Friday, June 6, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

“नारवट येथील वनपर्यटन केंद्राचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करा” – अशोक चव्हाण

March 18, 2021
in सरकारी बातम्या
0
ashok chawan

मुक्तपीठ टीम

 

नांदेड जिल्ह्यातील नारवट येथे उभारण्यात येणाऱ्या निसर्ग उद्यान/वनपर्यटन केंद्र व बांबू प्रशिक्षण केंद्राचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून लवकरात लवकर काम सुरू करण्यासाठी आराखडा तयार करण्याच्या सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी मुंबईत झालेल्या बैठकीत दिल्या.

नांदेड जिल्ह्यातील भोकर तालुक्यातील नारवट येथे बांबू प्रशिक्षण केंद्र तसेच निसर्ग उद्यान उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पाची आढावा बैठक पालकमंत्री चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यावेळी त्यांनी विविध सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी डॉ.विपीन इटनकर, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता अविनाश धोंडगे, वन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

अशोक चव्हाण म्हणाले, नारवट येथील 700 एकर जागेपैकी 100 एकर जागेवर पर्यटकांसाठी सोयी सुविधा असलेले निसर्ग पर्यटन उद्यान तसेच बांबू प्रशिक्षण केंद्र उभारणार आहे. या पर्यटन केंद्रात चांगल्या सुविधा असाव्यात, पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेता यावा, यासाठी आराखडा तयार करण्यात येत आहे. या निसर्ग पर्यटन केंद्राला किती जण भेट देऊ शकतील, त्याची देखभाल दुरुस्तीसाठी उपाययोजना आदींबाबतही विचार करण्यात यावा. तसेच पर्यटन केंद्र व बांबू प्रशिक्षण केंद्र संपूर्ण सौरऊर्जा प्रकल्पावर चालविण्यात यावा. या उद्यानाच्या ठिकाणी सध्या काही सुविधा करण्यात आल्या आहेत. त्या तशाच ठेवून त्यामध्ये आणखी काही चांगल्या सुविधा निर्माण कराव्यात. नर्सरी, बांबू प्रशिक्षण केंद्रासाठी सुविधा केंद्रे, सध्या असलेल्या तलावाची दुरुस्ती व मजबुतीकरण करण्यात यावे.

या प्रकल्पासाठी राष्ट्रीय बांबू प्रकल्प, कौशल्य विकास विभाग व इको टुरिझम बोर्ड आदी विभागांचाही सहभाग घेऊन आराखडा तयार करावा. तसेच बांबू प्रशिक्षण केंद्रातील वस्तुंची विक्री व प्रदर्शनासाठी विशेष नियोजन करण्यात यावे, असेही श्री. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

 

निसर्ग पर्यटन उद्यान व बांबू प्रशिक्षण प्रकल्प

प्रस्तावित केंद्रामध्ये बांबू अभ्यागतांसाठी सुविधा केंद्राबरोबरच प्रशिक्षण घेणाऱ्यांसाठीही सामान्य सुविधा केंद्राच्या दोन इमारती बांधण्यात येणार आहेत. तसेच बांबूवरील प्रक्रिया प्रकल्प, डिझाईन सेंटर, बांबूपासून बनणाऱ्या हस्तकला साहित्यासाठी इमारत, नर्सरी, जैवविविधता उद्यान आदी सुविधा असणार आहेत. त्याचबरोबर तलावाचे पुनरुज्जीवन, जॉगिंग ट्रॅक, प्रदर्शन कक्ष, कॅफेटेरिया, खुले सभागृह, विद्यार्थ्यांसाठी व ट्रेकर्ससाठी सुविधा आदींचाही समावेश पहिल्या टप्प्यात आहे.

सुविधा केंद्रात बांबूचा बांधकाम क्षेत्रातील उपयोगासंबंधीचा प्रमाणपत्र वर्ग, बांबूपासून फर्निचर तयार करणे, हस्तकला वर्ग आदी प्रशिक्षण वर्ग सुरू होणार आहेत, असेही मंत्री श्री.चव्हाण यांनी सांगितले.


Tags: Ashok chawanForest tourismnandedNarwatसार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण
Previous Post

पालघरसह ६ जिल्ह्यांमधील पोटनिवडणुकांसाठी ५ एप्रिलला मतदार याद्या

Next Post

नांदेडमधील कौठा येथे उभारणार अत्याधुनिक सुविधायुक्त क्रीडा संकुल

Next Post
Ashok_Chavan

नांदेडमधील कौठा येथे उभारणार अत्याधुनिक सुविधायुक्त क्रीडा संकुल

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!