मुक्तपीठ टीम
काँग्रेस नेते राहुल गांधी पाठोपाठ काँग्रेसचे वरिष्ठ नेत्यांचे ट्विटर खाते लॉक केले आहेत. दरम्यान ट्विटरने आपली कारवाई सुरुच ठेवली असून महाराष्ट्रासह राजस्थामधील काँग्रेस नेत्यांचे ट्विटर खाते लॉक केले आहेत. महाराष्ट्रातील काँग्रेस जेष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांचे ट्विटर हँडल लॉक करण्यात आल्याची माहिती महाराष्ट्राचे गृह आणि आयटी राज्यमंत्री सतेज पाटील यांनी दिली आहे. याशिवाय राजस्थान काँग्रेस प्रदेश समितीचे खातं लॉक करण्यात आले आहे.
एकापाठोपाठ एक ट्वीट करत सतेज पाटलांनी सांगितले की, केंद्रातील भाजप सरकार घाबरले आहे आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला त्यांच्या इशाऱ्यावर नाचवत आहे “मी काँग्रेस नेत्यांची ट्विटर खाती निलंबित केल्याचा निषेध करतो. हे स्पष्ट आहे की भाजप सरकार घाबरले आहे आणि त्यांचा हेतू साध्य करण्यासाठी ते ट्विटरवर दबाव आणत आहेत.
I strongly condemn the suspension of Twitter accounts of Congress leaders. Clearly shows that the BJP govt is scared, and is arm-twisting platforms to bend at their will. #DigitalEmergency
— Satej (Bunty) D. Patil (@satejp) August 12, 2021
पाटील यांनी पुढे लिहिले की, राहुल गांधी वगळता महाराष्ट्र काँग्रेस आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांचे अकाऊंट खातीही ब्लॉक करण्यात आले आहेत. “जो कोणी भ्रष्टाचाराविरोधात आवाज उठवतो, त्याला भाजप गप्प करते.” खातं लॉक करण्यात येतात. यानंतर, कॉंग्रेस पक्ष आणि त्याच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी हाच फोटो शेअर करत आपलेही अकाऊंट लॉक करण्याचे आव्हान केले आहे.