Monday, March 9, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नक्षलग्रस्त गावांमध्ये लसीनं कोरोना दहशत संपवणारी महिला सरपंच

May 24, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
नक्षलग्रस्त गावांमध्ये लसीनं कोरोना दहशत संपवणारी महिला सरपंच

अपेक्षा सकपाळ

 

गडचिरोली म्हटले की भल्याभल्यांचा थरकाप उडतो. तिथं काही चांगलं होतच नसणार असाच अनेकांचा समज. त्यातही पुन्हा “तुला गडचिरोली दाखवेन” सारख्या डायलॉगनी तर तो गैरसमज अधिकच वाढवला आहे. तेथे असलेल्या नक्षलवादाची दहशत झुगारत चांगलंही खूप सुरु असतं. आपला गाव सुधरवू पाहणारी भाग्यश्री लेखामी ही तरुणी म्हणजे गडचिरोलीतील आशेचा किरण.

bhagyashree (1)

भामरागडपासून २५ किलोमीटर अंतरावर कोठी आहे. या गावच्या ग्रामपंचायतीची सरपंच आहे भाग्यश्री लेखामी. नव्या विचारांची. गावासाठी काही वेगळं करण्याचं स्वप्न पाहून ते प्रत्यक्षात आणण्यासाठी धडपडणारी. कोरोना संसर्गातून वाचवण्यासाठी त्यांची धडपड सुरु आहे. त्यासाठी सतत फिरणे. तिथं गावकऱ्यांमध्ये असलेल्या अंधश्रद्धा दूर करणे यासाठी त्यांचे प्रयत्न सुरु आहेत.

bhagyashree (4)

या भोळ्या गावकऱ्यांची ही २१ वर्षांची सरपंच तरुणी समजूत काढते. कधी लेक होऊन तर कधी ताई होऊन तर कधी नात होऊन ती गावकऱ्यांना प्रेमानं समजवते. तिने आपल्या प्रयत्नांनी आणि प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी रुग्णालयाच्या मदतीने गावात लसीकरण पूर्ण केले आहे.

bhagyashree (2)

सरपंच भाग्यश्री लेखामीची हिंमत

  • भाग्यश्री लेखामी ही त्याच गावातील आहे.
  • तिची आई अंगणवाडी सेविका असून वडील शिक्षक आहेत.
  • आपल्या लेकीच्या समाजसेवेच्या निर्णयासोबत संपूर्ण कुटुंब उभे आहे
  • एक काळ असा होता की नक्षलवाद्यांच्या भीतीने गावात सरपंच होण्यासही तयार नव्हते.
  • नक्षलवाद्यांच्या परवानगीशिवाय कोणीही सरपंचपदाच्या निवडणुकीत उभे राहत नव्हते.
  • भाग्यश्रीने हिंमत दाखवली. तिने निवडणूक लढविली आणि २०१९ मध्ये ती गावची पहिली सरपंच बनली.
  • भाग्यश्री घाबरत नाही, मोटरसायकलने फिरत लोकांची सेवा करत असते.
  • ‘मुक्तपीठ’शी बोलताना तिने घाबरायचे कारण नाही, कारण मी लोकांच्या भल्यासाठी काम करते.
  • मी याच मातीतील आहे. लोक मला ओळखतात. माझे काम जाणतात, त्यामुळे मला काही भीती नाही, असे सांगितले.
  • लसीकरणाबद्दल खूप गैरसमज असल्याने गावकरी लस घेत नाहीत. त्यामुळे मी त्यांची लेक, बहिण, नात अशा भूमिकेतून समजवते, ते माझे ऐकतात, असेही ती म्हणाली.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: bhagyashree lekhamiGadchiroliगडचिरोलीभाग्यश्री लेखामीलोकबिरादरीसरपंच
Previous Post

कोकणातील दोन जिल्ह्यांमध्ये चक्रीवादळाचा आठवडा रुग्णवाढीचा! राज्यात २९ हजार घरी परतले!

Next Post

मुंबईच्या हिंदमाताची तुंबण्याची समस्या आता ‘भूमिगत’ होणार

Next Post
aditya thackeray (2)

मुंबईच्या हिंदमाताची तुंबण्याची समस्या आता ‘भूमिगत’ होणार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!