मुक्तपीठ टीम
पंढरपूरची आषाढी वारी…अवघ्या जगातील एक अनोखी परंपरा. ठरलेल्या दिवशी, ठरवून वारकरी आपापल्या गावातून पंढरीच्या विठुरायाच्या दर्शनासाठी पायी निघतात. त्यांच्या या वारीचा एक दिवस तरी त्यांच्यासारखं पायी चालत अनुभवण्याची संधी या वर्षी २६ जूनला आहे. राष्ट्र सेवा दल आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीनं “एक दिवस तरी वारी अनुभवावी…” उपक्रम आयोजित केलाय.
“एक दिवस तरी वारी अनुभवावी…” हा उपक्रम आता लोकप्रिय होत चालला आहे. यावर्षी तो येत्य रविवारी २६ जून रोजी आयोजित करण्यात आला आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून सासवड ते जेजुरी हे अंतर संत ज्ञानेश्वर माऊलीच्या पालखीसोबत वारकऱ्यांसोबत चालण्याची संधी घेण्यासाठी महाराष्ट्रभरातून अनेकांची रीघ लागते. त्याच बरोबर त्याच दिवशी सकाळी पुण्यातील समता भूमी म्हणजेच महात्मा जोतिबा फुले यांच्या वाड्यापासून समता संविधान दिंडी हभप श्यामसुंदर महाराज सोन्नर यांच्या मार्गदर्शनात पंढरपूरपर्यंत जाणार आहे.
राष्ट्र सेवा दल, अंधश्रद्धा निर्मूलन समितीचं निमंत्रण
संत परंपरेची शिकवण आणि भारतीय संविधानाचा सांगावा हा एकमेकाला कसा पूरक आहे हे समजून घेण्यासाठी आपण चालणार आहोत. संत कवींच्या अनेक रचना मानवतावादाचा, सामाजिक सलोख्याचा, अंधश्रध्दा व कर्मकांडाच्या विरोधाचा संदेश देतात. भारतीय संविधान प्रत्येक व्यक्तीच्या सन्मानाचा व विकासाचा विचार करतं. भारतीय संविधान सर्वांसाठी आहे तर “सकलांसी आहे येथे अधिकार” हा संतविचारांचा पाया आहे. महाराष्ट्रभरातून येणाऱ्या वारकरी भावाबहिणींबरोबर बोलण्यासाठी, त्यांच्याकडून काही शिकण्यासाठी आपण चालणार आहोत.
आपण २६ जून रोजी सासवड ते जेजुरी या एकदिवसीय वारीत मोठ्या संख्येने सहभागी होऊच. त्याच बरोबर सोमवार दिनांक २७ तारखेपासून पुढे पंढरपूर पर्यंत जाणाऱ्या समता संविधान दिंडीत ही किमान दोन किंवा तीन दिवस सामील व्हावे असे आवाहन आहे.
रात्रीचे मुक्काम
- रविवार दिनांक २६ जून जेजुरी
- सोमवार दिनांक २७ जून वाल्हे
- मंगळवार दिनांक २८ जून लोणंद
- बुधवार दिनांक २९ जून लोणंद
- गुरुवार दिनांक ३० जून तरडगाव
- शुक्रवार दिनांक १ जुलै फलटण
- शनिवार दिनांक २ जुलै फलटण
- रविवार दिनांक ३ जुलै वरड
- सोमवार दिनांक ४ जुलै. नातेपुते
- मंगळवार दिनांक ५ जुलै माळशिरस
- बुधवार दिनांक ६ जुलै वेळापूर
- गुरुवार दिनांक ७ जुलै भंडी शेगाव
- शुक्रवार दिनांक ८ जुलै वाखरी
- शनिवार दिनांक ९ जुलै पंढरपूर
- रविवार दिनांक १० जुलै. पंढरपूर
हा पालखीचा मुक्काम आणि सोहळ्याचा कार्यक्रम असतो.दुसऱ्या दिवशी सकाळी त्या गावातून पालखी दुसऱ्या गावाकडे रवाना होत असते.
आपण कोणत्या दिवशी आणि किती दिवस या संविधान दिंडीत सहभागी होवू इच्छिता ते खालील लोकांशी संपर्क साधून ठरवा…
आपले,
- हभप श्यामसुंदर महाराज सोन्नर,9594999409
- हभप ज्ञानेश्वर महाराज बंडगर
- शरद कदम,मुंबई 9224576702
- अविनाश पाटील,अध्यक्ष,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती,
- नागेश जाधव
- राजाभाऊ अवसक ,संगमनेर
- वर्षा देशपांडे, सातारा, लेक लाडकी अभियान, महाराष्ट्र
- अर्जुन कोकाटे,कार्याध्यक्ष,राष्ट्र सेवा दल,महाराष्ट्र
- नितीन मते, नासिक, राष्ट्रीय संघटक,राष्ट्र सेवा दल
- श्रीकांत लक्ष्मी शंकर,आम्ही संवादी,सासवड,9881644375
- मनोहर जायभाये, राज्य कार्यवाह(सांस्कृतिक विभाग) महाअंनिस 9767707917
- दत्ता पाकीरे,पुणे राष्ट्र सेवा दल
- माधव बावगे, कार्याध्यक्ष,महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती
- उपेंद्र टण्णु,पुणे,एस.एम.जोशी सोशलिस्ट फाउंडेशन,9881701881
- राहुल भोसले,पुणे 09822962850
- प्रा.उल्हास पाटील,गाथा परिवार
- सुनील स्वामी,लोकराजा शाहू संविधान संवाद प्रशिक्षण केंद्र,महाराष्ट्र
- राजवैभव शोभा रामचंद्र,लोकराजा शाहू संविधान प्रशिक्षण केंद्र,महाराष्ट्र
- सुहास कोते,राष्ट्र सेवा दल,कल्याण,डोंबिवली
- सुभाष वारे,पुणे