Sunday, March 8, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबईच्या नालेसफाई पाच वर्षांत १ हजार कोटींचा घोटाळ्याचा शेलारांचा आरोप

June 10, 2021
in घडलं-बिघडलं
0
Ashish shelar

मुक्तपीठ टीम

मान्सूनच्या पहिल्या पावसातच मुंबई महापालिकेने नालेसफाईचे केलेले दावे फोल ठरले असून मुंबईची दाणादाण उडाली. यावरुन भाजपा नेते आमदार अँड आशिष शेलार यांनी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांचा शेलक्या शब्दात समाचार घेतला आहे.

 

विधानसभेचे मुख्य प्रतोद आमदार अँड आशिष शेलार म्हणाले की,मुंबईत दरवर्षीप्रमाणे पाणी तुंबलेय.. घरात पाणी घुसू लागलेय..नालेसफाई कधी 107%..कधी 104%… दाव्यांचे आकडे मोठे-मोठ्याने “वाझे”..
पहिल्या पावसातच “कटकमिशन”चे सगळे व्यवहार उघडे. मुंबईकर हो! सत्ताधीशांचा हा वसूलीचा नाद खुळा…नेमेची येतो पावसाळा…पाच वर्षांत 1 हजार कोटींचा घोटाळा, अशा शब्दांत त्यांनी सत्ताधाऱ्यांवर गंभीर आरोप केले.

 

मुंबईत सुमारे 252.74 किमी लांबीचे एकुण 170 मोठे नाले तर 438.9 कि.मी लांबीचे छोटे नाले, पेटीका नलिका 621.46 किमी., रस्त्याच्या बाजूची उघडी गटारे 1991.69 किमी. जाळया संख्या 1,90,488, भूमिगत कमानी /नलिका पर्जन्य जलवाहिन्या 565.41 किमी असून यांच्या साफसफाई साठी दरवर्षी सुमारे 150 कोटींपेक्षा जास्त निधी दिला जातो. दरवर्षी नालेसफाईच्या गाळाचे मोठमोठे आकडे दिले जातात पण किती गाळ काढला त्याच्या वजनाच्या पावत्या, कुठे टाकला त्याचे सीसीटीव्ही फुटेज असे कोणतेही पुरावे मागूनही कधीच दिले जात नाहीत.

 

आम्ही गेली अनेक वर्षे नालेसफाईच्या कामातील फोलपणा प्रत्यक्ष जागेवर जाऊन उघड करतो आहोत. पण कंत्राटदारांना पाठीशी घालण्याचे काम सत्ताधारी पक्ष करतो. कंत्राटदार, अधिकारी आणि सत्ताधारी यांची अभद्र युती महापालिकेत असून त्यांनी गेल्या पाच वर्षात नालेसफाईच्या नावावर सुमारे १ हजार कोटींचा घोटाळा करुन तिजोरीवर डल्ला मारला आहे.

 

यावेळी महापालिकेने 107% तर कालच 104% नालेसफाई झाली असा दावा केला होता आणि आज सकाळी पडलेल्या पावसाने हे सगळे दावे वाहून नेले आहेत, अशा शब्दात आमदार अँड आशिष शेलार यांनी सत्ताधारी पक्षाचा समाचार घेतला आहे.

 

दरम्यान दोनच दिवसापूर्वी आमदार अँड आशिष शेलार यांनी गटनेते प्रभाकर शिंदे, भालचंद्र शिरसाट यांच्यासह नगरसेवकांच्या उपस्थितीत नालेसफाईचा दौरा करुन न झालेल्या कामांचा पर्दाफाश केला होता. आज पावसाने ते अधिकच उघडे केले आहे.

 


Tags: BJPbjp ashish shelarMayor Kishori PednekarMy BMCअँड आशिष शेलारबृहन्मुंबई महानगरपालिकाभाजपा
Previous Post

“आयोगाच्या अहवालाशिवाय मराठा आरक्षणासाठी पंतप्रधानांकडे मागणी म्हणजे समाजाची दिशाभूल”

Next Post

“महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारे कृषी सुधारणा विधेयक”

Next Post
balasaheb thorat

"महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या हिताचे रक्षण करणारे कृषी सुधारणा विधेयक"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
featured

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
June 20, 2025
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

May 29, 2025
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!