मुक्तपीठ टीम
सध्या महाराष्ट्रातलं राजकारण चांगलचं तापलेलं दिसत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिकांच्या ईडी कारवाई पाठोपाठ शुक्रवारी शिवसेनेचे नेते यशवंत जाधव यांच्या घरी आयकर विभागाने छापे टाकले आहे. यामुळेच सत्ताधारी आघाडी सरकार आणि भाजपामध्ये आरोप-प्रत्यारोप केले जात आहेत. अशातच भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवारी भाजपाची कोअर कमिटीची बैठकी होत आहे. या बैठकीरच्या अगोदर आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना भाजपा नेते आशिष शेलार यांनी महाविकास आघाडी सरकारवर टीका केली आहे.
महाराष्ट्रासमोर गंभीर प्रश्न निर्माण झालेयत…
- भाजपाची ठरवलेली आणि अपेक्षित नेत्यांची कोअर कमिटीची बैठक आज सुरू होत आहे.
- प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि . विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात सर्व कोअर कमिटीचे सदस्य, आज राज्यातील अतिशय महत्वाच्या विषयांवर व संघटनेच्या अति महत्वाच्या बाबींवर आज जवळपास पूर्ण दिवस बैठक करून चर्चा करणार आहेत.
- महाराष्ट्रासमोर गंभीर प्रश्न निर्माण झालेले आहेत, सामान्य जनता करोनाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा, त्यांचं सुरळीत आयुष्य सुरू करावं या चिंतेपोटी स्वत: कामाला लागतेय आणि त्यावेळेला राज्य सरकारच्या विविध यंत्रणा यांनी आमचा शेतकरी, कारखानदार,व्यावसायिक, युवक, महिला, बाराबलुतेदार या सगळ्यांना उभारी देण्यासाठी उभं रहावं ही प्राथमिकता असताना, सरकारमध्ये राज्यात बसलेली लोक यांची प्राथमिकता राज्याच्या प्रश्नांना नाही.
या सरकारचं वर्णन भ्रष्टाचाराचा महामेरू!
- शेतकऱ्यास कशी मदत करता येईल. आदिवासी आश्रमशाळांना कशी मदत करता येईल, शहरांचा विकास कसा करता येईल.
- १२ बलुतेदारांना रोजगार कसा देता येईल.
- कोरोनामध्ये दुर्दैवाने जे मृत्युमूखी पडले त्यांच्या परिवारांना मदत कशी मिळेल.
- या सगळ्या प्रश्नांकडे कानाडोळा किंवा डोळे बंद करून हे सरकार बसलेलं आहे.
- केवळ एकाच गोष्टीवर हे महाविकास आघाडीचं सरकार काम करत आहे.
- ते म्हणजे भ्रष्टाचार, गुन्हेगारी, दहशतवाद याच्या समर्थनार्थ पूर्ण वेळ सरकार काम करत आहे.
- म्हणून या सरकारचं वर्णन भ्रष्टाचाराचा महामेरू अशा स्वरुपाचं करावं लागेल, इतकी दुर्दैवी परिस्थिती महाराष्ट्रात सरकारची आहे.
“न खाऊंगा, न खाणे दूंगा”
- २०१४ मध्ये देशात भाजप सरकार आल्यावर या सरकारनं पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वावाखाली जनतेला वचन दिलंय.
- ते म्हणजे “न खाऊंगा, न खाणे दूंगा”.
- त्यानुसार कायद्यात बदल केले गेले आणि आता त्या कायद्यानुसार कारवाई करण्यात येत आहे.
- त्यामुळे विरोधकांची अवस्थता वाढलीय.
लोकशाही विरुद्ध घराणेशाही अशी लढाई सुरु…
- देश आणि महाराष्ट्र आता एका वळणावर उभा आहे.
- लोकशाही विरुद्ध घराणेशाही अशी लढाई सुरु झालीय.
- यात जनता यशस्वी होईल, जनता जिंकेल.
- सामान्य जनतेच्या मनातलं रामराज्य येण्याचै प्रक्रिया सुरु झालीय.
- या साऱ्याची रचना कोअर कमिटीत करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.
सूडबुद्धीने कारवाई ठाकरे सरकार करतेय!
- विरोधक सूडबुद्धीने कारवाई केल्याचा आरोप सातत्याने करताहेत.
- पण, सूडबुद्धीने कारवाई ठाकरे सरकार करत आहे.
- केंद्रीय मंत्र्यांना अटक होते, सेनादलाचे कर्मचारी मारहाण करतात, पण कारवाई करत नाहीत.
- सोमय्या तक्रार द्यायला जात असताना त्यांना रोखले जाते ही सूडबुद्धी आहे.
- यंत्रणा आपले काम करत आहे.
- पदावर बसलेले व्यक्तीनी नियम पाळावे.
- ज्यांना सूडबु्दधीने कारवाई केली असे वाटते त्यांनी न्यायालय जावे.
- आघाडी सरकारने “अपने गिरबांन मै झांकिये, सच सामने आयेगा” असा टोलाही त्यांनी लगावला.