मुक्तपीठ टीम
टोकियो पॅरालिम्पिकमध्ये नेमबाज अवनी लेखारानंतर सुमित अंतिलने भारताला आणखी एक सुवर्ण मिळवून दिले आहे. सुमितनं पुरुषांच्या F64 भालाफेक गटात विक्रमासह सुवर्णपदक जिंकले. त्याने अंतिम फेरीत ६८.५५ मीटर थ्रो केला होता. सुमितचा 5 वा थ्रो सर्वोत्तम ठरला. सुमितने ६६.९५ मीटर, ६८.०८ मीटर, ६५.२७ मीटर, ६६.७१ मीटर आणि ६८.५५ मीटर थ्रो केले होते. सहावा थ्रो फाउल राहिला.
सुमित आंतिलचे ६ वर्षांपूर्वी रस्ते अपघातात झाला होता. यात त्याने आपला एक पाय गमावला होता. नंतर, आयुष्यात कधीही हार मानली नाही आणि प्रत्येक परिस्थितीचा मोठ्या धैर्याने सामना केला. सोमवारी भारताच्या खात्यात पाचवे पदक जमा झाले आहे.
टोकियो पॅरालिम्पिकामध्ये भारताने चांगली कामगिरी केली आहे. अवनी लखेरा या तरुणीने रायफल शूटिंग प्रकारात सुवर्णवेध घेतला आहे. भारताच्या पॅरलिम्पिकाच्या खात्यातील हे पहिलं सुवर्ण पदक याहे. अवनी लखेरा टोकियो पॅरालिम्पिक गेम्स नेमबाजी स्पर्धेत महिलांच्या १० मीटर एअर रायफलच्या वर्ग SH1 ची अंतिम फेरी जिंकली आहे. १९ वर्षीय नेमबाज अवनीने अंतिम फेरी २४९.६ स्कोर केला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करुन, अवनीचे अभिनंदन केले आहे. आतापर्यंत टोकियो पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी ८ पदकं मिळवली आहेत.
Phenomenal performance @AvaniLekhara! Congratulations on winning a hard-earned and well-deserved Gold, made possible due to your industrious nature and passion towards shooting. This is truly a special moment for Indian sports. Best wishes for your future endeavours.
— Narendra Modi (@narendramodi) August 30, 2021
अवनीच्या या कामगिरीने पॅरालिम्पिक्समधील भारताने नवा रेकॉर्ड बनवला आहे. अवनीने आधी या फेरीत सातवं स्थान पटकावलं होतं. आपल्या उत्तम खेळीने तिने चीनच्या ती झांग कपईपिंग आणि यूक्रेनच्या इरियाना शेतनिक या दोंघीना मागे, टाकत सुवर्ण पदक मिळवलं.
मणका दुखावल्यानंतरही हिंमत न हरता सुवर्णवेध करणारी अवनी
- अवनी लेखरा ११ वर्षांची होती तेव्हा तिचा रस्ते अपघात झाला होता.
- या अपघातात तिच्या मणक्याला दुखापत झाली होती. त्यामुळे तिला अपंगत्व आलं.
- अवनी ही मूळची राजस्थानच्या जयपूरची आहे.
- तिच्या वडिलांनी तिला पाठबळ दिलं.
- त्यामुळेच ती पॅरालिम्पिक्समध्ये उतरली.
- अवनीने शूटिंगसह आर्चरी अर्थात तिरंदाजी खेळातही भारताचं प्रतिनिधित्व केलं.
आतापर्यंत पॅरालिम्पिकमध्ये या खेळाडूंनी मिळवली पदकं
- रविवारीही टोकिया पॅरालिम्पिकमध्ये भारतीय खेळाडूंनी पदकं जिंकली.
- दिवसाच्या सुरुवातीला टेबल टेनिसच्या क्लास चार स्पर्धेत महिला पॅडलर भाविना पटेलने रौप्य पदक जिंकल.
- त्यानंतर उंच उडी स्पर्धेत निशाद कुमारने भारतासाठी आणखी एक रौप्य पदक पटकावलं.
- निशाद कुमारने पुरुषांच्या T47 गटात उंच उडी स्पर्धेत २.०६ मीटर उडी घेत पदक पटकावलं.
- तर आता थाळीफेक स्पर्धेत F52 गटात भारताच्या विनोद कुमारने कांस्य पदक मिळवले होते.
- योगेश कठुनिया यानेही थाळीफेकीत भारताला रौप्यपदक मिळवून दिलं.
- भालाफेक स्पर्धेत देवेंद्र झाझरियाला रौप्य पदक जिंकण्यात यश आले.
- दुसरीकडे सुंदरसिंग गुर्जरने कांस्यपदक पटकावले.