Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ च्या धर्तीवर महाराष्ट्रातही योजना विचाराधीन – मंत्री रवींद्र चव्हाण

November 22, 2022
in सरकारी बातम्या
0
Goa

मुक्तपीठ टीम

गोवा सरकारतर्फे राबविण्यात येणारी ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ ही अतिशय अभिनव व प्रेरणादायी स्वरुपाची योजना आहे. या योजनेसाठी सरकारी अधिकाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने केलेले काम कौतुकास्पद आहे. त्यामुळे ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ योजनेची अभिनव कल्पना भविष्यात महाराष्ट्रात लवकरच सुरु करण्याबाबत विचार करण्यात येईल, असे प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आज केले.            

गोवा सरकारच्यावतीने राबविल्या जाणाऱ्या ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ योजनेचा अभ्यास करण्यासाठी गोवा येथे गेलेल्या शिष्टमंडळामध्ये महाराष्ट्राच्यावतीने सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण उपस्थित होते. गोवा सरकारच्या नियोजन महासंचालनालयाच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ कार्यक्रमाअंतर्गत मंत्री रवींद्र चव्हाण यांनी विशेष परिसंवादामध्ये आपली भूमिका मांडली.            

मंत्री रवींद्र चव्हाण म्हणाले, ‘आत्मनिर्भर भारत, स्वयंपूर्ण गोवा’ ही योजना संपूर्ण देशासाठी आदर्शवत अशी योजना आहे. देवेंद्र फडणवीस हे मुख्यमंत्री असताना अशाच स्वरुपाच्या ग्राम सामाजिक परिवर्तन अभियानाच्या माध्यमातून अशाच प्रकारचे काम व विविध योजना महाराष्ट्रात राबविण्यात आल्या होत्या. या अभियानाला महाराष्ट्रात चांगले यश मिळाले होते.            

राष्ट्रीय पातळीवर गौरविण्यात आलेली ही स्वयंपूर्ण योजना आहे. अंत्योदय, ग्रामोदय व सर्वोदय या तत्वांवर आधारीत योजनेचे स्वरुप आहे. एका शासकीय अधिकाऱ्यांकडे एका गावाची जबाबदारी सोपविण्यात येते. ही जबाबदारी पार पाडणाऱ्या या अधिकाऱ्यांना स्वयंपूर्ण मित्र म्हटले जाते असे सांगताना मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले की, खेड्यापाड्यातील गावकऱ्यांना या योजनेमार्फत वैयक्तिक लाभ मिळवून देण्यात येतो. तसेच गावांच्या विकासासाठी शासकीय योजनेमार्फत किंवा लोकसहभागातून आवश्यक उपक्रम अथवा योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी ही स्वयंपूर्ण मित्राच्या मार्फत राबविण्यात येत असून सुमारे १८०० हून अधिक प्रकारची कामे या योजनेखाली राबविण्यात आली. मुख्यमंत्र्यांचे वैयक्तिकरित्या या योजनेकडे लक्ष असून या योजनेचा सातत्याने आढावाही वेळोवेळी घेण्यात येतो असेही मंत्री रवींद्र चव्हाण यांनी सांगितले.


Tags: AtmanirbharMaharashtraMinister Ravindra ChavanSwayampurna Goaआत्मनिर्भर भारतमंत्री रवींद्र चव्हाणमहाराष्ट्रस्वयंपूर्ण गोवा
Previous Post

दीक्षाभूमीला ‘अ’ वर्ग दर्जा देण्याच्या कामाला गती द्यावी – देवेंद्र फडणवीस

Next Post

पारंपरिक, ऐतिहासिक वातावरणात शिवप्रतापदिन होणार साजरा – पालकमंत्री शंभूराज देसाई

Next Post
शिवप्रताप दिनासाठीच्या तयारीचा आढावा 1

पारंपरिक, ऐतिहासिक वातावरणात शिवप्रतापदिन होणार साजरा - पालकमंत्री शंभूराज देसाई

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!