मुक्तपीठ टीम
आझाद मैदानात आंदोलन करत असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांची आज भेट घेत ॲड आशिष शेलार यांनी एसटी कर्मचाऱ्यांना साथ आणि समर्थन देत असल्याचे सांगितले. आणि सरकारला चेतावणी दिली की गुमान चर्चा करा, सोपा मार्ग काढा, सरळ विलनीकरण करा त्यासाठी अर्थसंकल्पीय तरतूद करा. ४० जणांच्या आत्महत्येला कारणीभूत असलेलं हे सरकार रक्तपिपासू असल्याची घणाघाती टीका यावेळी त्यांनी यावेळी केली.
एसटी चे राज्य शासनात विलनीकरण तसेच सरकारी कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन मिळणेसाठी मुंबईत आझाद मैदानात सुरु असलेल्या एसटी कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबियाच्या आंदोलनाला भेट देत आपला पाठिंबा, साथ असल्याचे ॲड आशिष शेलार यांनी यावेळी सांगितले. यावेळी माजी मंत्री सदाभाऊ खोत, आमदार गोपीचंद पडळकर उपस्थित होते.
We will fight! आपल्या मागण्यांसाठी रणरणत्या उणात संघर्ष करणाऱ्या #ST कामगार, कर्मचाऱ्यांना आज आझाद मैदानात जाऊन भेटलो. त्यांच्या लढ्याला पाठींबा दिला व संवाद साधला. यावेळी शेतकरी नेते @Sadabhau_khot आणि अन्य पदाधिकारी ही उपस्थित होते! @BJP4Maharashtra @Dev_Fadnavis @ChDadaPatil pic.twitter.com/kvThpF22MC
— Adv. Ashish Shelar – ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) November 14, 2021
यावेळी बोलताना ॲड शेलार म्हणाले, शासकीय कर्मचार्याला जे फायदे मिळतात, ओळख मिळते ती द्या एवढीच मागणी आहे. यासाठी केवळ एक वाक्याचा जीआर काढायचा आहे. राज्य सरकारला सर्व सहकार्य करु पण नाही केलत तर आम्ही परत येतोय हे लक्षात ठेवा.
ही लढाई केवळ एसटी कर्मचार्यांची नाही तर महाराष्ट्रातल्या गोरगरीब, दलित, पिडित, वंचित समाजाला न्याय देण्याची लढाई आहे. आझाद मैदानासमोर मुंबई महापालिका आहे. जिथे ८० हजार कोटींचे फिक्स डिपॅाझिट आहेत पण इथे मराठी माणूस आंदोलन करतोय, त्यांना लाईट आणि पाण्याची ही सुविधा दिली जात नाही. या सत्ताधाऱ्यांना लाज कशी वाटत नाही असा सवाल ही त्यांनी केला. उद्या यासाठी महानगरपालिका आयुक्तांची यासाठी भेट घेणार असल्याच ही ते म्हणाले.
मायावी राक्षसासारख हे सरकार शब्दांत सामान्यांना भुलवत आहे. यांचे खायचे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत. काळीज नसलेलं हे सरकार आहे. मंत्री म्हणतात, एसटी रक्तवाहिनी आहे मग तुम्ही आता रक्तपिपासू का बनलात? असा सवाल त्यांनी यावेळी केला. ४० जणांचे बळी तुम्ही घेतलेत अशी टीका त्यांनी केली.