मुक्तपीठ टीम
खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राला दिशा देण्याचे प्रयत्न केले पाहिजे होते. पण ज्यांची दिशा चुकली आहे आणि विचारांची दशा झाली आहे त्यांचा षण्मुखानंद सभागृहात दशावतार चालू होता आणि या दशावतरामध्ये आमच्या कोकणात एक पांडू असतो, तो पांडू कोण? असा प्रश्न उपस्थित होतो. मुख्यमंत्र्यांनी दिशा देऊन महाराष्ट्राला विचारांचे सोने देणे अपेक्षित होतं.
पण त्यांनीच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मेळाव्याचा उल्लेख केला म्हणून, दुर्दैवाने असे म्हणावे लागेल की, सकाळीच झाला तो राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा मेळावा हा विचारांची श्रीमंती असलेला होता आणि संध्याकाळी जो झाला तो वातानुकूलित सभागृहातील
उसनवारीचा मेळावा होता.
आज खऱ्या अर्थाने धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे. या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या दिवशीच भारतरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या महान संविधानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जातात आहेत. संघ राज्य पद्धतीवर नख लावली जात आहेत.
जी भाषा तुकडे तुकडे गँग बोलत होती आज ती भाषा शिवसेनेच्या मेळाव्यात सन्माननीय उद्धव ठाकरे यांच्या भाषणात झळकते की काय? हा सवाल आहे. तूकडे तुकडे गँगने काँग्रेसमध्ये प्रवेश करायला सुरुवात केली आणि आता उसनवारी मध्ये तुकडे-तुकडे गँगची भाषा हे बोलायला लागले? आमची नम्र विनंती आहे. हात जोडून विनंती आहे, भाजपला घालून पाडून बोला, आमच्यावर टीका करा, आम्ही त्याचे उत्तर द्यायला समर्थ आहोत. पण संविधान आणि संघराज्य पद्धतीला नख लावू नका. याच तुकडे-तुकडे गँगला महाराष्ट्रात रेड कार्पेट तुमच्याच सरकारने घातले होते. म्हणून आम्हाला चिंता वाटते या तुकडे तुकडे गँगच्या भाषेचा आम्ही त्याचा निषेध आम्ही करतो.