता पीयूष शर्मा, श्री मोहन ननवरे उपस्थित होते.

            

प्रास्ताविकात संचालक (संचलन)अनिल कोलप म्हणाले, राज्य भार प्रेषण केंद्र वाशी परिमंडळातील २२ विभागीय कार्यालये एकाच ठिकाणी होणार आहेत. सर्व विभागीय कार्यालये सर्व सुविधायुक्त व पर्यावरणपूरक होणार आहेत. रूफटॉप, रेन वॉटर हार्वेस्टिंग व नैसर्गिक प्रकाश मिळण्यासाठीची व्यवस्था यामध्ये असणार आहे.

            

डॉ. नितीन राऊत म्हणाले, तत्कालीन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाच्या विभाजनानंतर वाशी परिमंडळाचे कार्यालय अपुऱ्या जागेत कार्यान्वित झाले होते. इतर कार्यालयेही ऐरोली संकुलात आहेत. महापारेषणची उद्दिष्ट्ये गाठण्यासाठी एकाच छताखाली सर्व कार्यालये होणार आहेत, ही आनंदाची बाब आहे. त्यामुळे प्रशासकीय व्यवस्थापनाचा खर्च कमी होईल. तसेच अधिकारी व कर्मचारी यांची कार्यक्षमता वाढेल. संरक्षक भिंत व सुरक्षेच्या दृष्टीने तात्काळ कार्यवाही करावी. अग्निसुरक्षा व अग्निशमन यंत्रणा अद्ययावत करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नवीन सुसज्ज वसाहत, क्लब हाऊस, फुटबॉल, टेनिस, बॅडमिंटनसाठी क्रीडांगण, योगा कक्ष, वाचनकक्ष, आधुनिक ग्रंथालय, आरोग्याच्या दृष्टीने प्राथमिक आरोग्य केंद्र, जैवविविधतेच्या दृष्टीने उद्याने, शेततळे, जॉगिंग ट्रॅक करावेत, असेही डॉ.राऊत यांनी सांगितले.

            

यावेळी अधिकारी व कर्मचारी यांच्या प्रातिनिधीक अडचणी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ऐकून घेतल्या व त्या तात्काळ सोडविण्यात येतील, असेही सांगितले.

            

प्रारंभी ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांचा सत्कार महापारेषणचे संचालक (संचलन) अनिल कोलप यांनी केला. महाराष्ट्र राज्य विद्युत सूत्रधारी कंपनीचे सल्लागार उत्तमराव झाल्टे यांचा सत्कार संचालक (प्रकल्प) नसीर कादरी यांनी केला.

            

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्रीमती विभावरी बाविस्कर यांनी केले. मुख्य अभियंता (स्थापत्य) भूषण बल्लाळ यांनी आभार मानले.


Tags: MahaTransPortऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊतमहापारेषण
Previous Post

राष्ट्रीय विधी विद्यापीठांना १५० कोटींचा निधी मंजूर – उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत

Next Post

छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष….अभिभाषण थांबवून निघून गेले राज्यपाल!

Next Post
governer bhagat singh koshyari m

छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष....अभिभाषण थांबवून निघून गेले राज्यपाल!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!