मुक्तपीठ टीम
मुंबईतील क्रूझ पार्टी प्रकरणातील एनसीबीचा पंच किरण गोसावीला पुणे पोलिसांनी अखेर अटक केली आहे. किरण गोसावी याच्याविरोधात विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. किरण गोसावी गेल्या अनेक दिवसांपासून फरार होता. तो पोलिसांना शरण जाण्यासाठी उत्तरप्रदेशातही गेला होता. मात्र, त्यांनी नकार दिला. त्यानंतर आता पुणे पोलिसांनी त्याला जेरबंद केलं आहे. त्यांनी दावा केला आहे की, किरण गोसावी स्वत:हून शरण आला नसून आम्ही आम्हाला मिळालेल्या खबरीच्या आधारे त्याला अटक केली आहे.
पुणे पोलिसांनी गुरुवारी किरण गोसावीला ताब्यात घेतलं
- रविवारी प्रभाकर साईल यांनी अनेक गौप्यस्फोट केले.
- त्याच्या गौप्यस्फोटानंतर एनसीबी अधिकारी समीर वानखेडे यांच्या कारवाईवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येऊ लागले.
- त्यानंतर किरण गोसावीची एक व्हायरल क्लिप समोर आली होती.
- यामध्ये तो लखनऊ पोलिसांना मला शरण यायचंय, असं म्हणत असल्याचं कळत होतं.
- मात्र, उत्तर प्रदेश पोलिसांनी गोसावीला स्पष्टपणे नकार दिला.
- त्यानंतर दोन दिवसांपूर्वी किरण गोसावीला ताब्यात घेण्यासाठी पुणे पोलिसांचं एक पथक लखनऊला रवाना झालं होता.
- त्यानंतर गुरुवारी त्याच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे.
काय म्हणाला किरण गोसावी?
- त्याआधी किरण गोसावीने क्रुझवर कशा प्रकारे कारवाई केली होती आणि प्रभाकर साईलने केलेल्या आरोपांबाबत गौप्यस्फोट केला होता.
- प्रभाकर साईल हा खोटं बोलत असून त्याचे सीडीआर अहवाल तपासावे, अशी माझी विनंती आहे.
- माझे, प्रभाकर साईल व त्याच्या भावाचे सीडीआर व चॅट तपासावे सगळं सत्य समोर येईल, असं किरण गोसावी यांनं म्हटलं होतं.
- तसंच, महाराष्ट्रातील एक मंत्री किंवा विरोधी पक्षातील एखाद्या तरी नेत्यांनं माझ्या बाजूने उभे राहावे.
- त्यांनी मुंबई पोलिसांना सीडीआर व चॅट तपासण्याची विनंती करावी.
- एकदा का अहवाल समोर आला की सगळं सत्य समोर येईल, असा दावा किरण गोसावीनं केला आहे.
किरण गोसावीवर तीन गुन्हे दाखल
- किरण गोसावीवर आधीच विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत.
- पुणे पोलीस त्याचा शोध घेत आहे.
- पुणे पोलिसांच्या रेकॉर्डवर तो फरार आरोपी आहे.
- मलेशियातील हॉटेलमध्ये नोकरी लावतो म्हणून किरण गोसावी याने ३ लाख रूपये उकळल्याचा गुन्हा चिन्मय देशमुख यांनी २०१८ साली पुणे पोलिसात दाखल केला होता.
- त्याच्या शोधासाठी पुणे पोलिसांनी दोन पथक तयार केली होती.
- किरण गोसावीवर ठाण्यातील कापूरबावडी पोलीस ठाण्यातही फसवणुकीचा गुन्हा दाखल आहे तर तिसरा गुन्हा अंधेरीतील पोलीस ठाण्यात दाखल आहे.