मुक्तपीठ टीम
भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडमध्ये सिव्हिल, मेकॅनिकल, आयटी/ कॉम्प्युटर सायन्स, इलेक्ट्रिकल, केमिकल, मेटलर्जी, फायनांस, एचआर या विषयात इंजिनीअर ट्रेनी आणि एक्झिक्युटिव्ह ट्रेनी पदांसाठी एकूण १५० जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ०४ ऑक्टोबर २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.
शैक्षणिक पात्रता
अर्ज करणारा उमेदवार,
- पद क्र.१- ६०% गुणांसह संबंधित विषयात बीई/ बीटेक/ एमई/ एमटेक
- पद क्र.२- १) पदवीधर २) सीए/ आयसीडब्ल्यूए
- पद क्र.३- १) ६०% गुणांसह पदवी २) ५५% गुणांसह मानव संसाधन व्यवस्थापन/ कार्मिक व्यवस्थापन व औद्योगिक संबंध/ सामाजिक कार्य/ व्यवसाय प्रशासन पदव्युत्तर पदवी/ डिप्लोमा/ एमबीए असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय २९ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
शुल्क
या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून ८०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी/ ईएक्सएसएम उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.
अधिक माहितीसाठी भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेडच्या अधिकृत वेबसाइट https://www.bhel.com/ वरून माहिती मिळवू शकता.
नोकरीची लिंक
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/79118/Instruction.html
अधिकृत जाहिरात
https://drive.google.com/file/d/1-K_WZmhSqBcCr3FH0BMTk84kFcfX3FXZ/view