मुक्तपीठ टीम
अमरावती जिल्ह्यात गेल्या दोन दिवस पडलेल्या अवकाळी पाऊस व गारपिटीने शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. यादरम्यान नुकसारग्रस्त ठिकाणी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी पाहणी केली. यावेळी त्यांनी घटनास्थळी तलाठी, कृषिअधिकारी, कृषी मंडळ अधिकारी यांना बोलावून नुकसान झालेल्या पिकाचे तातडीने पंचनामे करण्याचे आदेश दिले. तसेच तात्काळ पूर्ण नुकसान भरपाई देण्याचे आदेश त्यांनी दिले.
हवामान खात्याने हवामान खात्याने जिल्ह्यात वर्तवलेल्या अवकाळी पावसाचा अंदाज हा खरा ठरला असून रब्बी पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीट झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. अवकाळी पाऊस आणि गारपीटमुळे कापूस, तूर, गहू, हरभरा, संत्र आणि भाजीपाल्याचे प्रचंड नुकसान झाले आहे. आधीच खरीप हंगामात शेतकऱ्यांच्या कापूस आणि सोयाबीन पिकाचे प्रचंड नुकसान झाले होते. त्यात पुन्हा आता अवकाळी पावसामुळे शेतकरी संकटात सापडला आहे.
राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी आपल्या मतदार संघातील नुकसान झालेल्या राजुरा, अडगाव, बेलोरा याठिकाणी दौरा करून शेतकऱ्यांशी संवाद साधला. तलाठी, कृषिअधिकारी, कृषी मंडळ अधिकारी यांना तातडीने पंचनामे करून प्रस्ताव पाठविण्याचे आदेश दिले. तसेच तात्काळ पूर्ण नुकसान भरपाई देण्याचे आदेश यावेळी राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांनी दिले.
बच्चू कडूंचा नुकसानग्रस्त ठिकाणी दौरा
- शेतकऱ्यांनो खचून जाऊ नका.
- मी आपल्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.
- असं म्हणत त्यांनी शेतकऱ्यांना धीर दिला.
- राज्यमंत्री बच्चूभाऊ कडू यांच्यासोबत संबंधित विभागाचे अधिकारी, तलाठी, कृषी अधिकारी, कृषी मंडळ अधिकारी यांनी नुकसानीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला.