मुक्तपीठ टीम
एकीकडे कोरोना उफाळतो आहे. कधी रेमडेसिविर, कधी ऑक्सिजन तर कधी मुळातच उपचारासाठी सामान्यांची धडफड सुरु आहे. सख्खी नाती परकी होत आहेत. संसर्गाच्या भीतीने दुरावत आहेत. त्याचवेळी समाजातील काही चांगली माणसं पुढे येऊन रुग्णसेवेसाठी पुढे सरसावत आहेत. धोका पत्करुन त्यांच्यासोबत वावरत आहेत. अशांपैकीच एक म्हणजे शिरुरचे आमदार अशोक पवार.
कोरोना उपचारांसाठी सरकारी सुविधा अपुऱ्या पडू लागताच आमदार अशोक बापू पवार यांनी स्वत: कोरोना सेंटर सुरु केले. त्यांनी स्वत:च्या खर्चाने सुरु केलेल्या या सेंटरमध्ये रुग्णांच्या उपचारापासून त्यांचे मन प्रसन्न करणाऱ्याही सुविधा आहेत. त्यामुळे रुग्णांना कोरोनावर लवकर मात करणे शक्य होते.
केवळ सेंटरपुरतेच न थांबता आमदार अशोक बापू पवार हे सातत्याने स्थानिक गरजूंच्या संपर्कात असतात. कधी रेमडेसिविर, कधी ऑक्सिजन तर कधी आणखी काही, बापूंना फोन केला आणि मार्ग निघाला नाही, असे होत नाही, असे त्यांचे समर्थक चाहतेच नाही तर सर्वसामान्यही सांगतात. सर्वात महत्वाचे म्हणजे त्यांच्या सौ. सुजाता पवार याही घरची आघाडी सांभाळतानाच समाजसेवेतही त्यांना साथ देण्यासाठी सज्ज असतात.
सतत, अथक, निरंतर रुग्णसेवत वाहून घेतलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अशोक बापू पवारांबद्दल मुक्तपीठला त्यांच्या कार्यक्षेत्रातील अनेकांनी व्हायरल किस्से कळवले. त्यातील काही मांडत आहोत.
१) सतत निरंतर कार्यरत बापू…
नि:शब्द बाप्पू रेमडेसिविर कुठे मिळेल का? माझी आई, वडील, भाऊ, नातेवाईक, मित्राला हवंय. बाप्पू बेड शिल्लक आहे का, काहीतरी करून बेडसाठी जागा करून द्या, डॉक्टरांना सांगा ना तुम्ही बाप्पू. बाप्पू व्हेंटिलेटर बेड कुठे मिळेल, अर्जंट आहे HR CT score 15 आहे, O2 Saturation 50 वर आहे. बाप्पू Blood Plasma हवाय, कोणी डोनर आहे का ? कुठल्या Blood bank मध्ये मिळेल ? बाप्पू ऑक्सिजन सिलेंडर बघाना.. गेले काही दिवस २४ तास फक्त आणि फक्त लोकांच्या याच समस्या सोडवत आहेत बाप्पू.. त्रास होतोय,प्रचंड दगदग होतेय पण अगदी शांतपणे कोणावरही न चिडता रात्रीचा दिवस करून लोकांसाठी हा माणुस निस्वार्थी लढतोय.. कोणाला प्लाझ्मा हवाय? मिळत नाहीये तर अक्षरशः प्लाझ्मा डोनरच्या घरी जाऊन त्याचे हात पाय धरून प्लाझ्मा उपलब्ध करून देतोय हा माणुस.. तरीही लोकांच्या समस्या कमी होत नाहीये.. प्रत्येक वेळी काय उत्तर द्यावे समोरच्या व्यक्तीला ? काय सांगून समाधान करावं समजत नाहीये आणि हे मिळवून देता देता प्रयत्नांची पराकाष्टा करावी लागत आहे. परंतु बाप्पू प्रयत्न करणं सोडत नाहीयेत.. दिवसभरात ३००ते ४०० कॉल यासाठीच असतात.. सर्वांचे काम होते आहे असे नाही पण हा माणुस जिवापाड मेहनत घेऊन १००%प्रयत्न करतो आहे.. या माणसाच्या अफाट ईच्छाशक्तीला प्रयत्नांना खरच सलाम..
२) स्वत:च सुरु केले कोरोना सेंटर
जे लोक कर्तुत्ववान असतात, लोक त्यांचे नावही काढतात फोटो आणि बॅनर ही लावतात. तुम्ही ज्या खानदानाचा उल्लेख केला ते खानदान कर्तुत्वान आहेतच. हे संपूर्ण तालुक्याला माहित आहे. कोरोनाचे पेशंट मोठ्या प्रमाणात वाढत असल्यामुळे, व पेशंटसाठी बेड उपलब्ध करणे अत्यंत अवघड झाल्यामुळे आपल्याच भागांमध्ये कोरोना सेंटर सुरू करण्याचे शिरूर-हवेलीचे कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांनी ठरवले. यासाठी संबंधितांकडे पाठपुरावा करून कोरोना सेंटर मंजूर करून घेतले. कोरोना सेंटर मांडवगण फराटा येथे उभारण्यासाठी जिल्हा परिषद सदस्य सौ सुजाता भाभी पवार यांनी अगदी जागा शोधण्यापासून ते रुग्णांसाठी स्वच्छतागृह व बेड उपलब्ध करण्याकरिता मागील तीन दिवसापासून रात्रंदिवस प्रयत्न करत स्वतः जातीने उभ्या राहून कोरोना सेंटर उभारणीस हातभार लावला. स्वतःच यासाठी बहुमूल्य योगदान दिले. पवार कुटुंबीयांनी कोरोना केअर सेंटर मध्ये रुग्णांसाठी स्वखर्चाने टॉयलेट्स उभारून दिले. आपल्या भागात सुसज्ज असे कोरोना सेंटर उभारले आहे, त्याचे स्वागत करायचे सोडून काही खोट्या मनाचे व्यक्ती आपल्या छोट्या विचारसरणीनुसार टिका करत आहेत. घरात बसून टीका करणं आणि स्वकर्तुत्वाने काम करणं यात फरक असतो.
३) रुग्णसेवेत पत्नीचीही साथ!
संकटात लढणारी दुर्गा ही तीच, आणि आपले कुटुंब सांभाळणारी गृहलक्ष्मी ही तीच!!!!
प्रशासन, पंचक्रोशीतील ग्रामपंचायती, रावलक्ष्मी ट्रस्ट तसेच दानशूर व्यक्तींना सोबत घेऊन कोरोनाच्या या संकट काळात अगदी जिवाची बाजी लावून २-३ दिवसात उरळगाव येथे सीसीसी केंद्र उभारून आपल्या लोकांसाठी लढणारी दुर्गा संपूर्ण तालुक्याने पाहिली. आणि आज आपल्या कुटुंबाची जबाबदारी घेऊन सांडगे तोडणारी गृहलक्ष्मी आपण पाहत आहोत. राजकारण, समाजकारण आणि आपल्या कुटुंबाची जबाबदारी चोख पार पडणाऱ्या माजी.सभापती सौ सुजाता अशोक पवार” म्हणजेच आपल्या सर्वांच्या प्रेरणास्थान “भाभी”!
आपण करत असलेल्या कार्याचा आम्हा सर्वांना सार्थ अभिमान आहे!!!
४) रुग्णसेवेला समाजाचीही साथ!
उरळगाव सीसीसी केंद्राला सुद्धा दानशूर व्यक्तींचा भरभरून प्रतिसाद.
उरळगाव माजी सरपंच प्रशांत सुखदेव सात्रस कोरोना केअर सेंटर साठी आपले मंगल कार्यालय उपलब्ध करून दिले व रुग्णासाठी गरम पाणी मिळावे या साठी मशीन व रुग्णांच्या मनोरंजनासाठी एलसीडी स्क्रीन भेट दिली. त्याचबरोबर दहिवडीचे माजी सरपंच राष्ट्रवादी युवक कार्याध्यक्ष संतोष दौंडकर यांनी प्रोजेक्टर भेट दिला. अतुल त्रिंबकराव फराटे यांनीही उरळगाव सेंटरला किराणा भेट दिला.
सुजाता भाभी पवार यांनी केलेल्या आवाहनाला आपण सर्वांनी भरभरून प्रतिसाद दिला, त्याबद्दल सर्व दानशूर व्यक्तींचे मनःपूर्वक आभार.
५) खिशातील पैसा खर्च करून रुग्णसेवा
पैसा तर सगळ्याच राजकारण्यांकडे असतो,पण खिशातला पैसा खर्च करुन जागोजागी कोरोना सेंटर सुरु करण्याची दानत केवळ काही ठराविक नेत्यांकडे आहे.त्याबद्दल आपण सर्वांनी या नेत्यांचे आभार मानले पाहिजेत.संकटाच्या काळात ही लोकं आपल्या मदतीसाठी पुढं आली आहेत… शेवटी जीव वाचवणाराच मोठा असतो.
राष्ट्रवादीच्या कार्यसम्राट अशोकबापू पवार व सौ सभापती सुजाताभाभी पवार यांनी आपल्या मतदारसंघात कोरोना सेंटर उभा केला आहेत.बाकी पक्षांनी सुद्धा यातल्या नवोदित आमदारांनी केलेल्या कामाचं अनुकरण करावं.
असे अनेक किस्से आमदार अशोक बापू पवार यांच्या चाहत्यांनी, त्यांच्यावर प्रेम करणाऱ्या निष्ठावंतांनी पाठवलेत. त्याबद्दल ते जे सांगतात…तेही कळवले…आमदार अशोक बापू पवार म्हणतात…”पुन्हा अशी भयंकर परिस्थिती निर्माण होईल असा विचार सुद्धा केला नसेल.. काय करावं या परिस्थितीमध्ये कोणी सांगेल का? मी एवढेच सांगेन घरी राहा… सुरक्षित रहा… कुटुंबाची काळजी घ्या.. काळजी घेऊन सुरक्षित राहणे उपचारापेक्षा केव्हाही चांगले.”
(वरील ५ पोस्ट, छायाचित्र या सोशल मीडियात व्हायरल झालेल्या आहेत. भाषेत त्यामुळे बदल करण्यात आलेला नाही.)
(आपल्याही माहितीत, संपर्कात असे चांगलं काम करणाऱ्या कोणीही व्यक्ती, संस्था असतील (मग विचार कोणतेही असो) तर कृपया कळवा. थेट कॉल करा ९८३३७९४९६१ – तुळशीदास भोईटे, मुक्तपीठ www.muktpeeth.com )
पाहा व्हिडीओ: