Thursday, March 12, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

डॉ. आंबेडकर आणि मातंग परिषदांचा दस्तऐवज सामाजिक समतेच्या चळवळीचा दीपस्तंभ! – धम्मज्योति गजभिये

September 13, 2022
in सरकारी बातम्या
0
BARTI OFFICE

मुक्तपीठ टीम 

डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि मातंग परिषदांचा ऐतिहासिक दस्तऐवज सामाजिक समतेच्या चळवळीसाठी दीपस्तंभ ठरेल, असे प्रतिपादन बार्टीचे महासंचालक धम्मज्योति गजभिये यांनी केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या १३ मातंग परिषदांच्या संशोधन व संकलनाच्या अनुषंगाने महासंचालक धम्मज्योति गजभिये यांच्या अध्यक्षतेखाली गठित समितीची पहिली बैठक दि.७ सप्टेंबर रोजी बार्टीच्या मुख्यालयात झाली. या बैठकीला निबंधक तथा विभाग प्रमुख इंदिरा अस्वार, विभागप्रमुख तथा जात पडताळणी अध्यक्ष डॉ.ज्योत्स्ना पडियार, उपायुक्त तथा विभागप्रमुख उमेश सोनवणे, विभागप्रमुख विस्तार व सेवा डॉ.सत्येंद्रनाथ चव्हाण, कार्यालय अधिक्षक डॉ. संध्या नारखेडे, सहाय्यक प्रकल्प व्यवस्थापक विकास गायकवाड, प्रकल्प अधिकारी रजनी वाघ  उपस्थित होते.

धम्मज्योति गजभिये म्हणाले, “डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आयोजित केलेल्या विविध समाजाच्या परिषदांविषयी पाहिजे तसे संशोधन न झाल्यामुळे बाबासाहेबांनी केलेल्या कार्याची माहिती त्या त्या समाजापर्यंत पोहचली नाही. त्यामुळे खरा इतिहास समोर आला नाही. पूर्वाश्रमीच्या अस्पृश्य समाजातील असंख्य कार्यकर्त्यांनी आंबेडकरी चळवळीत समर्पित भावनेने कार्य केले. अनेकांनी बलिदान देखील दिले, या सर्वांच्या प्रामाणिक प्रयत्नातून आंबेडकरी चळवळ गतिमान व सर्वव्यापी झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मातंग समाजाच्या उत्थानासाठी ज्या परिषदा आयोजित केल्या त्याचे संशोधन करून दस्तऐवजीकरण झाल्यास येणाऱ्या पिढ्यांसाठी हा अनमोल ठेवा असेल.

मातंग परिषदांच्या अभ्यासासाठी समिती गठित

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेल्या १३ मातंग परिषदा शोधून काढणे, त्यांचे संशोधन, संकलन करून ग्रंथरूपाने प्रकाशित व्हावे यासाठी बार्टी महासंचालक धम्मज्योती गजभिये यांच्या सूचनेवरून निबंधक तथा संशोधन विभागप्रमुख इंदिरा अस्वार यांनी महाराष्ट्रातील तज्ज्ञ अभ्यासकांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि १३ मातंग परिषद अभ्यास समिती गठित केली. या समितीचे निमंत्रित सदस्य म्हणून प्रसिद्ध विचारवंत रमेश राक्षे (पुणे),इतिहास संशोधक डॉ.संभाजी बिरांजे (कोल्हापूर), समाजशास्त्र अभ्यासक प्रा.डॉ.सुरेश वाघमारे (लातूर) आणि साहित्यिक प्रा.डॉ.विजयकुमार कुमठेकर (जालना) हे असून या समितीचे सदस्य सचिव डॉ.प्रेम हनवते (संशोधन अधिकारी बार्टी) हे आहेत.


Previous Post

मुंबईत ९०च्या दशकात होतं तसं अंडरवर्ल्ड आता दिल्लीत फोफावलं! दहशतवाद्यांशीही संबंध!!

Next Post

केंद्र पुरस्कृत प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे संगणकीकरण योजनेची राज्यात होणार अंमलबजावणी

Next Post
Atul Save

केंद्र पुरस्कृत प्राथमिक कृषी पतपुरवठा सहकारी संस्थांचे संगणकीकरण योजनेची राज्यात होणार अंमलबजावणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!