मुक्तपीठ टीम
औरंगाबादमध्ये रात्रीची गस्त अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने औरंगाबादचे पोलीस आयुक्त निखिल गुप्ता यांनी योजना आखली आहे. गस्तीवरील पोलिसांनी एका ठिकाणी दहा मिनिटांपेक्षा जास्त वेळ एका ठिकाणी थांबू नये, असा आदेश काढला आहे. काही भागात वाहने जास्त काळ थांबतात, त्यामुळे वाहतुकीची कोंडी निर्माण होते. आता पोलिसांना ठरवलेल्या मार्गावरच गस्त घालावी लागणार आहे.
रात्रीच्या वेळी गस्त घालणारे पोलीस पथक कोणत्याही जागेवर १० मिनिटांपेक्षा जास्त वेळ थांबल्यास त्यांच्याकडून या गोष्टीचे स्पष्टीकरण मागितले जाईल. पोलीस पथकांने समाधानकारक स्पष्टीकरण न दिल्यास त्यांना शिस्तभंगाच्या कारवाईस सामोरे जावे लागेल. असे अंतर्गत संवादात स्पष्ट करण्यात आले आहे. औरंगाबाद शहरात १७ पोलीस ठाणे आहेत. प्रत्येक ठाण्याच्या हद्दीत सरासरी ५० मार्ग आणि जागा आहेत. जेथे रात्रीच्या गस्ती दरम्यान लक्ष ठेवावे लागते. लागतात. तसेच राज्यातील सर्व पोलीस वाहने जीपीएसने जोडली आहेत.त्यामुळे लक्ष ठेवणे सोपे जाईल.
काही वेळेस गस्त घालूनही रात्रीच्या वेळी घरफोडी, चोरी अशी प्रकरणे समोर येतात. तसेच या गोष्टीचा तपास लावण्यात ते अपयशी ठरतात. रात्रीच्या वेळी गस्त घालणारी पोलीस पथके असूनही तेथे चोरी व घरफोडी होते. अधिकाऱ्यांनी याची दखल घेतली आहे. रात्रीची गस्त घालणाऱ्या पोलीस पथकाला झोपेच्या कमतरतेमुळे दुर्लक्ष घडते, असा वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा संशय आहे.
पाहा व्हिडीओ: