कामावर अर्ध्यापेक्षा जास्त वेळ एकाच जागेवर बसून काम करत असाल तर तुम्ही वेळीच सावध होण्याची गरज आहे. भले मग तुम्ही व्यायामही करत असाल. एकाच जागी बसण्यात बराच वेळ जात असेल तर रक्तातील साखर वाढण्याचा धोका अधिक वाढतो. ही सवय इंसुलिननिर्मितीवरही परिणाम करते, असे वैद्यकीय संशोधनातून उघड झाले आहे.
हार्वर्ड मेडिकल स्कूलशी संबंधित संस्थेच्या संशोधनात काही नव्या बाबी समोर आल्या आहेत:
• जेव्हा शरीराची हालचाल होत नाही तेव्हा स्नायू ग्लूकोज वापरू शकत नाहीत.
• यामुळे रक्तातील साखर वाढण्याचा धोका वाढतो. शरीराची हालचाल होत नसल्यामुळे जीन्सवर याचा परिणाम होतो
• हे टाळायचे असेल तर दर ३० ते ४५ मिनिटांनी चालले पाहिजे.
नियमित व्यायाम करूनही कार्यालयात असताना एकाच जागी बसण्याऐवजी हालचाल करणे आवश्यक आहे, असे तज्ज्ञांचे मत आहे.
• जरी आपण दररोज ३० मिनिटं सायकल चालविणे, चालणे आणि पोहणे यासारखे व्यायाम करत असाल, तरीही आपल्याला दर काही मिनिटांनी उभे राहावे
• दर काही मिनिटांनी काही हालचाली करण्याची आवश्यकता आहे.
• २० ते ३० सेकंदाच्या हालचालीमुळेदेखील आराम मिळतो
तज्ज्ञांच्या मते, “गुरुत्वाकर्षणामुळे पाठीच्या कण्यावर दाब येतो. तणाव निर्माण होतो. त्यामुळे पाठीचा कणा खराब होण्याची भीती वाढते. कण्यावरील दाबामुळे द्रव डिस्कमधून बाहेर पडतो”. यासाठीच पुढील गोष्टी उपयोगी ठरतात:
• २० ते ३० सेकंद फिरत राहिल्यास द्रव परत डिस्कमध्ये गोठतो
• काहीवेळ हालचाल केल्याने सर्व काही पूर्वीसारखेच सामान्य होते
• ४० मिनिटांनी चालण्याचे ब्रेक घेणे खूपच उपयोगी ठरते
हे व्यायाम करा, आरोग्याचा धोका टाळा:
एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे ती म्हणजे कामामुळे होणाऱ्या स्नायूंच्या दुखापती हळूहळू वाढतात. अशा परिस्थितीत ब्रेक घेत हालचाली करत राहिल्यास त्याचा फायदा होईल. शरीराच्या हालचालीसाठी या तीन प्रकारच्या स्ट्रेचिंग केल्याने मनगट, मान, हात आणि पाठदुखीपासून आराम मिळेल. याशिवाय दर ४५ मिनिटांनी एकदा चालावे.
हातांचे स्ट्रेच
१. हात सरळ ठेऊन तळहाताला शरीराच्या दिशेने खाली ठेवा.
२. दुसर्या हाताने हळू हळू बोटांना मागे खेचा. हे केल्याने मनगटाजवळ स्ट्रेच जाणवेल.
३. काही सेकंद थांबा आणि सोडा.
खांद्यांचे स्ट्रेच
१. आपल्या खांद्यांना कानाच्या दिशेने उंच करून ३ ते ५ सेकंद धरून ठेवा.
२. सोडा आणि ते ३ ते ५ वेळा पुन्हा करा.
छाती आणि पाठीचा स्ट्रेच
१. डोक्याच्या मागे हाताची बोटं एकमेकांमध्ये गुंतवा आणि खांद्यांचे ब्लेड्स एकत्र दाबा.
२. याच स्थितीत ५ ते ६ सेकंद राहा.
३. श्वास घ्या आणि पुन्हा हे करा.