मुक्तपीठ टीम
कोणी अंतराळात जाऊन पिझ्झा पार्टी करतं तर कोणी व्यायाम. ऐकावं तितकं नवलच. पृथ्वीवर असताना अगदी डॉक्टरांनी तब्येतीसाठी व्यायाम कराच, असा सल्ला दिला तरीही आपल्यातील अनेक ऐकत नाहीत. अनेकजण नियमितपणे व्यायाम करत नाहीत. मात्र, इच्छा असली तर कुठेही व्यायाम अशक्य नाही. सध्या एका अंतराळवीराचा व्हिडीओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो स्पेस स्टेशनमध्येच व्यायाम करताना दिसत आहे.
अंतराळवीर थॉमस पेस्कॉट यांनी अंतराळातील स्पेस स्टेशनमधील व्यायामाचा व्हिडीओ ट्वीट करत आपला भन्नाट अनुभव शेअर केला आहे. या व्हिडीओत अंतराळवीर थॉमस पेस्कॉट अंतराळात कसरत करताना दिसता.
दुसऱ्या मिशनची तयारी
अंतराळवीर पेस्कॉट हे मिशन अल्फासाठी प्रशिक्षण घेत आहे. इंटरनॅशनल स्पेस स्टेशनचे हे दुसरे मिशन आहे. ते सतत सोशल मीडियावर अंतराळातील किंवा इतर व्हिडिओ शेअर करत असतात. पेस्कॉट त्याच्या पहिल्या मिशन प्रॉक्सीमा नंतर आता त्यांच्या दुसऱ्या मिशनवर आहे. त्याचे पहिले मिशन सहा महिन्यांचे होते.
त्यांच्या या व्हिडीओमुळे आता समाजमाध्यमांमध्ये अंतराळातील जीवनाविषयी उत्सुकता व्यक्त होत आहे. त्यामुळे डोक्यातील काही प्रश्नांची उत्तरं देण्याचा हा प्रयत्न:
अवकाशात सकाळी सकाळी काय आणि कसे करतात?
- सकाळी उठल्यावर, सर्वप्रथम आपण बाथरूममध्ये फ्रेश होण्यासाठी जातो, तिथे ब्रश करतो.
- प्रवासी अवकाशातही हा दिनक्रम पाळतात. फक्त ही दिनचर्या थोड्या वेगळ्या पद्धतीने घडते.
- यासाठी, येथे स्नानगृह बनवले जाते आणि एक किट उपस्थित असते.
- ज्यामध्ये ब्रश, टूथपेस्ट सारख्या अत्यावश्यक गोष्टी आहेत.
- ब्रश करण्यासाठी, प्रथम पेस्ट ब्रशवर लावावी लागते, सर्व काही तरंगते. पण पेस्ट हवेत तरंगत नाही कारण ती चिकट आहे.
- ब्रशवर पेस्ट लावल्यानंतर, पाण्यासाठी वॉटर किट वापरावी लागते.
- या किटमधील पाणी देखील तरंगते, द्रव फोममध्ये नसते. जे प्यावे लागते.
- ब्रश केल्यानंतर, स्पेस स्टेशनमध्ये दोन पर्याय असतात, एकतर पेस्ट गिळली जाते किंवा टॉवेल पेपरमध्ये थुंकता येते.
नाश्ता कसा केला जातो?
घरासारखे एक स्वयंपाकघर दिले जाते. जिथे सर्व खाद्यपदार्थ निर्जलीकृत फोममध्ये असतात. अन्नामध्ये अंडी, मांस भाज्या, ब्रेड, स्नॅक्स सारख्या विविधता उपलब्ध असतील. सहसा हे विशेष अन्न अमेरिकेत बनवले जाते, परंतु जपान आणि रशिया येथून आलेले अन्नदेखील अंतराळ स्थानकात असते.
पाहा व्हिडीओ: