मुक्तपीठ टीम
भारतीय बाजारात बेनेलीने आपली अॅडव्हेंचर मोटरसायकल टीआरके 502 एक्स लॉन्च केली आहे. ही मोटारसायकल पाच लाख १९ हजार ९०० रुपयांपासून एक्स-शोरूम किंमतीला उपलब्ध आहे. ग्राहकांसाठी ही मोटारसायकल तीन रंगांच्या पर्यायांमध्ये रेड अँड प्यूर व्हाईटसह उपलब्ध असेल. ज्यांची किंमत५,२९,००० (एक्स-शोरूम) आहे, तर मेटॅलिक डार्क बेस कलर हा पर्यायी कलर असून याची किंमत५,१९,००० (एक्स-शोरूम) असेल.
ज्या मोटारसायकली आता बाजारात आणण्यात आल्या त्यांच्या किंमती शुभारंभीच्या ऑफरच्या आहेत. त्या कोणत्याही वेळी वाढवल्या जातील. जर ग्राहकांना बेनेली टीआरके ५०२ एक्स बुक करायचा असेल तर त्यांना त्यासाठी १०,००० रुपये मोजावी लागतील. देशभरातील कंपनीच्या ४१ अधिकृत बेनेल्ली डीलरशिपपैकी कोणत्याही ठिकाणी ही बाइक बुक केले जाऊ शकते.
बेनेली टीआरके 502 एक्स
टीआरके रेंजमधील ही दुसरी मोटरसायकल आहे जी उत्कृष्ट ग्राउंड क्लीयरन्स आणि उत्तम फीचर्स सोबत बाजारात बाजारात आली आहे.
मजबूत शक्तिशाली इंजिन
• या मोटरसायकलमध्ये ५०० सीसीचे समांतर जुळे ट्विन इंजिन आहे जे बीएस ६ आहे.
• हे इंजिन ८५००आरपीएम येथे ४७.५पीएस, ६००० आरपी वर ४६एनएम ची पीक टॉर्क जनरेट करण्यास सक्षम आहे.
• हे इंजिन 6 स्पीड गिअरबॉक्सने तयार आहे.
जबरदस्त फिचर्स
• नवीन टीआरके ५०टूएक्स उत्कृष्ट फिचर्ससोबत बाजारात लॉन्च करण्यात आली आहे.
• ज्यात अपडेट इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, नवीन हँडगार्ड्स, मिरर्सच्या मागे टेक्स्चर फिनिश आणि बॉडी कलर फ्रंट मडगार्ड्स आहेत.
• इन्स्ट्रुमेंट क्लस्टर एक डिजी-एनालॉग युनिट आहे.
• अॅनालॉग टॅकोमीटर आणि लहान डिजिटल बॅकलिट आहेत.
रस्ता कसाही असो बाइक मस्त चालते
• तुम्हाला अॅडव्हेंचर रायडिंगची आवड असेल तर ही मोटरसायकल आपल्यासाठी उत्तम निवड ठरेल.
• या मोटारसायकलला वेगवेगळ्या प्रकारच्या जमिनीवर, रस्त्यांवर चालवू शकता.
• डोंगरातील रस्ते, दगडाळ वाटा, खडबडीत रस्ते, चिखलांनी भरलेले रस्ते सर्व ठिकाणी बाइक चालते.