Saturday, May 10, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home घडलं-बिघडलं

ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांची वर्णद्वेषी हुल्लडबाजी, कोहलीचा सहन न करण्याचा इशारा

क्रिकेट ऑस्ट्रेलियानं मागितली माफी

January 11, 2021
in घडलं-बिघडलं, मस्तच
0
Mohammed Siraj (2)

मुक्तपीठ टीम

सिडनी कसोटीत आजही काही ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांचे वर्णद्वेषी चाळे सुरुच होते. मंकीगेट म्हणून ओळखला जाऊ लागलेलं त्यांच्या गैरवर्तनानं आज टोक गाठलं. कसोटीच्या चौथ्या दिवशी भारतीय गोलंदाज मोहम्मद सिराजवर प्रेक्षकांनी वर्णद्वेषी भाष्य केले. सीमारेषेवर बसून प्रेक्षकांचा एक गट सतत सिराज, ब्राउन मंकी आणि बिग डॉग संबोधत होता. सिराजने फील्ड अंपायर पॉल राफेलकडे तक्रार केली. मॅच रेफरी आणि टीव्ही अंपायर यांनी मैदानाच्या अंपायरशी संवाद साधला आणि त्यानंतर पोलिसांना बोलवण्यात आले. पोलिसांनी ६ प्रेक्षकांना बाहेर काढले. विराट कोहलीनं असे वर्तन सहन न करण्याचा इशारा दिला.

या घटनेबद्दल क्रिकेट ऑस्ट्रेलियानेही टीम इंडियाची माफी मागितली.

 

We have launched an investigation in parallel with NSW Police following a crowd incident at the SCG today. Full statement 👇 pic.twitter.com/D7Qu3SenHo

— Cricket Australia (@CricketAus) January 10, 2021

विराट कोहलीनेही या घटनेवर आक्षेप घेतला आहे. त्यांनी सोशल मीडियावर लिहिले की शीवीगाळ सहन केला जाणार नाही. सीमारेषावर तुम्ही बर्‍याच हास्यास्पद गोष्टी पाहिल्या असतील पण हे गुंडगिरीचा कहर आहे. मैदानावर हे पाहणे लज्जास्पद आहे. ही बाब त्वरित व अत्यंत गंभीर दृष्टीकोनातून पाहिली पाहिजे.

 

This must be dealt with an iron fist and we must make sure it doesn’t happen again – @ashwinravi99 on the racial abuses being hurled at India players at the SCG#AUSvIND pic.twitter.com/Rlv9hMIHVq

— BCCI (@BCCI) January 10, 2021

 

 

ऑस्ट्रेलियाच्या डावातील ८६ व्या षटकात हे घडलं. सिराज बाउंड्रीवर फील्डिंग करण्यासाठी उतरला होता. त्यानंतर प्रेक्षकांनी केलेल्या काही वाईट टिप्पणींची त्याने अंपायरकडे तक्रार केली. अंपायरने पोलिसांना बोलावून काही लोकांना स्टेडियममधून बाहेर काढले.

 

क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबद्दल टीम इंडियाची माफी मागितली. ते म्हणाले की वंशद्वेषी भाष्यासंदर्भात आमच्याकडे जराही खपवून न घेण्याचे धोरण आहे. या प्रकारची घटना आम्ही अजिबात खपवून घेणार नाही आणि याप्रकरणी कारवाई केली जाईल.

 

या प्रकरणाच्या चौकशीसाठी क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एक टीमही स्थापन केले आहे. न्यू साउथ वेल्स पोलिसांनीही या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. ऑस्ट्रेलियाचे माजी क्रिकेटपटू शेन वॉर्न आणि माईक हसी यांनी सिराजशी वर्णद्वेषी हुल्लडबाजी करणाऱ्या प्रेक्षकांवर आजीवन बंदी लादली जाईल. त्याचवेळी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) वंशद्वेषी निषेध केला आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाकडून चौकशी अहवाल आल्यानंतर कारवाई केली जाईल असे त्यांनी म्हटले आहे.

देशाचे गृहमंत्री अमित शहांचे चिरंजीव आणि बीसीसीआयचे पदाधिकारी जय शाह यांनीही या घटनेचा तीव्र शब्दात निषेध केला आहे.

 

Racism has no place in our great sport or in any walk of society. I’ve spoken to @CricketAus and they have ensured strict action against the offenders. @BCCI and Cricket Australia stand together. These acts of discrimination will not be tolerated. @SGanguly99 @ThakurArunS

— Jay Shah (@JayShah) January 10, 2021


Tags: Cricketmohammed sirajmonkeygatevirat kohaliमन्कीगेटमोहम्मद सिराजविराट कोहली
Previous Post

डॉक्टर व्हायचंय? २२ लाख द्या! मुंबईचा भामटा बिहारात जेरबंद!

Next Post

“शासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे एकही जीव जाता कामा नये!”

Next Post
CM hospital-1

"शासकीय यंत्रणेच्या अनास्थेमुळे एकही जीव जाता कामा नये!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!