मुक्तपीठ टीम
आपल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारे बिनबुडाचे दावे केल्याबद्दल लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी महाराष्ट्राची आणि देशाची माफी मागावी आणि पुस्तकातील हा मजकूर वगळून टाकावा तसेच महाराष्ट्र सरकारने तात्काळ या पुस्तकावर बंदी आणावी अशी मागणी भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी केली आहे.
भाजपाचे आमदार अतुल भातखळकर यांनी गिरीश कुबेरांवर थेट आरोप करत छत्रपती संभाजी कुबेरांनी एकापाठोपाठ एक अऐतिहासिक आणि खोटी माहिती देऊन छत्रपती संभाजी महाराजांविषयीचे आणि महाराष्ट्राच्या इतिहासाविषयीचे आपले अज्ञान दाखवले आहे.
‘रेनिसन्स स्टेट’ या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराजांची बदनामी करणारे बिनबुडाचे दावे केल्याबद्दल लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी देशाची माफी मागावी, तसेच महाराष्ट्र सरकारने तात्काळ या पुस्तकावर बंदी आणावी अशी मागणी भाजपाने केली आहे. @OfficeofUT @Dev_Fadnavis @BJP4Maharashtra pic.twitter.com/STSxXSdm0b
— Atul Bhatkhalkar (@BhatkhalkarA) May 24, 2021
संभाजी महाराजांनी रक्तपात घडवला, त्यांना आपल्या जनतेची काळजी नव्हती, त्यांना परराष्ट्रविषयक धोरण नव्हते, अशी चुकीची विधाने कुबेरांनी केली आहे. त्यांनी इतिहासाविषयचीचे अज्ञान दाखवले आहे, त्याचा भारतीय जनता पार्टी निषेध करत आहे. गिरीश कुबेरांनी संभाजी महाराजांचा हा जो अपमान केला आहे, त्याबद्दल त्यांनी त्वरित माफी मागावी, अशी महाराष्ट्र भाजपा मागणी करत आहे.