Friday, May 9, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

कोल्हापूर…निसर्गाचं पावसाळी सौंदर्य पुरेपूर, धबधब्यांचं दुधासारखं स्वच्छ कोसळतं पाणी!

July 21, 2022
in featured, चांगल्या बातम्या, निसर्ग
0
waterfall

उदयराज वडामकर / कोल्हापूर

पुरेपुर कोल्हापूर…सहजच तोंडी येतं ते काही उगाच नाही. निसर्गानंही कोल्हापूरला भरभरून दिलंय. आता पावसाळ्यात धबाधबा कोसळतानाच सौंदर्याची लयलूट करणाऱ्या धबधब्यांचंच पाहा. त्यातही राऊतवाडीसारख्या धबधब्यांचं पाणी तर अगदी दुधाासारखं पांढर स्वच्छ दिसतं. त्यामुळे पर्यटकांचे पाय तिथं वळतातच वळतात.

पावसाळा सुरू झाला की हौशी पर्यटनासाठी पाय वळतात ते राधानगरी जवळील राऊतवाडी धबधब्याकडे. वर्षा पर्यटनाचा आनंद द्विगुणीत करण्यासाठी तिथं बरंच काही आहे. या निसर्गरम्य वातावरणात पर्वतरांगांच्या कुशीतून ओघळणारे दुधासारखं पांढरं स्वच्छ पाणी नजर खिळवून ठेवतं. तसंच डोंगरमाथ्यांवरून पायथ्याशी झेपावणारे धबधबे पर्यटकांना जणू सादच घालत असतात .

हौशी पर्यटक अशा धबधब्याच्या शोधातच असतात. कोकणात नागमोडी वळणे घेत गर्द झाडीतून पर्वत कपारीतून पर्यटक अंबोली नापणे, राऊतवाडी तसेच न्हावणकोंडा ,बकीॅ या धबधब्याकडे आकर्षित होत असतात.

कोल्हापूरपासून ४०ते ४५ किलोमीटर अंतरावर असणारा राऊतवाडी धबधबा पर्यटकांना नेहमीच आकर्षित करतो. राऊतवाडी धबधब्यापासून काही अंतरावर पर्यटक आपली गाडी पार्क करून धबधब्याच्या उडणाऱ्या तुषारांत भितत बागडतात. कोसळणाऱ्या पाण्याचा आवाजाच्या तालावर पर्यटकांची निर्व्याज मस्ती चालते.

धबधब्यातून पडणारे पाणी पर्यटकांना जणू आपल्या आवाजाने सादच घालत असतं. राऊतवाडी धबधब्याच्या ठिकाणी जवळच खाऊच्या टपऱ्याही टपऱ्यामध्ये उकडलेली कणसे भाजलेली कणसे आदि दुकाने थाटल्यामुळे पर्यटकांना त्याचा स्वाद घेत धबधब्याच्या वर्षानंदा त लुटण्यासाठी अनेक पर्यटक राऊतवाडी कडे आकर्षित होत आहेत.

पाहा:


Tags: beauty of waterfallgood newsKolhapurmonsoon tourismmuktpeethnatureकोल्हापूरचांगली बातमीधबाधब्याचं सौंदर्यनिसर्गपावसाळी पर्यटनमुक्तपीठ
Previous Post

राज्यात २३२५ नवे रुग्ण, २४७१ रुग्ण बरे! मुंबई २९०, नाशिक १०, नागपूर ५२ नवे रुग्ण !!

Next Post

एक कोटी खर्च करून एअर अॅम्ब्युलन्स, रुग्ण महिला अमेरिकेतून भारतात! मुलांचा भारतीय उपचारांवर विश्वास!!

Next Post
Indian Treatment

एक कोटी खर्च करून एअर अॅम्ब्युलन्स, रुग्ण महिला अमेरिकेतून भारतात! मुलांचा भारतीय उपचारांवर विश्वास!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!