मुक्तपीठ टीम
आज बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपा आणि काँग्रेसमध्ये अटीतटीची लढत झाली, अखेर भाजपाचा विजय झाला. केंद्रीय मंत्री सुरेश अंगडी यांच्या निधनानंतर बेळगाव मतदारसंघात ही पोटनिवडणूक झाली. भाजपाने पोटनिवडणुकीत त्यांच्या पत्नी मंगला अंगडी यांना उमेदवारी दिली होती. काँग्रेसचे उमेदवार सतीश जारकीहोळींशी त्यांची अटीतटीची लढत झाली आहे. तेथे शिवसेनेनं महाराष्ट्र एकीकरण समितीच्यामागे संपूर्ण बळ उतरवलं होतं, मात्र, महाराष्ट्र एकीकरण समितीच्या शुभम शेळके तिसऱ्या क्रमांकावर आहेत. त्यांनी 117174 एवढी लक्षणीय मते घेतली आहेत.
भाजपाच्या मंगला अंगडी यांनी मिळवलेली मोठी आघाडी आता पिछाडीत बदलली आहे. सध्या काँग्रेसचे उमेदवार जारकीहोळींत २० हजार मतांनी पुढे आहेत.
बेळगाव पोटनिवडणूक निकाल – ताजी फेरी
१. भाजपा – मंगला अंगडी 440327
२. काँग्रेस – सतिश जारकीहोळी 435087
३. महाराष्ट्र एकीकरण समिती – शुभम शेळके 117174
आज सर्व मराठी माणसांचे लक्ष लागलेले ते फक्त आणि फक्त बेळगावच्या पोटनिवडणुकीकडेच. हा लढा कोण जिंकणार, यावर सर्वांच्या नजरा होत्या. भाजपने प्रचारासाठीही अनेक दिग्गज नेत्यांची फौज मैदानात उतरवली होती. तर, बेळगाव जिंकण्यासाठी काँग्रेसनेही जोर लावला होता. शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांच्यासह मराठी नेत्यांनीही महाराष्ट्र एकीकरण समितीसाठी जोरदार प्रचार केला होता.