मुक्तपीठ टीम
राज्यातल्या जनहिताच्या विषयांकडे दुर्लक्ष करत असलेल्या सरकारच वर्णन ‘खावाले काळ, नी भूईले भार हे ठाकरे सरकार’ असंच कराव लागेल अशी अहिराणी भाषेत टीका भाजप नेते आमदार अॅड आशिष शेलार यांनी येथे केली.
आमदार अॅड आशिष शेलार आजपासून तीन दिवसाच्या उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर असून नंदुरबार जिल्हा दौऱ्यात संघटनात्मक आढावा घेऊन त्यांनी पत्रकारांशी संवादही साधला. यावेळी बोलताना ते म्हणाले, नंदुरबार मधील जनतेचे प्रश्न, समस्या जाणून घेतल्या. एक अभद्र युतीतून कंत्राटावरचे कट कमिशन साठी एकत्र आलेले हे तीन पक्षांचे ठाकरे सरकार आहे, जे गेल्या दोन वर्षात मंत्रालयात ही पोहचू शकले नाही. जे अजून मंत्रालयातच नाही पोहोचले ते नंदुरबार सारख्या अती दुर्गम भागात कधी व कसे पोहचणार? राज्याच सरकार नाही पण नंदुरबार पर्यंत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सरकार मात्र पोहचलेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विविध योजना सुरु असलेला हा जिल्हा आहे.
नंदुरबार मध्ये यावेळी पाऊस पुरेसा झालेला नाही. दुष्काळ सदृश्य परिस्थिती दिसत आहे. २० जुलै पर्यंत ३ लाख ५ हजार हेक्टर पैकी १ लाख हेक्टर पर्यंत पेरणी झाली तर पावसाने दडी मारल्याने दुबार पेरणी करावी लागत आहे. पिक कर्ज देण्यात बँकांनी आखडता हात घेतला आहे. २० हजार पेक्षा जास्त खातेधारकांनी कर्ज घेतलेले नाही अशी अवस्था आहे. जर दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली तर त्याचे नियोजन हे सरकार कधी करणार? असा सवाल ही त्यांनी केला.
शेतीच्या, पाण्याच्या अडचणीमधे असताना ठाकरे सरकार नंदुबारमधे नाहीच पण पालकमंत्री मात्र गायब आहेत. आदिवांसींसाठी असलेल्या खावटी किटचे ते मिशन घेऊन आलेत पण त्याची गुणवत्ता पाहिली तर प्रत्यक्षात खावटी किटचं “कट कमिशन” घेणे सुरु असल्याचा आरोप त्यांनी पालकमंत्र्यांवर केला आहे. याबाबत भाजप आक्रमक पावले उचलेल असे ही ते म्हणाले.
रोज काहीतरी बोललच पाहिजे असा अट्टहास म्हणजे नवाब मलिक
मंत्री नवाब मलिक यांनी राज्यपालांबाबत केलेल्या विधांनाबाबत पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, रोज काहीतरी बोललच पाहिजे असा अट्टहास असलेले नेते म्हणजे नवाब मलिक अस सांगत राज्य सरकार पुरग्रस्त भागापर्यंत पोहोचलं नाही पण राज्यपाल पोहोचले यावर खर तर सरकारला शरम वाटली पाहिजे. पण राज्यपालांवर टीका करुन वातावरण निर्मिती करण्यापलीकडे काही करत नाहीत. नवाब मलिक यांच्या सरकारचा पराभव आहे, म्हणूनच जनतेला राज्यपालंकडे दाद मागावी लागते असं ही ते म्हणाले.
घोषित होत पण पोहोचत नाही अस ठाकरे सरकारच पँकेज
पुरग्रस्तांसठी जाहीर केलेल्या पँकेज बाबत विचारले असता आशिष शेलार म्हणाले, मी पँकेज देणारा नाही तर मदत करणारा अस मुख्यमंत्री म्हणाले होते पण ते शब्दावर फिरले का? याआधी तौक्ते आणि निसर्ग वादळावेळी घोषित केलेल पँकेज अजून जनतेला पोहोचलच नाही. तातडीची १० हजाराची मदत मिळालेली नाही अशी अवस्था आहे. घोषित होत पण पोहोचत नाही अस ठाकरे सरकारच पँकेज असतं. या संकटाची व्याप्ती ही अजून सरकारच्या लक्षात आलेली नाही. जनतेला मदत मिळावी हीच आमची अपेक्षा आहे.
सरकारचे निर्बंध म्हणजे खाली डोक वर पाय
दोन लसी घेतलेल्यांनी सुट द्या अस न्यायालय सांगत आहे पण काय नियम लावतात त्याला निर्बंध नाही. देउळ बंद पण पब, बार सुरु अशी अवस्था आहे. प्रत्येक जण वेगवेगळी विधान करतात. सरकारच्या तीन पक्षांत बेदीली असल्याने एकवाक्यता नाही. सरकार जनतेबाबत बेफिकिर आहे. अस ते म्हणाले
विमानतळावर शिवसेनेचं टक्केवारीच आंदोलन
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ या नावाला य धक्का लावल्यास भाजप विरोध करेलच. मात्र हस्तांतरणाचा ठराव कँबिनेट मध्ये कोणी मंजूर केला? ठाकरे सरकारनेच ना? मग बाहेर आंदोलन कशाला? ठरावाच्या वेळी नाव, अटी शर्ती याची काळजी का घेतली नाही? विरोध पण आपणच करायचा आणि समर्थन ही द्यायच अशी शिवसेनेची टक्केवारीसाठी चाललेली आंदोलन आहेत, अशा शब्दांत त्यांनी आंदोलनावर टीका केली.