मुक्तपीठ टीम
भारतीय लष्करालाही लवकरच स्वदेशी बुलेट प्रूफ जॅकेट मिळणार आहे. हे जॅकेट स्वदेशी असलं तरी साधंसुधं नसणार. अनेकदा बुलेटप्रुफ जॅकेट वजनाने खूप जड असतात. जवानांवर आणखी भार वाढतो. पण हे स्वदेश जॅकेट वजनानं हलकं तर सुरक्षेत मात्र मजबूत असं आहे. आपल्या बीएआरसीने हे विकसित केले आहे. भाभा कवच आणि कवच वस्त्र ही दोन बुलेट प्रूफ जॅकेट भारतातच तयार करण्यात येतात.
स्वदेशी ‘भाभा कवच’ तयार झाल्यानंतर त्यांची कडक तपासणीसाठी कठोर चाचण्या झाल्या. सर्व चाचण्यांना सामोरे जात क्षमता सिद्ध केल्यानंतर ते निमलष्करी दलांना पुरवण्यात आले होते. आता त्यांच्या अनुभवांनंतर थेट भारतीय लष्करातील जवानांना पुरवण्यात येणार आहे.
भाभा कवच जॅकेटमध्ये कोणत्याही लढ्याला सामोरे जाण्याची क्षमता
- संरक्षण मंत्रालयाच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, भाभा कवच हे भाभा अणु संशोधन केंद्राने विकसित केले आहे.
- हे ९ किलो वजनाचे आहे पण, अत्याधुनिक पाचव्या पिढीचे बुलेट प्रूफ जॅकेट आहे.
- हे एके-४७ रायफलमधून उडवलेल्या स्टीलच्या गोळ्यांवरही मात करू शकते.
- मिश्र धातू निगम आणि आयुध कारखाण्यांनी याला निर्माण केले आहे. निमलष्करी दलात त्याचा वापर सुरू झाला आहे. हे सर्व मानक पूर्ण केले आहे.
- हे बुलेट प्रूफ जॅकेट लष्कराला आवश्यक असलेल्या सर्व मानकांची पूर्तता करत असल्याचे संरक्षण मंत्रालयाने मान्य केले आहे.
- मिश्र धातू निगम त्याच्या निर्मितीसाठी रोहतकमध्ये स्वतंत्र युनिट स्थापन करत आहे. याशिवाय, आयुध निर्माणी, कानपूर येथे बुलेट प्रूफ जॅकेट तयार करण्याची क्षमताही विकसित करण्यात आली आहे.
कवच वस्त्र जॅकेट आयुध कारखाण्यात विकसित करण्यात आले
देशात उत्पादित केलेले दुसरे बुलेट प्रूफ जॅकेट हे कवच वस्त्र जॅकेट आहे, जे आयुध कारखाना, चेन्नईने विकसित केले आहे. गांधीनगर येथील राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठात याची चाचणी करण्यात आली आहे. हे देखील योग्य असल्याचे आढळून आले आहे. हे जॅकेट साडेतीन ते दहा किलोग्रॅम वजनाच्या पाच आकारात उपलब्ध आहे. हे जवळजवळ भाभा कवचच्या मानकांशी जुळते.
स्पर्धेसाठी खासगी कंपन्यांकडेही उत्पादन करण्याचा परवानाही
- संरक्षण मंत्रालयाने नुकत्याच संसदीय समितीला सादर केलेल्या अहवालात आतापर्यंत २४ हजार भाभा कवच आणि ५ हजार कवच वस्त्र जॅकेट्स तयार करण्याची क्षमता विकसित करण्यात आल्याचे म्हटले आहे. ती वाढवली जात आहे.
- मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, सरकार बुलेट प्रूफ जॅकेट बनवण्यासाठी सरकारी एजन्सींना तसेच खासगी कंपन्यांना परवाने देईल.
- यामुळे या प्रदेशात स्पर्धात्मक वातावरण निर्माण होईल आणि लष्कराला बाजारात उपलब्ध असलेली सर्वोत्तम बुलेट प्रूफ जॅकेट खरेदी करण्याचा पर्यायही उपलब्ध होईल.
- लष्कराला वर्षाला दीड ते दोन लाख बुलेट प्रूफ जॅकेटची गरज असते. तर निमलष्करी दल, पोलीस इत्यादींनाही याची स्वतंत्रपणे गरज असते.