मुक्तपीठ टीम
#7yearsOfModiMadeDisaster हा हॅशटॅग वापरून @AshokChavanINC यांनी केलेले ट्वीट्स चर्चेचा विषय झाले आहेत. त्यांनी योग्य मुद्द्यांवर मोदी सरकारला उघडे पाडणारे ट्विट केल्यामुळे ते गाजू लागले आहेत.
ट्विट-१
अंतिम संस्काराचा अंतिम अधिकार नाकारण्यासारखे दुसरे कोणते पाप असू शकत नाही. पण ते पापसुद्धा मोदी सरकारच्या काळात झाले. पत्रे ठोकून स्मशाने चिरेबंदी आणि वाहत्या प्रवाहात व किनाऱ्यावर शेकडो मृतदेह सोडून गंगेला मलीन करण्याचे महापाप या सरकारने केले.
अंतिम संस्काराचा अंतिम अधिकार नाकारण्यासारखे दुसरे कोणते पाप असू शकत नाही. पण ते पापसुद्धा मोदी सरकारच्या काळात झाले. पत्रे ठोकून स्मशाने चिरेबंदी आणि वाहत्या प्रवाहात व किनाऱ्यावर शेकडो मृतदेह सोडून गंगेला मलीन करण्याचे महापाप या सरकारने केले.#7yearsOfModiMadeDisaster
— Ashok Chavan (@AshokChavanINC) May 30, 2021
ट्विट-२
शेकडो मृतदेह गंगेत प्रवाहित होऊ देणाऱ्या मोदी सरकारला पाहून राज कपूर यांनी दिग्दर्शीत केलेल्या चित्रपटातील ‘राम तेरी गंगा मैली हो गई, पापीयों के पाप धोते-धोते’ या गाण्याची आठवण होते. मोदी सरकारने या गाण्यातील शब्द प्रत्यक्षात उतरवले आहेत.
शेकडो मृतदेह गंगेत प्रवाहित होऊ देणाऱ्या मोदी सरकारला पाहून राज कपूर यांनी दिग्दर्शीत केलेल्या चित्रपटातील ‘राम तेरी गंगा मैली हो गई, पापीयों के पाप धोते-धोते’ या गाण्याची आठवण होते. मोदी सरकारने या गाण्यातील शब्द प्रत्यक्षात उतरवले आहेत.#7yearsOfModiMadeDisaster
— Ashok Chavan (@AshokChavanINC) May 30, 2021
ट्विट-३
मागील सात वर्षांत देशाला दमदार पण पोकळ भाषणे मिळाली, खोटी आश्वासने मिळाली, आणि आम्ही जो शब्द दिला, तो तर केवळ निवडणुकीचा एक जुमला होता, असे सांगण्याइतपत निर्ढावलेपणा मिळाला.
मागील सात वर्षांत देशाला दमदार पण पोकळ भाषणे मिळाली, खोटी आश्वासने मिळाली, आणि आम्ही जो शब्द दिला, तो तर केवळ निवडणुकीचा एक जुमला होता, असे सांगण्याइतपत निर्ढावलेपणा मिळाला. #7yearsOfModiMadeDisaster
— Ashok Chavan (@AshokChavanINC) May 30, 2021
ट्विट ४
मागील सात वर्षांत देशाला दक्षिण भारतीय चित्रसृष्टी, बॉलीवूड आणि हॉलीवूडलाही लाजवेल, असे स्टंट मिळाले. जुन्या काळातील राजे-रजवाड्यांच्या समारोहांना मागे टाकतील, असे शाही इव्हेंट मिळाले.
मागील सात वर्षांत देशाला दक्षिण भारतीय चित्रसृष्टी, बॉलीवूड आणि हॉलीवूडलाही लाजवेल, असे स्टंट मिळाले. जुन्या काळातील राजे-रजवाड्यांच्या समारोहांना मागे टाकतील, असे शाही इव्हेंट मिळाले. #7yearsOfModiMadeDisaster
— Ashok Chavan (@AshokChavanINC) May 30, 2021
ट्विट ५
मागील सात वर्षांत देशाला लोकशाही व अधिकारांची गळचेपी मिळाली. अभिव्यक्तीवर निर्बंध मिळाले, दडपशाही मिळाली. संवैधानिक संस्था आणि तपास यंत्रणांमध्ये हस्तक्षेप मिळाला. देश व धर्माच्या नावाखाली ज्वलंत प्रश्नांना मागे टाकण्याचे नवे शासकीय धोरण मिळाले.
मागील सात वर्षांत देशाला लोकशाही व अधिकारांची गळचेपी मिळाली. अभिव्यक्तीवर निर्बंध मिळाले, दडपशाही मिळाली. संवैधानिक संस्था आणि तपास यंत्रणांमध्ये हस्तक्षेप मिळाला. देश व धर्माच्या नावाखाली ज्वलंत प्रश्नांना मागे टाकण्याचे नवे शासकीय धोरण मिळाले. #7yearsOfModiMadeDisaster
— Ashok Chavan (@AshokChavanINC) May 30, 2021
ट्विट ६
मागील सात वर्षांत देशाला बेरोजगारी, महागाई, आर्थिक मंदी आणि ढासळती अर्थव्यवस्था मिळाली. कच्च्या तेलाच्या किंमती कमी झालेल्या असताना शंभरीपार झालेले पेट्रोल मिळाले. गरिबांना अधिक गरीबी तर निवडक धनदांडग्यांना अधिक श्रीमंत होण्याची खुली सूट मिळाली.
मागील सात वर्षांत देशाला बेरोजगारी, महागाई, आर्थिक मंदी आणि ढासळती अर्थव्यवस्था मिळाली. कच्च्या तेलाच्या किंमती कमी झालेल्या असताना शंभरीपार झालेले पेट्रोल मिळाले. गरिबांना अधिक गरीबी तर निवडक धनदांडग्यांना अधिक श्रीमंत होण्याची खुली सूट मिळाली. #7yearsOfModiMadeDisaster
— Ashok Chavan (@AshokChavanINC) May 30, 2021
ट्विट ७
मागील सात वर्षांत देशाला आधीच्या पिढ्यांनी दूरदर्शीपणे उभी केलेली राष्ट्रीय संपत्ती विकून चैन करणारे दिवाळखोर सरकार मिळाले. साम, दाम, दंड, भेद कसेही का होईना, पण फक्त निवडणूक जिंकणे हेच एकमेव उदिद्ष्ट ठेवून काम करणारी सत्तापिपासू राजकीय व्यवस्था मिळाली.
मागील सात वर्षांत देशाला आधीच्या पिढ्यांनी दूरदर्शीपणे उभी केलेली राष्ट्रीय संपत्ती विकून चैन करणारे दिवाळखोर सरकार मिळाले. साम, दाम, दंड, भेद कसेही का होईना, पण फक्त निवडणूक जिंकणे हेच एकमेव उदिद्ष्ट ठेवून काम करणारी सत्तापिपासू राजकीय व्यवस्था मिळाली.#7yearsOfModiMadeDisaster
— Ashok Chavan (@AshokChavanINC) May 30, 2021
ट्विट ८
मागील सात वर्षांत देशाला नोटबंदी, जीएसटी, कोरोनाकडे दुर्लक्ष अशा एका पाठोपाठ एक विनाशकारी घोडचुका मिळाल्या. खा. @RahulGandhi आणि @INCIndia ने त्या चुका लक्षात आणून दिल्यानंतरही केवळ राजकीय अहंकारातून त्यात सुधारणा नाकारणारे हटवादी राज्यकर्ते मिळाले.
मागील सात वर्षांत देशाला नोटबंदी, जीएसटी, कोरोनाकडे दुर्लक्ष अशा एका पाठोपाठ एक विनाशकारी घोडचुका मिळाल्या. खा. @RahulGandhi आणि @INCIndia ने त्या चुका लक्षात आणून दिल्यानंतरही केवळ राजकीय अहंकारातून त्यात सुधारणा नाकारणारे हटवादी राज्यकर्ते मिळाले.#7yearsOfModiMadeDisaster
— Ashok Chavan (@AshokChavanINC) May 30, 2021
ट्विट ९
भलेही आम्ही भारतीय जनता पक्षाचे राजकीय विरोधक असू, पण स्मशानात अहोरात्र जळणाऱ्या चिता आणि गंगेत वाहणाऱ्या शेकडो शवांची आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये येणारी छायाचित्रे आणि त्यातून होणारी अप्रतिष्ठा पाहून एक भारतीय म्हणून मनाला प्रचंड वेदना होतात.
आम्ही भलेही भाजपचे राजकीय विरोधक असू, पण स्मशानात अहोरात्र जळणाऱ्या चिता आणि गंगेत वाहणाऱ्या शेकडो शवांची आंतरराष्ट्रीय प्रसारमाध्यमांमध्ये येणारी छायाचित्रे आणि त्यातून होणारी देशाची अप्रतिष्ठा पाहून एक भारतीय म्हणून मनाला प्रचंड वेदना होतात.#7yearsOfModiMadeDisaster
— Ashok Chavan (@AshokChavanINC) May 30, 2021
ट्विट १०
काँग्रेसला स्वातंत्र्य चळवळीची परंपरा आहे, इतिहास आहे. देशासाठी बलिदान आणि योगदान देणाऱ्या अनेक ऐतिहासिक महान नेत्यांचा वारसा आहे. पण भाजपकडे यातलं काहीच नाही. ना गौरवशाली इतिहास आहे, ना परंपरा आहे, ना वारसा आहे. या न्युनगंडाने भाजप पछाडली आहे.
काँग्रेसला स्वातंत्र्य चळवळीची परंपरा आहे, इतिहास आहे. देशासाठी बलिदान आणि योगदान देणाऱ्या अनेक ऐतिहासिक महान नेत्यांचा वारसा आहे. पण भाजपकडे यातलं काहीच नाही. ना गौरवशाली इतिहास आहे, ना परंपरा आहे, ना वारसा आहे. या न्युनगंडाने भाजप पछाडली आहे. #7yearsOfModiMadeDisaster
— Ashok Chavan (@AshokChavanINC) May 30, 2021
ट्विट ११
आम्ही काँग्रेसपेक्षा कमी नाही, हे दाखवून देण्यासाठी भाजप काही तरी ऐतिहासिक करण्याचा आव आणते. पण इतिहास घडवण्यासाठी वर्तमानाचे भान आणि भविष्याचे नियोजन असावे लागते. भाजपकडे नेमका त्याचाच अभाव आहे. केवळ भाषणे, स्टंट आणि इव्हेंट करून इतिहास घडत नाही.
आम्ही काँग्रेसपेक्षा कमी नाही, हे दाखवून देण्यासाठी भाजप काही तरी ऐतिहासिक करण्याचा आव आणते. पण इतिहास घडवण्यासाठी वर्तमानाचे भान आणि भविष्याचे नियोजन असावे लागते. भाजपकडे नेमका त्याचाच अभाव आहे. केवळ भाषणे, स्टंट आणि इव्हेंट करून इतिहास घडत नाही.#7yearsOfModiMadeDisaster
— Ashok Chavan (@AshokChavanINC) May 30, 2021