मुक्तपीठ टीम
टीव्ही मालिका ‘बालिका वधू’मधील आनंदी…आजही अनेक रसिक विसरु शकत नाहीत. अनेकांना तिच्यामुळे त्या मालिकेची गोडी लागली होती. आनंदीची व्यक्तिरेखा साकारून घरोघरी लोकप्रिय झालेली अविका गौरचा बुधवारी वाढदिवस होता. त्यानिमित्तानं सोशल मीडियावर पुन्हा रंगली चर्चा ती तिच्या लॉकडाऊन वेट लॉस मिशनची.
View this post on Instagram
बालिका वधूमध्ये ती तशी छोटीशी वजनदारच वाटत होती. पण वाढत्या वयात वाढलेलं वजन कोणत्याही अभिनेत्रीसाठी चांगलं नसतं. वजन वाढल्यामुळे अविका गौरला बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागला. त्यामुळेच तिने मागील वर्षी लॉकडाऊनमध्ये वजन कमी करून स्वत:चे रुपच बदललं. गेल्या वर्षी तिने वजन कमी करण्याविषयीची माहिती सोशल मीडियावर शेअर केली होती.
View this post on Instagram
अविकाने १३ किलो वजन कमी केले आहे. वाढत्या वजनामुळे ती खूपच दु:खी होती. आरशात पाहावत नव्हतं, असंही ती सांगते. मोठे हात, पाय आणि वाढलेले पोट, असं पाहून तिला रडू आलं होतं. आपल्या या बेडौलपणामुळे तिला स्वत:चाच राग येत असे. पण नंतर तिनं निर्धार केला तो वजन घटवण्याचा. लॉकडाऊन असल्यानं सोपं नव्हतं. पण तिने प्रयत्न सुरु केला. आणि तिने जिद्दीनं १३ किलो वजन घटवले. आता मी स्वत:ला सुंदर म्हणू शकते, असं ती अभिमानानं सांगते. तिचं आजचं रुप पाहिलं तर तिचा अभिमान योग्यच आहे हे वेगळं सांगायला नकोच!
गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये तिने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन ग्लॅमरस चित्रासह वजन कमी करण्याचा प्रवास शेअर केला होता. अविकाने लिहिले होते की, “रात्री मी स्वतःला आरशात पाहिले, तेव्हा मला आठवते मी रडू लागली. मोठे हात, पाय आणि वाढलेले पोट. मी वजन कमी करण्यासाठी खूप काही सोडले. जर ते एखाद्या आजारामुळे झाले तर मला काही फरक पडला नसता परंतु, हे सर्व जास्त खाणे आणि अजिबात कसरत न केल्यामुळे झाले होते. त्यामुळे मी हा निर्णय घेतला.”
View this post on Instagram
अविकाच्या शब्दात वेट लॉस जर्नी…
• मी जशी दिसायची ते मला नाही आवडायचे.
• मला नृत्य खूप आवडते. परंतु, मी कशी दिसेन हा विचार करून मी नृत्य नाही करू शकत असे.
• एके दिवशी मी ठरवलं की पुरेसे आहे. आता मला बदलले पाहिजे.
• त्यानंतर मी फक्त योग्य गोष्टींवर लक्ष केंद्रित करण्यास सुरूवात केली.
• मी नेहमीच चांगले खाण्याचा आणि कसरत करण्याचा विचार केला.
• या दरम्यान मला बर्याच अडचणींचा सामना करावा लागला पण मी थांबले नाही.
• चांगली लोक नेहमी मला मार्गदर्शन करण्यासाठी माझ्या बरोबर होते.