मुक्तपीठ टीम
अॅलोपॅथीला ‘फालतू विज्ञान’ म्हणणाऱ्या बाबा रामदेवांना अॅलोपॅथीच्याच एका मराठी डॉक्टरने गप्प बसवले आहे. आजतक या हिंदी न्यूज चॅनेलच्या चर्चेदरम्यान रामदेव बाबा आणि आयएमएचे माजी अध्यक्ष डॉ. जयेश एम. लेले यांच्यातली चर्चा भलतीच टोकाला गेली. लेले बोलत असताना रामदेव मध्ये बोलू लागताच, डॉ. लेलेंनी त्यांना झापलं. “तुम्ही गप्प बसा.. यू कीप क्वाईट..” या शब्दात आक्रमकपणे रामदेव बाबांना सुनावत त्यांचे मुद्दे खोडून काढले. आजवरच्या इतिहासात टीव्ही अँकरनाही सुनावणाऱ्या रामदेवबाबांना एखाद्या टीव्ही लाइव्ह डिबेटमध्ये कुणीतरी सुनावलं! तेव्हापासून सोशल मीडियावर डॉ. जयेश लेले चर्चेचा विषय झाले आहेत.
काय म्हणाले रामदेव बाबा?
• आमच्याकडे हायपरटेंशन, बीपी, शुगरसारख्या आजारांवर उपचारपद्धती आहे.
• आम्ही १ कोटी रुग्णांना आजारातून बरं केलं आहे. ज्याची माहिती आमच्याकडे आहे.
• गंभीर रुग्ण, ज्यांना ऑपरेशनची गरज आहे, अशा रुग्णांच्या आजारांव्यतीरिक्त आम्ही सर्व आजारांवर उपचार करु शकतो.
• मी मेडिकल सायन्सचा सन्मान करतो.
• तुम्हीही योग सायन्सचा सन्मान करा.
• तुम्ही आयुर्वेदाचा अपमान का करता?
• फार्मा इंडस्ट्रीजला डॉक्टर बळी का पडतात?
• फार्मा इंडस्ट्रीजमध्ये डॉक्टर प्रतिनिधी का नसतात?
काय म्हणाले डॉ. लेले?
• डॉ. जयेश लेले यांनी रामदेव बाबांना बोलण्यास सुरुवात करतानाच ते बोलत असताना मध्ये न बोलण्याबद्दल सुनावले.
• ते म्हणाले, तुम्ही जर गप्प बसाल, तरच मी बोलेन.
• रामदेवबाबांनी आपल्या फ्रेममध्ये कोरोनिल ठेवले होते.
• डॉ. लेले म्हणाले की तुम्ही आधी कोरोनिलची जाहिरात करणं बंद करा.
• राष्ट्रीय न्यूज चॅनेलवर चर्चेदरम्यान तुम्ही आधी जाहिरातबाजी करणं बंद करा.
• कोरोनिल जर इतकं प्रभावी आहे, तर इतक्या नागरिकांचा मृत्यू का झाला?
• बाबा रामदेव पुन्हा मध्ये बोलू लागताच डॉ. जयेश लेले यांनी त्यांना गप्प बसवले.
• तुम्ही बोलू नका. शांत राहा. तुम्ही शांत राहा. असे बजावत गप्प केले.
कोण आहेत डॉ. जयेश एम. लेले?
– २०१६-२० – आयएमए हॉस्पिटल बोर्ड ऑफ इंडियाचे सचिव
– २०१५-१६ – आयएमए महाराष्ट्र राज्य, अध्यक्ष
– २०१७-१८ – आयएमएला दिलेल्या सेवांमुळे IMA प्रो.श्रीधर शर्मा ओरेशन पुरस्काराने सन्मान
– आयएमए शाखा, राज्यस्तरीय पातळीवर विविध पदांवर कार्यान्वित
– २०१५ – IMA नॅशनलः इंडिविज्युएल कम्युनिटी सर्विस पुरस्काराने सन्मानित
– महाराष्ट्र चिकित्सा परिषद सदस्य
डाॅ. लेलेंनी रामदेवबाबांना टि.व्ही. चॅनल वरील डिबेट मध्ये शांत बसा म्हणाले याचा अर्थ असा होत नाही की डाॅ. लेलेंनी अॅलोपथी च्या उपचारावर उपस्थित झालेल्या प्रश्नांवर समर्पक उत्तर दिले.
अॅलोपथी वर आज एवढ्या मोठया प्रमाणावर संशोधनावर खर्च केला जात असताना कोरोना महामारी वर अजूनही काही ठोस उपाय सापडला नाही. तेवढाच किंवा किमान 50% खर्च आयुर्वेदावर करून पाहण्यास काय हरकत आहे.
ठोस उपाय सापडला तर किमान कमी मोबदल्यात उपचार होतील.