Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सौम्य कोरोनावरील ‘आयुष-६४’ औषधाचा फॉर्म्युला ४६ कंपन्यांना! केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेचा शोध!!

November 21, 2021
in featured, आरोग्य, चांगल्या बातम्या
0
ayush64

मुक्तपीठ टीम

केंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदेने (CCRAS) ने कोरनाच्या सौम्य आणि लक्षणे नसलेल्या आणि सौम्य ते मध्यम लक्षणे आढळणाऱ्या रुग्णांसाठी आयुष-६४ या प्रभावी औषधाचे तंत्रज्ञान ४६ कंपन्यांकडे हस्तांतरित केले आहे.
यापूर्वी आयुष मंत्रालयाच्या IMPCL या उत्पादन युनिटसह केवळ ७ कंपन्यांकडे परवाना होता, ज्यांचा वापर मलेरियावरील उपचारांसाठी केला जात असे. कोविडच्या प्रादुर्भावाच्या काळात कोरोनावर ते प्रभावी आढळल्यानंतर, ३९ नवीन कंपन्यांना नवीन परवाने देण्यात आले म्हणजे त्यांच्याकडे तंत्रज्ञान हस्तांतरित करण्यात आले आहे.

 

आयुष-६४ हे CCRAS ने विकसित केले आहे, जी आयुष मंत्रालयाच्या अंतर्गत आयुर्वेदातील संशोधनासाठी प्रमुख संस्था आहे. मलेरियाच्या उपचारासाठी १९८० मध्ये ते विकसित केले गेले. मार्च २०२०  मध्ये कोविडच्या पहिल्या लाटेदरम्यान, काही वैज्ञानिक अभ्यासात ते कोरोनाच्या सौम्य आणि लक्षणे नसलेल्या आणि सौम्य ते मध्यम संसर्गामध्ये खूप प्रभावी असल्याचे आढळले. यात विषाणूंशी लढण्याचे गुणधर्म देखील असून शरीराची प्रतिकारशक्ती वाढते आणि ताप उतरतो, रुग्णांना लवकर बरे होण्यास मदत होते.

 

कोविडच्या पहिल्या लाटेदरम्यान, आयुष मंत्रालय आणि वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद (CSIR) सोबत याची क्लिनिकल चाचणी घेण्यात आली, ज्यामध्ये असे दिसून आले की आयुष-६४ हे कोविड रूग्णांसाठी खूप फायदेशीर औषध आहे. आत्तापर्यंत यावर ८ क्लिनिकल चाचण्या करण्यात आल्या आहेत, ज्यामध्ये घरात विलगीकरणात असलेल्या ६३ हजार रुग्णांवर आयुष-६४ देण्यात आली आणि हे औषध फायदेशीर असल्याचे आढळून आले. ८ क्लिनिकल चाचण्यांमध्ये ५ यादृच्छिक आणि दोन स्वतंत्र अभ्यास देखील होते, ज्यात रुग्णांना केवळ आयुष-६४ औषध दिले गेले.

 

कोरोनाच्या पहिल्या लाटेपूर्वी, आयुष मंत्रालयाचे उत्पादन युनिट आयएमपीसीएलसह सात कंपन्याकडे आयुष-६४ च्या उत्पादनाची जबाबदारी होती. मात्र आता हे तंत्रज्ञान ३९ कंपन्यांकडे हस्तांतरित करण्यात आले आहे, ज्यामुळे हा आकडा ४६ वर पोहोचला आहे.
या निर्णयामुळे त्याच्या उत्पादनात वाढ होईल आणि त्याची मागणी पूर्ण करणे देखील सोपे होईल. आजपर्यंत, या औषधाचे कोणतेही दुष्परिणाम आढळून आलेले नाहीत, तरीही तज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच ते घेण्याचा सल्ला तज्ञांनी दिला आहे.


Tags: ‘आयुष-64’ औषधAYUSH-64 medicineCentral Council for Revision of Ayurvedic Sciencecoronaकेंद्रीय आयुर्वेदिक विज्ञान संशोधन परिषदमुक्तपीठसौम्य कोरोना
Previous Post

केबीसी स्पर्धकाचा डोळे बंद करून पुस्तक वाचण्याचा दावा! अमिताभही झाले थक्क! अंनिसचा आक्षेप!!

Next Post

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्या योजना? नक्की घ्या लाभ…

Next Post
Social justice

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सामाजिक न्याय विभागाच्या कोणत्या योजना? नक्की घ्या लाभ...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!