मुक्तपीठ टीम
ऑस्ट्रेलियाने १४ अनमोल कलाकृती भारताला परत करण्याचा निर्णय घेतला आहे. यापैकी ६ चोरी करून किंवा बेकायदेशीररित्या निर्यात केल्या गेल्या होत्या. ऑस्ट्रेलियाच्या कॅनबरा आर्ट गॅलरीमध्ये असलेल्या अशा कलाकृतींची ओळख पटली आहे. त्या कलाकृती एकतर भारतातून चोरी झाल्या होत्या, किंवा त्यांच्या अस्तित्वाची कोणतीही माहिती नाही आहे. यात शिल्प, फोटो आणि एक स्क्रोल समाविष्ट आहे.
भारताचा मौल्यवान ठेवा
• एक किंवा दोन महिन्यात या कलाकृती भारतात येऊ शकतात.
• या धार्मिक आणि सांस्कृतिक कलाकृती आहेत.
• त्यांची किंमत १६.३४ कोटी रुपये आहे.
• या कलाकृती काही महिन्यांत भारत सरकारकडे परत केल्या जातील, अशी माहिती कॅनबरा गॅलरीचे दिग्दर्शक निक मिटजेविच यांनी दिली आहे.
सुभाष कपूरनं तस्करी केली होती भारतीय कलाकृतींची…
• ऑस्ट्रेलिया परत येणार असलेल्या १४ कलाकृतींपैकी १३ आंतरराष्ट्रीय तस्कर सुभाष कपूर यांच्याशी संबंधित आहेत.
• सुभाष कपूरवर अमेरिकेत ऑपरेशन हिडन आयडॉल (मूर्ती तस्करी) चा आरोप आहे.
• या प्रकरणात कपूर यांच्या विरोधात खटला सुरू होणार आहे.
• मात्र, त्याने हे आरोप फेटाळले आहेत.
• २०११ मध्ये कपूरला या प्रकरणात अटक करण्यात आली होती.
ऑस्ट्रेलियाच्या नॅशनल गॅलरीने यापूर्वीच सुभाष कपूरच्या माध्यमातून आलेल्या अनेक भारतीय कलाकृती परत केल्या आहेत. यामध्ये तामिळनाडूच्या एका मंदिरातून चोरीला गेलेल्या २७ कोटी रुपयांच्या भगवान शंकराच्या कांस्य मूर्तीचा समावेश आहे.
ऑस्ट्रेलियाला उपरती का?
• कॅनबरा गॅलरीचे संचालकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी त्यांच्या संग्रहाशी संबंधित कायदेशीर आणि नैतिक समस्यांचे मूल्यांकन करण्यासाठी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत.
• त्या तत्वांनुसार चौकशी आणि तपासणी करण्यात आली.
• कलाकृतींचं माध्यम आणि मूळ याचा शोध घेतला असता अनेकांविषयी माहिती समोर आली.
• याच तत्वांनुसार आशियाशी संबंधित संग्रहात समाविष्ट असलेल्या ३ शिल्पांचीही चौकशी केली जात आहे.