मुक्तपीठ टीम
ऑल इंडिया बॅकवर्ड अँड मायनॉरिटी कम्युनिटीज एम्प्लॉईज फेडरेशन (BAMCEF) ने २५ मे रोजी भारत बंदची हाक दिली आहे. केंद्र सरकारने इतर मागास जातींची जात आधारित जनगणना करण्यास नकार दिल्याने भारत बंदचे आवाहन करण्यात आले आहे. याशिवाय निवडणुकीत ईव्हीएमशी संबंधित अनियमितता, खासगी क्षेत्रात एससी-एसटी आणि ओबीसी आरक्षणाची अंमलबजावणी न करणे यासह अनेक मागण्या केल्या आहेत.
अनेक संघटनांनी पाठिंबा दिला : वामन मेश्राम
भारत बंदला बहुजन क्रांती मोर्चाचे राष्ट्रीय निमंत्रक वामन मेश्राम, राष्ट्रीय परिवर्तन मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, बहुजन क्रांती मोर्चा व त्याच्याशी संलग्न सर्व संघटनांचा पाठिंबा मिळाला आहे.
८ मागण्या, ज्यांच्यासाठी भारत बंद पुकारला आहे-
- केंद्र सरकारने आजपर्यंत जातीच्या आधारे ओबीसी जनगणना का केली नाही?
- निवडणुकीत ईव्हीएममध्ये छेडछाड झाल्याच्या अनेक तक्रारी आल्या आहेत.
- ईव्हीएमचा वापर थांबवावा.
- एससी-एसटी आणि ओबीसी आरक्षण खासगी क्षेत्रातही लागू झाले पाहिजे.
- NRC/CAA/NPR विरुद्ध आवाज उठवणे.
- जुनी पेन्शन योजना पूर्ववत करावी.
- शेतकऱ्यांना एमएसपी हमी देण्यासाठी कायदा करण्यात यावा.
- लोकांना लस घेण्याची सक्ती करू नये.
- पर्यावरण रक्षणाच्या बहाण्याने आदिवासींचे विस्थापन करू नये.
भारत बंदचा कुठे होऊ शकतो परिणाम-
- २५ मे रोजी पुकारण्यात आलेल्या भारत बंदचा जनजीवनावर परिणाम होऊ शकतो.
- यावेळी, दुकाने आणि सार्वजनिक वाहतूक बंद असल्याने देशातील विविध शहरांतील लोकांना समस्यांना सामोरे जावे लागू शकते.
- भारत बंदशी संबंधित या मोहिमेत सहभागी होणाऱ्यांना २५ मे रोजी आपली दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन सोशल मीडियावर करण्यात आले आहे.
- यापूर्वी २२ मार्च आणि १८ एप्रिल रोजी अशीच दोन निदर्शने करण्यात आली होती.