Thursday, June 5, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भाजपाची एक आमदार अशीही…बँकेत आठ हजारही नाहीत!

May 8, 2021
in घडलं-बिघडलं
0
bengal

मुक्तपीठ टीम

निवडणूक जाहीर झाली की सर्वत्र अब्जोपती, करोडपती उमेदवारांची चर्चा रंगते. सभागृहात किती अतिश्रीमंत आहेत त्याची मोजणी होते. निवडणुकीत फक्त तेच निवडून येतात ज्यांच्याकडे पैसे आहेत, असं सर्रास बोलले जाते. पण काही अपवादही असतात. बंगालमधील भाजपाची एक नवनिर्वाचित आमदार अशीही आहे, जिचे घर मजुरीवर चालतं. तिच्या आणि पतीच्या खात्यात आठ हजार रुपयेही नाहीत.

 

पश्चिम बंगालच्या विधानसभा निवडणुकीत बांकुरा जिल्ह्यातील सालतोडा विधानसभा मतदारसंघ काहीसा वेगळा ठरला आहे. तेथून प्रथमच निवडणूक लढवून आणि जिंकून भाजपाच्या उमेदवार चंदना बाउरी विधानसभेत पोहोचल्या आहेत. त्यांनी तृणमूल काँग्रेसचे उमेदवार संतोषकुमार मंडल यांचा ४ हजारांहून जास्त मतांनी पराभूत केले. चंदना बाउरी आणि त्यांचा सालतोडा मतदारसंघ चर्चेत आला तो पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर भाषणात त्यांचा वारंवार त्यांचा उल्लेख केल्यामुळे.

 

आमदार चंदना बाउरींविषयी सर्व काही…

  • पती रोजंदारी मजुराचे काम करून घर चालवतात.
  • घरात तीन गायी आणि तीन शेळ्याही आहेत.
  • चंदनाला तीन मुले आहेत.
  • भाजपा उमेदवार चंदना किंवा त्यांच्या पतीजवळ शेतीची जमीन नाही आहे.
  • सलतोडा या सीटवरुन जेव्हा भाजपाने त्यांना उमेदवारी दिली तेव्हा त्यांना शेजार्‍यांकडून याची माहिती मिळाली.
  • उमेदवारी अर्ज भरताना निवडणूक आयोगाला देण्यात आलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार चंदना बाउरी यांच्या स्वत: च्या बँक खात्यात केवळ ६,३३५ रुपये होते, तर पतीच्या खात्यात केवळ १५६१ रुपये होते.
  • निवडणूक प्रतिज्ञापत्रात चंदना यांनी सांगितले की, त्यांच्याकडे ३१ हजार ९८५ रुपयांची, तर पतीची ३० हजार ३११ची मालमत्ता आहे.

चंदना ही तिच्या पतीपेक्षा अधिक शिक्षित आहेत, तिचा नवरा फक्त आठवी पास आहे तर चंदना स्वत: बारावीपर्यंत शिकली आहे. पती आणि पत्नी दोघेही मनरेगा कार्डधारक आहेत. गेल्या वर्षी पंतप्रधान आवास योजने अंतर्गत घर बांधण्यासाठी चंदना आणि तिच्या पतीला ६०,००० रूपयांचा पहिला हप्ता मिळाला, ज्याच्या मदतीने त्यांनी दोन खोल्यांचे पक्के घर बांधले आहे.

 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली चंदनांची स्तुती

  • पंतप्रधान नरेंद्र मोदींनीही अनेकदा चंदना बाउरी यांचा जाहीर उल्लेख केला होता.
  • बांकुरा येथे झालेल्या निवडणूक जाहीर सभेत पंतप्रधानांनी चंदनाची तीन वेळा स्तुती केली. चंदना यांचे पती श्रबन यापूर्वी फॉरवर्ड ब्लॉकचे सदस्य होते.
  • त्यांच्या आरोपांनुसार, २०११ मध्ये तृणमूल कॉंग्रेसचे सरकार स्थापन झाले तेव्हा तृणमूलच्या कार्यकर्त्यांनी त्यांचा छळ केला, त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

Tags: BJPआमदारनिवडणूकपश्चिम बंगालबांकुराभाजपमुक्तपीठविधानसभा
Previous Post

केंद्राने लॉकडाऊन लावण्याचा विचार करावा, सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश

Next Post

“मोदी नव्हे, दीदी ओ दीदी!”चाललं…सामनाचं भाजपावर टीकास्त्र!

Next Post
saamana

“मोदी नव्हे, दीदी ओ दीदी!”चाललं...सामनाचं भाजपावर टीकास्त्र!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!