मुक्तपीठ टीम
क्रिकेटची बॅट बनवण्यासाठी आता वापरल्या जाणाऱ्या इंग्लिश विलो लाकडाला पर्याय सापडला आहे. इंग्लंडमधील संशोधकांचा असा दावा आहे की, बांबूपासून बनवण्यात आलेली बॅट विलो लाकडापासून बनवण्यात आलेल्या बॅटपेक्षा अधिक चांगली आणि मजबूत आहे. बांबूच्या बॅटचा स्वीट स्पॉट विलोपेक्षा उत्तम आहे. जेव्हा बॉलला बॅटने मारल्यानंतर ज्या वेगाने बॉल दूर जातो त्या ठिकाणाला स्वीट स्पॉट असे म्हणतात. यामुळे मोठे शॉट्स मारणे सोपे होते. यॉर्करवरही फलंदाज सहज चौकार मारू शकेल. इंग्लंड आणि काश्मीरमध्ये विलो लाकूड सर्वाधिक आढळते. तेथे अशा प्रकारे बॅट बनविल्या जातात. आता मात्र त्यांना बांबूंच्या बॅटींचा पर्याय समोर आला आहे.
बॅटीसाठी बांबूचं संशोधन
• बॅटीसाठी बांबूचं संशोधन केंब्रिज विद्यापीठाचे डॉ. दर्शिल शाह आणि बेन टिंकलर डेव्हिस यांनी केले होते.
• या संशोधनातून अशी माहिती मिळाली की, बांबू स्वस्त आणि विलोपेक्षा २२% जास्त मजबूत आहे.
• अशा स्थितीत बॅट मारल्यानंतर बॉल अधिक वेगाने सीमेच्या दिशेने जाईल. विलोचे झाड वाढण्यास १५ वर्षे लागतात, त्यामुळे ते सहज सापडत नाही.
• बॅट बनवताना, त्यातील १५ ते ३० % लाकूड वाया जाते.
• बांबू हा एक स्वस्त, शोधण्यास सोपा आणि जलद गतीने वाढणारे झाड आहे. बांबूची झाडे ७ वर्षात वाढतात.
• चीन, जपान, दक्षिण अमेरिका यासारख्या क्रिकेट विकसनशील देशांमध्ये बांबूच्या बॅट्स बर्यापैकी लोकप्रिय आहेत.
• बांबूच्या बॅट्स विलो बॅटपेक्षा जास्त वजनदार असतात. तसेच बॅटच्या जडपणाबाबत काम केले जात आहे.
• शॉट लावताना विलो आणि बांबूच्या बॅटमध्ये एकसारखे व्हायब्रेशन जाणवते.
• आंतरराष्ट्रीय बाजारात त्याच्या वापराबाबत कोणतीही चर्चा झालेली नाही, कारण आयसीसीच्या नियमांनुसार केवळ लाकडी बॅट वापरली जाऊ शकते.
पाहा व्हिडीओ: