मुक्तपीठ टीम
जर तुमच्याकडे स्वत:ची बाईक किंवा कार आहे? तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. जर वारंवार तुम्हाला देशभरात पत्ता बदलावा लागत असेल आणि प्रत्येकवेळी तुम्ही तुमच्या वाहनाची नोंदणी हस्तांतरित करण्याच्या प्रक्रियेपासून कंटाळला असेल तर आता काळजी करायची गरज नाही. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने वाहनांचं रजिस्ट्रेशन प्रक्रिया सुलभ करण्यासाठी माहिती तंत्रज्ञानावर आधारित अत्याधुनिक सुविधा आणण्याची घोषणा केली आहे. त्यानुसार आता देशभरात वाहनांचं ट्रान्स्फर सुलभ पद्धतीनं व्हावे यासाठी बीएच सीरिज ही एक आधुनिक सुविधा दाखल करण्यात आली आहे. याद्वारे आता नवीन वाहनांची नोंदणी बीएच सीरिज अंतर्गत होईल.
या सीरिजचा फायदा काय?
- काही वाहनांना नोंदणीच्या वेळी भारत सीरिज म्हणजेच बीएच सीरिजचा टॅग दिला जातो.
- त्यांची नोंदणी इतर वाहनांपेक्षा वेगळी असते.
- ज्या वाहनांना बीएच मार्क मिळेल, त्या वाहनांना एकवेळ नोंदणी आवश्यक असते.
- या सिरीजचा सर्वात मोठा फायदा म्हणजे नोकरीच्या संदर्भात इतर कोणत्याही राज्यात जाताना, या क्रमांकाच्या वाहन धारकांना नवीन नोंदणी क्रमांक घेण्याची गरज भासणार नाही.
- बीएच सिरीज असलेली वाहने जुन्या नोंदणी क्रमांकावरूनच आपले वाहन दुसऱ्या राज्यात सहज चालवू शकतील.
- नवीन वाहनांसाठी ही नवीन नोंदणी प्रणाली आहे.
- यासह वाहन मालकास त्याच्या मूळ राज्याकडून ना हरकत प्रमाणपत्राची आवश्यकता नाही.
- तसेच रस्ता कर परतावा वगैरेची समस्या येणार नाही.
नव्या नंबर धोरणाचे लाभार्थी कोण?
- प्रथम याचा फायदा फक्त संरक्षण, केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी, केंद्र आणि राज्य सार्वजनिक उपक्रम यांच्या कर्मचाऱ्यांनाच मिळणार आहे.
- तसेच ज्या खासगी कंपन्यांचे ४ किंवा चारपेक्षा जास्त राज्यांत कार्यालये आहेत, त्यांनाही ही विशेष सुविधा दिली जाणार आहे.
- यासह बीएफ मार्क असलेल्या वाहनांच्या नोंदणी क्रमांकाचे स्वरूपदेखील इतर वाहनांपेक्षा वेगळे असेल.
आता नवे धोरण काय?
- मंत्रालयाच्या नियमांनुसार, जर एखाद्या व्यक्तीने आपले वाहन एका राज्यातून दुसऱ्या राज्यात नेले, तर त्याला १ वर्षाच्या आत आपल्या वाहनाची पुन्हा नोंदणी करावी लागेल.
- पण आता असे लोक भारत सीरिजमध्ये आपले वाहन नोंदणीकृत करू शकतील.
- त्यांना दुसऱ्या राज्यात पुन्हा नोंदणी करण्याची आवश्यकता नाही.